STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

जगून घे

जगून घे

3 mins
13

*जगून घे मानवा*

 आपले जीवन हे क्षणभंगुर आहे. देवाने दिलेले जीवनाच्या सर्व पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात. मनात असो किंवा नसो. सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलावेच लागते. आपला जन्म आणि आपले मरण दोन्हीही आपल्या हातात नाही. हे विधी लिखित असते. जन्म आणि मरण याच्यामधले जे आयुष्य त्याला आपण जीवन असेच म्हणतो. तर हे जीवन जगायचे कसे हे प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून असते. प्रत्येकाने पाहिलेल्या स्वप्नांवर अवलंबून असते. प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या समाधानाच्या संकल्पनेवर अवलंबून असते. जीवनात येणारी संकटे आणि त्याचा संघर्ष माणूस कसा करतो त्यावर अवलंबून असते. त्याच्या स्वप्नांवर अवलंबून असते. माणसाचे जीवन हे अतिशय क्षणभंगुर झाले आहे.माणूस घरातून बाहेर पडताना रात्री परत आपल्या घरी येईलच हे ठाम सांगू शकत नाही. आजकाल अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. माणसाचे शरीर हे आजारांची खाण असते. त्याचा गाडी प्रमाणे मेंटेनन्स ठेवावा लागतो. व्यायाम, योगा, प्राणायाम, चालणे याने हा मेंटेनन्स शरीराचा सुदृढ राहतो. कालची एक घटना शेअर करावीशी वाटते. सकाळी जॉब वर चाललेला एक मनुष्य आपल्या मुलाने मागितलेले जे खेळणेआहे ते म्हणतो मी तुला संध्याकाळी आणून देतो. आपल्या बायकोला म्हणतो संध्याकाळी आपण फिरायला जाऊ. कंपनीतल्या मित्रांना म्हणतो उद्या आपण पार्टी करू. आणि कंपनीत गेल्यानंतर दुपारच्या वेळेला त्याला हार्ट अटॅक येऊन तो जागेवर जातो. बघा त्यांने दिलेली ही आश्वासन आहे ती पूर्ण तो करू शकला का. किती साधी आश्वासन होती ती. म्हणजे माणसाचं जीवन हे किती क्षणभंगुर झाले हे मी सांगत आहे. तसेच रस्त्यावर उभी राहिलेली निष्पाप लोक एक्सीडेंट मध्ये जातात. कोणालाही पुढच्या क्षणाची काहीच कल्पना नसते. अजून एक उदाहरण देते - माझ्या शाळेतल्या एक वाळके बाई म्हणून होत्या. त्या सेविका होत्या. त्या दुपारी तुळशी बागेत खरेदी करायला गेल्या. मुलीसाठी नातीसाठी घरातल्या साठी काही वस्तू खरेदी केल्या. आणि येताना बस मधून उतरत असताना पाय घसरून त्या बसच्या खाली आल्या आणि बसच चाक त्यांच्या डोक्यावरून गेलं. स्वप्नांचा चक्काचूर झाला एका क्षणात. अशा कितीतरी रोजच्या जीवनामध्ये घटना घडत असतात. मला एकच सांगायचा आहे की आज,आत्ता, ताबडतोब जे हवे ते उपभोगून घ्यावे. मनात आले हे करायचे करून घ्यावे. नंतर करू म्हणालात तर जीवन मिळेल नाही मिळेल याची शाश्वती नाही. आज आपण बघतो पाऊस पडतोय, धुव्वादार पाऊस पडतोय त्या पावसामध्ये मस्त सहली निघत आहेत पण या सहलीमध्ये निसर्गाच्या पुढे आपण जायचे नाही. समुद्रकिनारी गेलात तर खोल जायचा प्रयत्न करू नये. धबधब्या खाली जाणार आहात तर जरा सांभाळून जावे. इन्स्टा वरती असलेले रील पण अनेक पाहत असतो की पाय घसरून पडला. पाय घसरण्यासाठी तिथपर्यंत जायचं कशाला आपण. अरे लांबून दिसणार आहे जवळ नही तेच दिसणार आहे. स्वतःच स्वतःचं जीवन का संपवायचं. वर जाण्याची वेळ आली की आपसूक माणूस कसाही वर जाणार आहे देवाने ते विधी लिखित लिहून ठेवलेल आहे सर्व. पण स्वतःहून निसर्गाच्या ताब्यात न जाता मरणाला मिठी मारू नये असे माझे मत आहे. आपणच आपल्याला सांभाळून राहावे. निसर्गात हा काही घटना घडल्या तर त्याला सामोरे जावेच लागते. ते काही कोणी टाळू शकत नाही जे आपल्या हातात आहे ते मात्र निश्चितच करावे. आपल्या मनातले बोलणे बोलून टाकावे. फक्त कोणाचे मन दुखवू नये. आपण असे वागावे की सर्व जनमानसाला आपण हवे हवे व्हावे असे आपले वागणे छान असावे. संत रामदासांच्या श्लोकांचा आपल्या जीवनामध्ये खरंच खूप उपयोग होतो. संतांची शिकवण ही आपल्याला बरेच काही सांगून जाते. जेवढे जमेल तेवढे संतांची शिकवण आचरणात आणायचा प्रयत्न निश्चितच करावा. हल्ली माणसातला माणूस मारतोय. भीती नाही,धाक नाही काहीच वाटत नाही त्याला. आपल्याला नुसते पाहिले तरी भीती वाटते.टीव्हीवर असे सिनेमा पाहताना हे दडपण येतं. मग मानव असे कृती कशी करू शकतो हेच समजत नाही. तरी मानवा आलेल्या या जीवनाचा अत्यंत आनंदाने उपभोग घेवूया. शेवटचे बोल मुखातून येण्याआधी आपलं जीवन जगुन घेवूया.... चला तर ही मानवी साखळी सुदृढ करूया. शारीरिक तपासणी नित्य करून शरीराचा मेंटेनन्स व्यवस्थित ठेवूया. योग्य औषधोपचार व योग्य व्यायाम करून शरीर सुदृढ बनवूया. लाचारीचे जीवन न जगता सन्मानाचे जीवन जगूया... शुभमं भावतु! सर्वांना सकाळच्या मंगलमय शुभेच्छा!! वसुधा वैभव नाईक धनकवडी,जिल्हा- पुणे मो. नं. 9823582116


Rate this content
Log in