Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Pallavi Udhoji

Others


2.5  

Pallavi Udhoji

Others


हरवलेली माणुसकी

हरवलेली माणुसकी

3 mins 634 3 mins 634

कशातच मन रमत नव्हतं. लहानपापासून ते आतापर्यंत संपूर्ण आयुष्य कष्टात गेलं फक्त आशेवर जगावं येवढाच ह्या आयुष्याने दाखऊन दिले. नुसती धावपळ ह्याचासाठी जागा, त्याचसाठी झटा ह्याला काय हवंय त्याला काय हवंय पण स्वतःला काय हवंय हे कधी बघितलेच नाही. स्वतःचा कधी विचार केलाच नाही खूप साऱ्या जबाबदाऱ्या आर्थिक तर कधी भावनिक पेलता पेलता कधी अर्ध आयुष्य पटापट सरल ते समजलंच नाही. आयुष्य हे एखाद्या पत्त्याप्रमणे हातून निसटून गेल्यासारखं झालं. समोरच्याला आपण समजण्यात खूप मोठी चूक करतो.

कधी कधी काय होत आपण ज्याला आपलं मानतो तो धोका देऊन जातो. त्याचे कटू शब्द मनावर आघात करतात सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे शब्द का आघात करतात त्याचा परिणाम आपल्या मनावर इतका होतो की तो कितीही विसरायचं म्हंटला तरी विसरता येत नाही पण ते शब्द इतके कटू अनुभव शिकवून जातात की आपण जेवढं ताणायचा म्हंटला तेवढं ताणला जातो. समोरच्या व्यक्तीमध्ये आपण कितीही बदल आणायचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती बदलायला तयार होत नाही.

आयुष्यात कितीतरी असे प्रसंग आले त्या प्रसंगाने मनावर आघात केला.त्यातून सावरायचं प्रयत्न करते न करते तोच दुसरा आघात डोळे उघडून समोर उभा राहतो. काय चाललय काहीच कळत नाही. आपण समोरच्याच भल करायला जातो पण आपल्याच अंगावर वेगळाच प्रसंग ओढवतो. माणूस असा vimgical का वागतो? माणुसकी आज जिवंतच नाही राहिली का? अरे, माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाचा केलेला आदर, माणुसकी म्हणजे निस्वर्थपणे दुसऱ्याला केलेली मदत. खरोखर ही माणुसकी ह्या समाजात आपल्याला पाहायला मिळते का? आज रक्ताची नाती आघात करतात. एकमेकांच्या जीवावर उठतात. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात अगदी खोलवर निरखून पाहा की खरोखर ही माणुसकी राहिली का? आपण जन्माला येतो ते आपल्या कर्माने, तुमच्यातला दृष्टीकोन, आपली नाती, आपली वागणूक, त्यातला प्रेमभाव हे सगळं ठरवेल आपला मित्र कोण, आपला शत्रू कोण आणि आपला कोण. मनुष्याचे मोठेपण हे त्याचा वयावर नाही तर त्याच्या अंगातला गुणावर, त्याच्या विचारावर अवलंबून असतं. तुमच्या विचारावर तुमचे कार्य झळाळत असतं. तुमचे विचार समजले की तुम्हाला समजायला वेळ नाही लागणार की तुम्ही व्यक्ती म्हणून कशा आहात.

आयुष्यात आलेल्या प्रसंगाने मनावर आघात केल्या जातो. पैशासाठी माणूस एकमेकांवर आघात करतो.वडिलांना जाऊन दोन, तीन दिवस होत नाही त्या दुःखातून सावरत नाही तर आईला हिस्सा मागितल्या जातो. त्या माऊलीच्या मनाचा कोणीही विचार करत नाही.माणसाला पैसा इतका प्रिय आहे की आपण काय वागतो ह्याच त्याला भान नाही राहत. असे आपण समाजात कितीतरी प्रसंग पाहतो.

ह्या धकाधकीच्या जीवनात आज प्रत्येकजण पैशाच्या मागे धावत आहे. ती गराजपण आहे माणसाची. पण इतकं मागे नको लागायला की त्या पैशाच्या हव्यासापाई माणूस आपली माणुसकी हरवून बसेल. एक उदाहरण बघू रस्त्यांनी जाताना एखादा अपघात होतो लोकांची mentality बघा त्याला दवाखान्यात नेण तर सोडाच त्याच्या खिशातले पैसे व मोबाईल हिसकावून पळून जातात पण त्याला उपचारासाठी दवाखान्यात न्यायला कोणी तयार होत नाही. ही factआहे माणुसकीची. असे रोजच्या दैनंदिन जीवनातले अनेक प्रसंग घडतात. का इतका अधीन झाला आहे माणूस की तो माणुसकी पूर्णपणे विसरला आहे.मनावर झालेला आघात कितीही विसरायचं म्हंटला तरी तो विसरता येत नाही. दिवस पटापट निघून जातात. झालेला आघात हळूहळू अंधुक होऊ लागतो पण तो पूर्णपणे नाहीसा होत नाही. पुढे येणाऱ्या दिवसात काही अशी आठवण होऊन पुन्हा त्यात ओढल्या जातो. मनाची मानसिकता हे मानायला तयार होत नाही की "जाऊ दे जे झाला ते विसर " पण हा "पण" मध्ये येतो.काही ओळी ओठी येतात

" नव्याने जन्म घेऊनी

नव्याने जगणं शिकावे

नको त्या आठवणी

नको ते दिवस

आनंदाने हसत जगावे.


Rate this content
Log in