Meenakshi Kilawat

Others

1  

Meenakshi Kilawat

Others

हरवलेलं बालपण

हरवलेलं बालपण

2 mins
430


शिक्षण ही आज काळाची गरज आहे. मुलाना घड़विण्यासाठी,काही आई वडील केवढा भव्य खर्च करतात. मुलाच्या शिक्षणासाठी वडिलोपार्जित जमीन जुमला विकतात. हाडाचे काड करून शिक्षण शिकवितात. लाखोच्या संख्येत महागड्या इंग्रजी मीडियम शाळेत शिकवितात.किती खर्च करावा याची काही मोजमाप नाही.आणि आपल्या मुलांच्या भारोभार नोटा शाळेची फिस म्हणुन देतात.मोठमोठ्या शाळेत शिकवून मुलाना डॉक्टर,इंजीनियर,ऑफिसर ,बनवतात.

काही आई वडील तर मुंलाच्या शिक्षणासाठी अवाढव्य कर्ज घेतात,व काही आई वडील तर मुंलाच्या शिक्षणासाठी मुलांवरच शैक्षनिक लोन लादतात. ही झाली आताच्या आईवडीलाची गोष्ट, आणि मुंलाच्या मनाविरूद्ध विषय देवून,त्यांना रात्रंदिवस अभ्यास करायला भाग पाडतात.हीअफलातून स्वप्न किती महागात जातात,वरून चिंतेच्या गर्तेत ढकलतात.

   खरी गरज काय आहे आजच्या विद्यार्थी वर्गाला हे जानुन घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी जीवनात शिक्षण घेत असता, शारीरिक व बौद्धिक या सवयी उच्च दर्जाच्या असायला पाहिजेत. विद्यार्थी जीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्वाचे स्थान आहे.त्या सवयी लावल्या पाहिजेत.चांगले साहित्य वाचन करण्यासाठी साहित्याची आवड लावणे गरजेचे आहे,जेवढे पाहिजे तेवढे आवश्यकते नुसार बोलणे,खाण्या-पिण्यावर लक्ष्य दिले पाहिजे .पुढील आयुष्यात समाजावर चांगला प्रभाव आणि आपली वेगळी छाप पाडून वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रेरना दिली पाहिजे. अनावश्यक गप्पा करुन आपला अमूल्य वेळ गमवायचा नाही या गोष्टीची जान मुलांना वेळेवेळी द्यायला पाहिजे.व त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात ते हमखास यशस्वी करण्यास मदत केली पाहिजे. सदोदित यश संपादन करताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहे याकड़ेही आईवडीलांनी लक्ष द्यायला हवे.ज्या क्षेत्रात पदार्पण केले त्या क्षेत्राची माहिती काढून कल्पना दिल्यास ती नाकाम होणार नाही.अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे.आजच्या विद्यार्थी वर्गात सारखी चढाओढ दिसून येते.त्याला कारनीभूत हमखास आईवडीलच असतात .काही विद्यार्थी दुसऱ्या कुणावर खापर फोडून मोकळे होतात.ही गोष्ट अयोग्य आहे,तशी वेळच यायला नको,म्हणुन चांगल्या लोंकांचे गरजेनुसार सतत मार्गदर्शन घ्यावे.विद्यार्थीजवळ अनेक कारणे असतात. त्यांच्यातला नकारात्मकपणा दूर कसा करता येईल,आणि त्यास समाजातला एक चांगला जवाबदार नागरिक कसा बनवता येईल यासाठीचे प्रयत्न आई वडील शिक्षकांनी करत राहिले पाहिजे. त्यांची सकारात्मकता वाढली पाहिजे.एक चांगला निष्ठावान कर्तव्य दक्ष विद्यार्थी होण्यासाठी कोणते शिक्षण द्यावे,याची जानिव ठेवून आईवडिलांनी वागावे.व वेळोवेळी त्यांना शिक्षणाचे महत्व सांगून थोर पुरूषांची उदाहरने देवून चांगला मानव कसा असतो हे शिक्षण देणे म्हणजेच त्यांचे भविष्य उज्वल करणे होय. आईवडिल सुज्ञ असेल तर मुलांना घडविने सोईस्कर होईल,एवढे मात्र नक्कीच सांगू शकते.संसारात उच्च शिक्षित होण्यापेक्षा एक चांगला संस्कारीत मनुष्य होणे गरजेचे आहे. बाबासाहेब घडले,टिळक घडले,सावरकर घडले,असंख्य थोर पुरूष महात्मे,संत घडले.या सर्वांच्या मागे कोण होते घडवायला.ती स्वता:च घडली.व त्यांनी इतरांनाही घडविले.


 शिक्षण आणि समृद्धी

जीवन जगायला शिकवितो

शिक्षण हे प्रगतीचे द्योतक 

माणसाला माणूस बनवितो...


Rate this content
Log in