इगो
इगो
मेल्यानंतर फोटो स्टेटसला ठेवून खाली RIP लिहून तुमची भावना त्या व्यक्ती पर्यंत पोचणार नसते. त्यामुळे हीच वेळ आहे अस समजून आपल्या लोकांना जवळ करा. हयात आहेत तोपर्यंत संवाद साधा. फोटो स्टेटस ला ठेऊन प्रेम व्यक्त होत नसतं. तुमचा एक कॉल तुमच्या लोकांसाठी खास असतो. वाढदिवसाला स्टेटस नाही ठेवलं तरी चालेल पण जाऊन त्यांची स्वतःहून गळाभेट घ्या. समोरून संवाद साधताना त्यात कमीपणा वाटून घेऊ नका. कितीही नाही म्हटल तरी प्रत्येकात तो इगो असतो. आपल्या माणसांसाठी तो इगो बाजूला काढून ठेवा. आज सोबत आहेत त्यांना जपून ठेवा उदयाला त्यांच्या आठवणीच राहणार आपल्याजवळ. आपल्या लोकांना भेटल्यावर आपलेपणाची मिठी नक्की मारा.