Meenakshi Kilawat

Others

3.7  

Meenakshi Kilawat

Others

जाति प्रथा एक श्राप तो नही

जाति प्रथा एक श्राप तो नही

4 mins
1.0K


 समाजात जातीप्रथा एक शाप तर नाही ना? जाति निर्माण कश्या झाल्या असाव्यात. जातीपासुनच्या व्यवस्थेचे विस्तारीकरण या जातीच्या अनगिनत कहाण्या समाजात विखुरलेल्या आहेत ही जातीची उत्पत्ती कोणी व कशी केली असेल कोणत्या आधारावर केली असेल किंवा आकाशवाणी वगैरे तर झाली नसतिल ना? वा स्वप्नात, झोपेत दृष्टांत तर झाले नसतील ना? एक ना अनेक प्रश्न आपल्या समोर येतात तेव्हा हा जातीचा मोठा आवाढव्य पसारा किती खोलवर रूजला आहे याची प्रचिती समाजात वारंवार बघायला मिळते.

 सुरुवातीला प्रत्येक मानवाला जात कळली ती सुरवात कशी लावली असावी ही अचंभित करणारी गोष्ट आहे. इतकच नाही तर जनावरे,पशु पक्षी यांना सुद्धा जात लावलेली आहे.

सुरुवातीला जातीची गोत्र वेदकालीन ग्रंथामध्ये याचा सखोल अभ्यास केल्यास आपणास दिसून येईल की गौतम भारद्वाज जमदग्नी,विश्वामित्र, वशिष्ट भरद्वाज अंगिरा,पुलस्त्य, या सप्तऋषीच्या नावावर ठेवण्यात आले होते .तसेच गौतम, औदुंबर, मस्य, वृषभ, काक, वाघ, शुक ,भ्रमर, या नावाने समाजात रूढ झालेल्या दिसतात. 

कौतूकास्पद गोष्ट म्हणजे समाजात अनेक पद्धतीने जातीव्यवस्था बहाल केलेल्या आहेत. आर्थिक, धार्मिक कार्यामध्ये संघ समूह दिसतात संघटन कार्य करून आपलं उत्पन्न आदान-प्रदान सेवा भावना परस्पर संबंध परंपरा चालविल्या जातात या सर्व ठोस धार्मिक विश्वासाने दृढ असतात. यात अनुवंशिकता बघायला मिळते.

 आदीकाळापासूनच विविध जातीचा बोलबाला होता या जाती अगोदर देवादिकापासून उदयास आल्या असाव्यात म्हणतात जेव्हा म्होरक्यांनी कार्यभार सांभाळला तेव्हा त्यांना खूप अडचणी आल्या असाव्यात तेव्हा अनेक लोकांना अनेक कामाची ओळख करून अनेक जाती लावल्या गेल्या आणि प्रत्येक व्यक्तिच्या आचरणावरून राहनीमाना वरून या जाती लावल्या असाव्यात या गोष्टीचा काही ठोस आधार नाही.या जाती महाभारत, रामायण च्या काळापासुनच समाजात आहेत. निरनिराळे धर्म व जाती मुळेच आपले प्राचीन हिंदू वेद पुराणे व धर्म ग्रंथातही जनजातीला एक व्यापक दृष्टिकोन देवून रुपरेखा आखण्यात आलेली होती आणि समाज हितासाठी त्याचा पुरेपुर फायदा झाला यात काही दूमत नाही. म्हणूनच जाती समाजात खोलवर रूढ झालेल्या आहेत.

 या जातीप्रथेमुळे आपला भारत देश महान संस्कृतीचा देश ठरला आहे कारण इथे अनेक जातीजमाती आहेत.

समाजात अापणास असे दिसून येईल की एका जातीच्याच अनेक शाखा तयार झालेल्या आहेत. 

 भारतात कमीत कमी जास्त 4000 चार हजाराच्या जवळ जाती उपजाती गोत्र वंश आहेत. या जातीच्या कितीतरी समृद्ध शाखा आहेत.या एकजूटीने कार्य करतांना शृंखला रूपात दिसतात.प्रत्येक समाजात साडेबारा जाती असतात पंचवीस ते तीस किलोमीटर वर वेगवेगळ्या जातीचे प्रकार आपणास पाहावयास मिळतात आपल्या जातीच्या पंथाच्या हिशोबाने ती लोके व्यवस्था करून उदरनिर्वाह करून संघसंघटनेने राहण्याचा प्रयत्न करताना दिसत होते परंतू हल्ली आपली सांस्कृतिक व धार्मिक प्रवृत्तीत एकत्र होवून आपली ओळख अभीलेखीत करून आर्थिक सामाजिक बंधन पाळतांना दिसतात. आणि आता तर जातीने अहंकार रूप घेतलेले आहेत.प्रत्येक जातीला 

मी-पणाची लागन लागलेली आहे.आपलाच समाज श्रेष्ठ असून वर्चस्व गाजवतांना दिसतात. जो तो आपल्या जातीला धरूनच तरक्कीची भावना मनात जोपासतो. आणि कुणीही यावे व आपआपल्या जातीचा प्रचार प्रसार करावा ही ध्येयनिष्ठा समाजात बघायला मिळते.

 संताच्या म्हणन्याप्रमाने विश्वजी माझे घर हल्ली कुठेच दिसत नाही. या जातीचे समाजात कित्येक खंड पडलेले आहेत कुणाचा स्तर उच्च कुणाचा स्तर नीम्न विवाह संबंधात या सर्व गोष्टीचा खूप विचार केला जातो उंच्च मानणाऱ्या जातीचे लोक खालच्या स्तरातील जातीच्या मुलीशी विवाह करू शकतात परंतू आपली मुलगी उच्च कुळात गेली पाहिजे असा मानस ठेवतांना दिसतात.  

 काही जाती तर इतक्या कट्टरपंथी असतात की ती लोके आपले नियम तोडत नाहीत पूर्णपणे वर्चस्व गाजवितांना दिसतात. त्यामुळे पूर्ण देशाच्या कामकाजावर त्याचा पूर्ण असर होवून जातीमुळे देशाचा बजेट गडबडलेला आहे शासनाची पुरती धांदल उडाली आहे.

 या उच्च-नीच परिस्थितीमध्ये मोठमोठे समाजाचे ठेकेदार पाटील छोट्या जातीच्या स्त्रीयांशी बलात्कार सारख्या गोष्टी करीत होते आणि पंचायत समोर नाक वर करून त्या गरीब स्त्रीयांवर आरोप प्रत्यारोप करून आपली प्रतिष्ठा जपत होते. त्या खालच्या स्तरावरील पिडीत गरिबांना समाजातून बहिष्कृत करून जातबाहेर करत होते एवढ्या लज्जास्पद गोष्टी समाजात घडत होत्या त्या आजही कुठेतरी घडत आहे.

  या जातीप्रथा विकृतीचा कळस गाठणारी आहे व हा जातीभेद नष्ट व्हायला पाहिजे सर्व जगात समसमान विचारांची देवाण-घेवाण व एकच जात उदयास आली पाहिजे जातीव्यवस्थेच्या नावावर ही भयंकर विडंबना थांबायला पाहिजे. या जातीमुळे हजारो-लाखो परिवार बरबाद झालेले आहेत या जातीमुळे हजारो खून होवून रक्ताचे पाट वाहिले आहेत. या जातीच्या विळख्याने सर्वच राज्य फडफडत युगायुगा पासून हा अत्याचार झेलत आहे.एक पाऊल जर वाकडे पडले तर हे कट्टरपंथी त्यांना जातीतून बहिष्कृत करतात. ना त्यांच्या घरी जाणे-येणे बंद असते कोणत्याच कार्यात त्यांना बोलवित नाहीत त्यांच्या मुला-मुलींची जातीची मुलगी मुलगा विवाह करीत नाही जाती बाहेरची लोक मन मारून समाजात कसेतरी उदरनिर्वाह करून जगतात. काही काळाने जर सांगण्यनुसार वागले तर त्यांना जातीत घेण्यात येते पण त्यांना वेगवेगळ्या प्रायश्चित्तातून जावे लागते व त्यांना गाव भोजन किंवा मास मदिरेचे भोजन द्यावे लागते.ही सजा कबूल केली तरच त्यांना पुन्हच्छ समाजात घेतात.या आशा समाजाला काय म्हणावे!

 आजच्या प्रगतिशील देशात सर्वांच्या ठायी, दया ,माया करुणा असावी माणसाने माणसासारखा व्यवहार करावा शासनाने यात फॅसिलिटीज दिली आहे अनेक जातींमध्ये आणि ओपन कॅटेगिरी वेगळी केलेली आहे. सर्वांना समान दर्जा देऊन सर्वांना समान फॅसिलिटीज द्यावी शाळेमध्ये कॉलेजमध्ये व्हॅलिडीटी सर्टिफिकेट प्रमाणपत्र जातीचे मागतात ते सर्व बंद व्हायला पाहिजे, या फॅसिलिटी मुळे उच्च जातीचे समजणारे लोके पण आपल्या चार पैशासाठी लाईनमध्ये दिसतात तेव्हा ही जात आडवी येत नाही, हे जातीप्रथा बंद व्हायला पाहिजे यातच देशाचे कल्याण आहे आणि समृद्धी आहे. या जाती विभाजन देशाला कलंक आहे त्यात कॅन्सरसारखा रोगग्रस्त जातीचा किडा कधीच पनपू देणार नाही.तो देशाला पूर्णपणे रिकामा करीत आहे. जिकडे तिकडे देशात अराजकता बोकाळला आहे त्यास राजनीति मध्ये नेतागण खतपाणी देवून आपसात भांडणे लावून आणि खुर्चीसाठी,पदासाठी या जातीचा फायदा घेताना दिसतात.

 तसेच आपण पाहतो आहे की नवजगात आजकालचे सुशिक्षित सबल समाज जातीला जास्त भाव देत नाहीत महत्व देत नाही निडर बनून सामना करतात या सायन्सच्या जगात जातीपातीचा खेळ खूप मानसिक कष्ट देतो आहे.काही युवापिढीने जातीव्यवस्थेला फाटा देऊन काही प्रमाणात देशाला मदतच केली आहे.


Rate this content
Log in