जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते


लाॅकडाऊन चार २३ सावा दिवस
प्रिय रोजीनिशी,
आज कामावर जायचे होते त्यामुळे सकाळी लवकर उठून घरातील मंडळींच्या चपाती आणि भाजी केली.
आज 8:45 ची बस मिळाली त्यामुळे जायला थोडा उशीरच झाला कामावर पोहोचले आमचे कोरोंटाईन पेशंट कालच डिस्चार्ज झाले होते त्यामुळे टेन्शन नव्हते पण अकरा वाजता एक बातमी कळली .
एक निमोनियाची पेशंट आमच्याकडे होती जिला आम्ही suscpted म्हणून पाठवली होती ती ऑफ झाली. त्यामुळे वातावरण पुन्हा एकदा तंग झाले.
शिवाय 14 तारखेला आमच्याकडे डायलेसिस मध्ये एक पेशंट चौकशीसाठी आली होती. तिचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आला . पण तिच्या हातातून कागदपत्रे घेऊन टेक्निशियनने हाताळली होती. मग दोन्ही डायलिसिस टेक्निशियन ला होम कोंरों टाईन केलं.
त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या मंडळींमध्ये टेन्शन आलेले आहे
त्यात आज गरोदर माता तपासणी दिवस होता. एवढ्या तंग परिस्थितीत देखील चाळीस जणी आल्या. आम्हाला पण त्यांच्यामधील सोशल डिस्टन्स राखताना, त्यांना नंबर प्रमाणे लांबलांब बसवताना स्वतःची देखील काळजी घ्यावी लागते. कधीकधी आमचा देखील पेशंन्स सुटतो. शेवटी आम्हीदेखील माणसेच आहोत.
संध्याकाळी घरी आले आणि अचानक घसा खवखवायला लागला . मग घरातील सर्वांनाच टेन्शन.. मध्ये मुले मला कामावर जाण्यावरुन ओरडायला लागली.
मग मी गरम पाण्याच्या गुळण्या केल्या. दूध आणि हळद घेतले आणि स्वतःला समजावलं "ऑल इज वेल,ऑल इज वेल" तुला काही होणार नाही.