Shubhankar Malekar XII C 360

Children Stories Inspirational

4.8  

Shubhankar Malekar XII C 360

Children Stories Inspirational

जिद्द...

जिद्द...

4 mins
484


      सायली आणि सिद्धी ह्या फार चांगल्या मैत्रिणी होत्या.सायली तिच्या आई बाबांसोबत राहायची आणि सिद्धी तिच्या आई सोबत राहायची.सायली ला सगळ्या सुख सुविधा मिळायच्या. तिचे बाबा चांगल्या ठिकाणी नोकरी करायचे. मात्र तिला त्याची जाणीव नव्हती. तिचे अभ्यासा कडे लक्ष नव्हते. त्या दोघी ही 9वी त होत्या. सायलीच मुलांच्या प्रति आकर्षण वाढत होता. सिद्धी मात्र अभ्यासात फार हुशार होती.सिद्धीचे बाबा ती लहान असतानाच देवा घरी गेले होते.सिद्धी ची आई घर काम करुन आपला घर चालवायची.सिद्धीला मात्र फार शिक्षण घ्यायच होता आणि आपल्या आईला सांभाळायच होता.

              काही दिवसांनी कोरोना वायरस सगळीकडे पसरू लागला. काही दिवसांनी लॉकडाउन सुरु झाले. सायली आणि सिद्धी ह्यांच्या परीक्षा ही रद्द झाल्या. त्यांना 9वी त पास करण्यात आले होते. त्या आता 9 वी तुन 10 वी त गेले होते. लॉकडाउन मुळे सिद्धिच्या आईचे काम बंद झाले होते.सिद्धीची आई तिने साठवलेल्या पैश्यांनी तिचा घर सांभाळायची.सिद्धी ला मात्र तिच्या परिस्थितीची पुर्णपणे जाणीव होती.सायलीच्या बाबांचे काम घरातून सुरु झाले होते.सायलीला मात्र अभ्यासाची काहीच चिंता नव्हती.

              काही दिवसांनी सायली आणि सिद्धीचे ऑनलाइन वर्ग सुरु होणार होते. सायलीला तिच्या बाबांनी एक नविन फोन अभ्यास करण्यासाठी घेऊन दिला होता. मात्र सिद्धी ची परिस्थिती वाईट असल्या मुळे तिला काही फोन घेता आला नाही. मात्र तिला शिकायच होता. शिकुन आपल्या आई साठी काही तरी करुन दाखवायच होता. सायली सिद्धीच्या शेजारीच राहायची. सायलीने नविन फोन सिद्धी ला आणुन दाखवला.सिद्धी ने तिला विचारल की, “मी सुद्धा तुझ्या फोन वर तुझ्या सोबत ऑनलाइन वर्गात अभ्यास करु शकते का?” सायली बोलली, “हो पण माझी वही तू पुर्ण करुन देशील तरच आपण दोघे एकसाथ अभ्यास करु शकतो.”सायली तिच्या गरजेचा फायदा घेत होती.परंतु सिद्धीलाही अभ्यास करायचा होता कारण हे त्यांचे 10वी चे वर्ष होते. सिद्धी ने सायलीला होकार दिला.

          पुढच्या दिवशी त्यांचे ऑनलाइन वर्ग सुरु झाले.ऑनलाइन वर्ग सुरु असताना सायली अभ्यासाकडे लक्ष न देता ती इंस्टाग्राम,वॉट्सएप्प वर मित्रांसोबत बोलायची.तिच्या मुळे सिद्धीचे ही अभ्यासाचे नुकसान होत होते. फोन तिचा असल्यामुळे सिद्धी तिला काहीही बोलली नाही.मात्र सिद्धी ने हार मानली नाही.ती स्वयं अध्ययन करायची. ती फार मेहनत घ्यायची.त्याच बरोबर ती घरातली सगळी काम करायची,तिच्या आई ची काळजी घ्यायची.सायली कडे फोन आल्या पासुन ती मित्रांसोबत फोन वर बोलत बसायची,तिचे मुलांच्या प्रति आकर्षण वाढत होते. तिचे बाबा ही तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते,परंतु ती त्याच्या कडे दुर्लक्ष करायची.

      एकदा ऑनलाईन वर्ग चालू असताना सायली इंस्टाग्राम वर तिच्या मित्राचे फोटो बघत होती.तेवढ्यात तिच्या आई चे लक्ष गेले. तिची आई तिच्या वर ओरडली मात्र तिने संगितले, “मला सिद्धिने सांगितले इंस्टाग्राम वर फोटो दाखवायला.”तिच्या मुळे सायलीची आई सिद्धी ला ओरडली.तिला खुप बोलली.तिने खुप समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी तिचा ऐकलं नाही. त्यामुळे तिचे ऑनलाइन वर्ग बंद झाले.आता तिच्या कडे अभ्यास करण्याचे कोणतेही साधन नव्हते कारण तिच्या आईचे काम बंद झाल्या मुळे तिच्या कडे पुस्तक घेण्याचे ही पैसे नव्हते.सायलीला अभ्यास पुर्ण करुन घेण्यासाठी सिद्धी ची गरज होती म्हणुन तिने तिला पुस्तक अभ्यासासाठी दिले आणि संगितले की “माझा अभ्यास पुर्ण करुन दे.” सिद्धी ला अभ्यासाच्या साधनाची गरज होती त्यामुळे तिने ह्या वेळेस ही होकार दिला. तिने फार मेहनत घेतली.तिने स्वयं अध्ययन केले.तिने शेजारच्या दादा ची ही मदत घेतली. ती सायलीचा अभ्यास ही पुर्ण करायची. कोरोनाचे संकट होतेच मात्र सिद्धी ला सगळ्या परिस्थितीचा सामना करायचा होता.

   हळुहळु परिस्थिती पूर्वपथावर येत होती.सिद्धीच्या आईचे काम ही आता सुरु झाले होते. मात्र शाळा सुरु होण्यास विलंब होणार होता.कारण कोरोना पुर्ण पणे संपुष्टात आला नव्हता.बोलता बोलता डिसेंबर उलटून गेला.सायलीने संपुर्ण लॉकडाउन मध्ये काहीही अभ्यास केला नव्हता.सिद्धी खडतर प्रयत्न करुन अभ्यास केला. सिद्धीच्या आई ने खुप काम करुन सिद्धीच्या पुस्तकांसाठी पैसे गोळा केले.जशी जशी परिस्थिती सुधरत होती तशी तशी परिस्थिती पुर्वपथावर येत होती.काही दिवसांनी शाळा सुरु करण्यात आल्या. सिद्धीला तिच्या शाळेतल्या शिक्षकांनी फार मदत केली.हळू हळू 10 वी ची परीक्षा जवळ येत होती.सिद्धी तेवढ्याच जिद्दीने अभ्यास करत होती

    सायली मात्र अजुनही फोन वरच मज्जा करत होती.काही दिवसांनी 10 वि ची परीक्षा सुरु झाली. सायलीला पेपर खुप अवघड गेले,मात्र सिद्धी खुप आनंदात होती कारण तिला सगळे पेपर सोप्पे गेले होते. सायलीला खुप भिती वाटत होती.हळू हळू परिस्थिती पुर्वपथावर आली.सिद्धी च्या आईचे काम चांगल्या रितीने सुरु झाले.सिद्धीच्या आईने तिच्या साठी खुप स्वप्न पाहिली होती.सायली कडुन ही तिच्या आई बाबांना खुप अपेक्षा होती.काही दिवसांनी 10 वीच्या परीक्षेचा निकाल लागला.सिद्धी ला 91% पडले होते मात्र सायली नापास झाली होती.सिद्धी तिच्या शाळेतुन पहिली आली होती.

      म्हणुन परिस्थिती कशी ही असो मात्र आपण त्या वर मात करुन आपण आपला ध्येय साधला पाहिजे.



Rate this content
Log in