krishnakant khare

Others

5.0  

krishnakant khare

Others

जेव्हा तुम्ही एखाद्या विषयी

जेव्हा तुम्ही एखाद्या विषयी

8 mins
868


प्रत्येकजण लहानपणापासून तर मोठे होईपर्यंत त्याला पुढे जाण्यासाठी त्याला सोपा वाटेल असे आणि त्याला जमेल असं प्रेरणा घेतो आणि त्या प्रेरणेतून तो यशस्वी होऊन देखील दाखवतो म्हणजेच माणसाला कुठून कुठे प्रेरणा मिळालीच पाहिजे किंवा त्याला कोणत्यातरी क्षेत्रात पुढे जायचं असेल तर क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींकडून प्रेरणा घेतलीच पाहिजे.


एका गावात संजू आणि राजू दोघे मित्र राह राहते. दोघेपण अभ्यासात फार हुशार कधी एकाने सहामाही परीक्षेत पहिला नंबर काढला तर दुसऱ्याने वार्षिक परीक्षेत पहिला नंबर काढला असं दोघांचं अभ्यासातलं गणित होतं. आई-वडील देखील घरदार पैशाने व्यवस्थित होते. दोघांचं शिक्षण दहावीपर्यंत व्यवस्थित चाललं होतं आता तर दोघे सतरा वर्षाची झाले होते. आता दहावीनंतर कॉलेज कुमार म्हणून दहावी पास होणार होते . राजू आणि संजू दहावीची परीक्षा म्हणून चांगला अभ्यास करत होते. पण राजूच्या घरी एक वाईट गोष्ट घडली राजूचे वडील हार्ट अटॅकने गेले. घरात काही दिवस दुःखाचा डोंगर होता, आता आईला राजु शिवाय कोणीच नव्हते. मग घरची जिम्मेदारी सगळी राजू वर येऊन राहिली राजूची आई आणि राजू शेतावर काम करू लागले, पण तशातच राजुचा दहावीच्या अभ्यासात लक्ष कमी राहू लागला. हे आईला पण जाणवत होत. पण करणार काय घरच्या जिम्मेदारी वर दोघांना सुद्धा अवलंबून राहावं लागत होतं. राजू शेतातल्या कामात कमी पडत नव्हता कारण त्याने शेतात आपल्या बापाला शेती करताना किती वेळा तरी पाहिलं होतं. त्यामुळे राजुला आपल्या बापाची प्रेरणा मिळत होती आणि शेतीकामाची सवय असल्याने त्या कामाने त्याला इतके त्रास वाटत नव्हतं. पण त्याचा मित्र संजू त्याला शिक्षणात कोणतीचअडचणआली नाही. संजय अभ्यासात हुशार असल्याने तो नक्कीच पुढे जाणार हे  गावातल्या लोकांना माहित होतं. राजूचे बाबा नसण्याने त्याला घरातले कामाची जबाबदारी होती त्यामुळे त्याचं दहावीच्या अभ्यासात पाहिजे तसं लक्ष नव्हतं. पण घरात शेतात राजू जबाबदारीने लक्ष देत होता. त्यामुळे राजू आता त्यांच्या वडिलांचा काम करत होता. तेवढच आईला सुद्धा राजूचा आधार वाटत होता. राजुला हिरवगार शेत, शेतीच्या बाजूला कार्वायांची झोपडी, बाजूला विहीरीतून पाटाचं पाणी शेतीला जाणाऱ्या हिरवीगार शेतं, लांबूनच काही ठिकाणी शेत कापणी केलेल्या शेतात गाई गुरं चरताना हे दृश्य राजुला शहरापेक्षा आपलं गाव फार आवडायला लागलं.

 आणि आता शेतात काम करून पीक काढून उदरनिर्वाहाचा काम करत होता.अशा कामाने राजूच्या आईला कौतुक वाटे, ते तिला वाटे बाळ माझा गुणी. राजु आईच मन न दुखवता धरती मातेची सेवा करीतहोता, शेतीचे काम प्रामाणिकपणे करीत होता. पण राजुला आपल्या शाळेत संजीव बरोबर अभ्यासात चढा ओढ करून अभ्यास करून चांगल्या मार्गाने पास व्हायचा,हे ध्येय होते.

त्यातच दोघांना गोडी वाटायची पण आता राजू त्याच्या शर्यतीत नसल्याने संजूला सुद्धा वाईट वाटायचे, राजुला आता शाळेची आठवण झाली की मन बेचैन व्हायचं. एकदा काय झाले राजू बुधवारच्या बाजार म्हणून बैलगाडी घेऊन बाजारात आला ,शेतीसाठी बी बियाणे शेती खत वगैरे व काही घरातलं संसाराचं सामान घरी घेऊनआला. राजूच्या आईने अजूनही राजूने आणलेल्या आठवड्याच्या बाजाराचा सामानाचा हिशोब करून राजुला म्हणाली "राजु, हे बघ उद्या आपल्या प्रगण्या शेताच्या बांधावर देऊळ आहे ना तिथं दही भात नैवेद्य दाखवायचा आहे ,तू उद्याच्या शुक्रवारी सगळे आपल्या शेतीची पूजेची सामन घेऊन तुला पूजा करायची आहे ,राजू "हो" म्हणाला. आणि हातपाय धुवायला गेला, राजू उद्या पूजा करणार होता तो दिवस उजाडला सकाळीच बैलगाडी घेऊन पूजेचे साहित्य घेऊन प्रगण्या शेताच्या बांधावर मंदिराजवळ आला ,बैलं गाडीला सोडुन मंदिराच्या जवळ असलेल्या झाडाला बैलांना बांधला आणि आपल्या पद्धतीने शेतीसाठी पुजापाठ करू लागला पण पूजा पाठ करत असताना त्याचं मन दहावीच्या अभ्यासाकडे धावत होतं कारण इन्स्पेक्शनला शाळेत एक चांगले साहेब आले होते. त्याने राजुची तोंडी परीक्षा घेतली व पाठ थोपटून सरांना म्हणाले होते "हा राजू एक प्रामाणिक विद्यार्थी दिसतंय तो नक्की मॅट्रिक मधील चांगल्या मार्गाने पास होऊन अव्वल येईल , असं शाळेतला विचार करत असताना पूजा करत असताना त्याला असं आढळलं कि मी देवा समोर कापुर जाळला तर थोड्या वेळा करता जळेल पण अगरबत्ती पेटवली, तर ती कापरा पेक्षा जास्त वेळ निखर्याच्या रुपात जरा जास्त वेळ सुगंध देऊन पेटत राहिल, असं विचार करत समोरच्या मुर्ती कडे एकटक बघत राहिला. आता त्याचे चंचल मन त्यामुर्ती कडे स्थिर व्हायला लागले,आता कापरा पेक्षा भलेही अगरबत्ती जास्त वेळ सुगंध देऊन जळत राहते तर, मग मी पण कापरापेक्षा अगरबत्ती सारखा शेतातलं काम आटपलं कि थोडा थोडा करुन दहावीचा अभ्यास केला मला पण दहावीत पास होता येईल. असा त्याला अगरबत्ती कडुन प्रेरणा मिळाली होती.तो घाईने पुजा करून मंदिराबाहेर आला तर त्याने समोर बघितले तर त्याच्या दोन बैला पैकी एका बैलाने प्लास्टिकची पिशवी खायाला घेतली होती तसा राजू उठला आणि त्या बैलाला छडीने मारायला घेतली होती, कारण त्या बैलाने ती प्लास्टिकची पिशवी खाऊ नये म्हणून पण बैलाने त्याच्या तोंडातली ती प्लास्टिकची पिशवी खायची सोडली नाही आता मग काय करायचं मग त्याने दुसऱ्या बैलाला घरी घेऊन जाऊ लागला तसं त्या बैलाने ते पाहिले मग मग त्याने तोंडातली पिशवी खायची सोडली. तसा तोही राजू च्या बरोबर येऊ लागला मग राजुच्या लक्षात आलं की आपण या बैलांपासूनही प्रेरणा घेऊ शकतो आणि तो बैलाबद्दल विचार करू लागला तसं पाहिलं तर बैल मुका प्राणी तो सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कितीतरी काम करतो. सकाळी बैल पाटाचे पाणी वाहून न्यायला मदत करतो कधीकधी गाडीची बैलगाडी होतो कधी शेतात शेत नांगरा याला मदत करतो मग आपणच का नुसतं बैलासारखा सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच काम करायचं त्यापेक्षा शेतात माळरानात, शेतातल्या माच्यावर रिकाम्या वेळात शाळेचा अभ्यास करायचा आणि वार्षिक परीक्षेला परीक्षा द्यायला बसायचं म्हणजे आपल्याला वेळ मिळेल तसं आपण काम केलं तर आपली प्रगतीच होईल राजुला आपल्या अनोख्या प्राण्यापासून बैला पासून चांगली प्रेरणा मिळाली होती.मग स्वताच गालात हसायला लागला कारण त्याला अगरबत्ती पासुन सुद्धा प्रेरणा मिळाली होती आणि बैला पासुन सुद्धा प्रेरणा मिळाली होती आता तो शाळेत शाळेचे वार्षिक फी भरून दहावीच्या विषयांचा अभ्यास शेतावर माळराणावर करू लागला, लवकरच वार्षिक परीक्षा आली दहावीच्या मुलांनी परीक्षा दिल्या.

राजूने संजुने सुद्धा परीक्षा दिली होती लवकरच परीक्षेचा रिझल्ट लागला आणि राजू संजू दोघे चांगल्या मार्गाने पास झाले होते म्हणजेच आपल्याला असं दिसून येईल प्रेरणा माणसाला कुठून कधी मिळेल सांगता येत नाही. मी लहान असताना मला पिक्चर बघायचा चांगला आवडायचं, आमच्या जमान्यात कुमार गौरव संजय दत्त अमीर खान सलमान खान हे आवडीचे कलाकार पण लहान असताना आम्हाला धर्मेंद्र अमिताभ बच्चन विनोद खन्ना राजेश खन्ना हे कलाकार फार आवडायचे अमिताभ बच्चनच्या तरुणपणाच्या कारकिर्दीत त्यांची फॅशन म्हणजे स्लिम फिट शर्ट आणि फुल बॉटम पॅन्ट आणि केसांची हॅप्पी असायचे आम्हीसुद्धा लहानपणी सतरा-अठरा वर्षांची असताना पेहराव फॅशन करायचं कधीकधी आम्हाला त्या तारुण्यात तोच अमिताभ म्हणजे मी तोच धर्मेंद्र म्हणजे मी असं आम्हाला वाटायचं खरं म्हणजे अमिताभजी ट्रॅजेडी सीन फार सुंदर करायचे आणि ते मला आवडायचे मीसुद्धा रिकाम्या वेळात प्रत्येक हिरोंची त्यांची ॲक्शन करायला बघायचो, वाटायचं मी पण कॉमेडी ट्रॅजेडी भूमिका करू शकतो आणि माझ्या भूमिका प्रेक्षकांना आवडू शकतात कारण मी आरशात उभं राहिल्यावर बरेच पिक्चर मधले सिन करून बघायचो मग मला फुल कॉन्फिडन्स यायचा पण मला पाहिजे तसा मार्गदर्शन करणारा, गायडन्स करणारा कोणी नव्हता, मला शाळा, कॉलेजातून मित्रांकडून सपोर्ट मिळायचा.  सत्यदेव दुबे जी हिंदीचे अभिनयाचे द्रोणाचार्य असं मला वाटायचे. सत्यदेव दुबे जी खरंच त्यांचा स्वभाव मला फार आवडत होता, एकदा सीनियर आर्टिस्ट साठी अॅक्टींग वर्कशॉप अरेंज केला होता मी पण सत्यदेव दुबे जी यांचं नाव ऐकून होतो. त्यांनी एकदा लेक्चर मध्ये सांगितलं की तुमच्याकडून कोणतेही गोष्ट तुम्हाला करून घ्यायची आहे मग ते तुमचे नोकरीचे क्षेत्र असो की ते धंद्याचे क्षेत्र असो त्यासाठी तुम्हाला सातत्य ठेवावे लागेल तरच त्यात जिवंतपणा आणू शकाल. सत्यदेव दुबे जी यांचे लेक्चर अटेंड करताना मला एक गोष्ट आढळून आली ती म्हणजे गुरु आपल्या शिष्यांशी कोणताच भेदाभेद ठेवत नाही ते शिष्यांना निस्वार्थी पणे विद्यादानाचं काम करीत असतात, गुरु सगळं कडे सारखाच असतो .झालं काय एकदा लेक्चर मध्ये उत्तर भारतीय काही आर्टिस्ट होते तर काही बिहारी होते. प्रत्येकानी दुबेजी ना काही शंका-कुशंका सांगायच्या होत्या आणि त्या शंकेचं निरसन सत्यदेव दुबे जी करणार होते आम्ही सगळ्यांनी आपआपल्या कागद पेपरावर आपली शंका लिहून ठेवली होती, आता सत्यदेव दुबेजीसर सगळ्यांचे शंका दूर करत होते. आमच्या मध्ये उत्तर भारतीय व बिहारीआर्टिस्ट सुद्धा होते, उत्तर भारतीय आर्टिस्टानी शंका विचारायला घेतली. सत्यदेव दुबेजी सर त्यांची शंका निरसन करत होते पण उत्तर भारतीय आर्टिस्ट म्हणायचं "हमको मालूम है," ज्यावेळी दुबेजी सर त्यांची शंकानिरसन करायचे. त्यावेळी उत्तर भारतीय आर्टिस्ट "हमको मालूम है, हमको पता है "हे ऐकून दुबेजी काही बोलले नाहीत त्याचं हे किती वेळा तरी झालं नंतर दुबेजीन्ची खोपडी सटकली भडकले होते ते त्याने तेवढ्या मोठ्याहॉलमध्ये त्यांची चांगली खरंडपट्टी काढली म्हणाले" तुम जैसे भैय्या और बिहारी यहा मुंबई शहर में आ के आपने युपी का बिहार को बदनाम कर रहे हो ,तुम्हे बढो से बोलने की तमीज नही है, तुम यहा तुम्हारे काम के लिये आहे हो या मेरे काम के लिये ?नही समजे, तो तुम्ही समजना होगा, यहा पे मुझे तुमसे कोई जरूरत नही है बल्की तुम्ही मुझसे जरूरत है। तो तुम्हे बडोंससे कैसी बात करनी है? किस लिहाज से बाते करनी है? ,

ये भी नही मालूम नही, इससे मालूम पडता है  कि तुम्हारा नेचर कैसा है ?घर कैसा है? तुम्हारे लोग कैसे है? तुम्हाला राज्य कैसा है? तुम कैसे हो? ये सुनके भी उत्तर भारतीय आर्टिस्ट दुबेजी सर सेअलग थलग,अलग बोलने लगा,अर्गुमेंट करने लगा। उसी दौरान दुबेजीसर को पुरे हाल में उत्तरभारतीय आर्टिस्ट का बरताव अच्छा नही लगा इसलिये उन्होने सबके सामने पुरी हॉल में उत्तर भारतीय आर्टिस्ट का अपमानित किया क्योंकी सोचने वाली बात ये थी की अगर उस उत्तर भारतीय आर्टिस्ट को ऐसे छोड दिया होता तो ये गलती हमेशा करता रहेता, वही सत्यदेव दुबे जी अपने उत्तर भारतीय राज्य को कोई बदनामी न करे इसलिये उसी वक्त उसे होश मे लाया और वे दुसरे उत्तर भारतीय आर्टिस्ट भी होश में आ गये.आगे चलकर येही उत्तर भारतीय से उनकी नम्रता व्यवहार सबको उनका व्यवहार अच्छा लगे।

 गुरूकडून प्रेरणा मिळते की आपण कोणताच भेदभाव न करता गुरुनी तराजूच्या प्रमाणे असलं पाहिजे सत्यदेव दुबे जी उत्तर भारतीय असले तरी त्यांच्याबद्दलचा आदर भाव उलट वाढला, हॉलमध्ये जेवढे भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील आर्टिस्ट होते त्यांच्या मनात सत्यदेव दुबे जी त्यांच्याबद्दल चांगला आदर भाव वाढला आणि त्यांच्याकडून कोणाला काही प्रेरणा घ्यायची होती मलाही त्यांच्याकडून एक चांगली प्रेरणा मिळाली आणि ती म्हणजे आपण कोणत्याही क्षेत्रात असो पण आपलं काम आपण मन लावून केलं पाहिजे तरच तुम्ही यशस्वी होऊन जाल व तर जसे इतर आपले स्वप्न उराशी बाळगून असतात तसे मीसुद्धा माझे स्वप्न उराशी बाळगून होतो... पण म्हणतात ना गुरूशिवाय तुम्हाला प्रेरणा कशी मिळेल मला त्यांच्याकडून एक चांगली प्रेरणा मिळाली ती म्हणजे आपल्या क्षेत्रात आपण आपल्या कामाचं सातत्य ठेवलं पाहिजे मी पण आपल्या कामात सातत्य ठेवून प्रयत्न करत होतो व प्रेरणा माणसाला कुठून? कशी? कोणाकडूनही मिळेल सांगता येत नाही. मी सत्यदेव दुबेजी सरांच्यां विचारधारेशी प्रेरित झालो होतो.


प्रेरणा तर सगळ्यांनी घ्यायलाच हवी,प्रेरणा ज्या गोष्टीने होते,त्यावेळी आपलं आत्मनिरक्षरता असलं पाहिजे तर मग त्यासाठी आपल्या भोवतालचा परिसर अनुकूल नसेल तर आपल्या मनाची तयारी आपल्याला काय करुन घेते ?यावर कथा पुढे होत जाते.


Rate this content
Log in