Savita Jadhav

Others

4.0  

Savita Jadhav

Others

हृदयस्पर्शी

हृदयस्पर्शी

3 mins
347


अनामिका....मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी. आईबाबा, बहिणी,भाऊ,चुलतेमालते,आजा,आजी,सगळ्यानी भरलेला एकत्र परिवार.लाडात वाढलेली. शिक्षण पूर्ण करून लग्नाच्या तयारीत होते घरचे. दिसायला देखणी, गोरीपान, नाकशेर,लांबसडक केस,खूपच सुंदर होती.संस्कारक्षम होती. कुणीही ब़ोट दाखवून देईल असा एकही दुर्गुण नाही.

मुलाकडची मंडळी बघायला आली. मुलगा अभय इंजिनिअर,दिसायला रूबाबदार, मोठ्या कंपनीत नोकरीला. घरची परिस्थिती उत्तम. नकार देण्याचा प्रश्न नव्हताच. दोघांची पसंती झाली. लग्नाच्या बोलाचाली झाल्या. लग्न होऊन अनामिका सासरी आली.लग्नाच्या नंतरच्या सगळे विधी पार पडले.... देवदेवतांच्या दर्शन, सगळं आटोपून परत पाठवणी झाली. दोन दिवसांनी पुन्हा सासरी आली. आता कुठे खऱ्याखुऱ्या तिच्या आणि अभयच्या सहजीवनाला सुरुवात होणार होती. मधुचंद्राची रात्र...प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येणारी अविस्मरणीय, सुखद घटना... अनामिका ने देखील खूप स्वप्ने मनात सजवली होती...पहिल्या रात्री ती अभयची वाट पाहत खिडकी शेजारी बसली होती...सुखी संसाराची स्वप्ने रेखाटण्यात मग्न होती. इतक्यात दारावर टकटक झाली...

अभय होता....

त्याने आतून दाराला कडी लावून घेतली. अनामिकाला जवळ ओढून घेत तिच्याशी प्रेमळ चाळे करू लागला. अनामिका अगदीच लाजून चूरचूर झाली होती.

दोघेही एकमेकांच्या कुशीत तो क्षण अनुभवत होते...अभय तिच्यावर तिच्या सौंदर्याची उधळण करत होता...


मोहक तुझे रूप साजनी...

कितीक मी पाहू....

नको आता दुरावा...

एकमेकांचे होऊ....

गोरा गोरा रंग तुझा...

निळेशार डोळे...

कमनीय बांधा हा...

अन सळसळणारे केस काळे...


अचानक... अभयने अनामिकाला दूर ढकलून दिले.

तिला काही कळेना. काय झाले. आतापर्यंत प्रेमरसात आकंठ बुडू पाहणारा अभय अचानक असा परक्यासारखं का वागायला लागला.. खूपच भेदरली ती... थोडावेळ खोलीत निशब्द शांतता पसरली. अनामिका भेदरलेल्या आवाजात अभयला काही विचारू पाहत होती.पण हा मात्र काही ऐकून घ्यायचे किंवा सांगायचे मनस्थितीत नव्हता. तडक खोलीबाहेर पडला.अनामिका मात्र काय झाले या विचारात रात्रभर पलंगाला टेकून बसली होती. सकाळ झाली.. सगळेजण आपापले आवरून हॉलमध्ये नाष्ट्यासाठी एकत्र जमले.


अभय....संतापलेल्या स्वरात... आपली फसवणूक केली गेली आहे... सौंदर्याच्या नावाखाली एक को... को... कोडी... कोड असलेली मुलगी आपल्या गळ्यात बांधली... आईबाबा मला या मुलीशी संसार करायचा नाही... मी नाही राह शकत या मुलीसोबत... तुम्ही तिला तिच्या माहेरी सोडून या... आत्ताच्या आत्ताच...मला तोंडही बघायचे नाही तिचे.


अनामिका....

कोड.....कधी....कुठे....कसा..... मला कसं नाही समजले. अनेक प्रश्न तिच्या मनात थैमान घालत होते. सासरची मंडळी म्हणायला सुशिक्षित होती.. पण कुणीही अनामिकाच्या बाजूने उभं रहायला तयार नव्हते... सासूसासरे तिला घेऊन माहेरी पोचले..बरं पोचले ते पोचले पण घरात जाऊन बोलावं न काय असेल तर....बाहेर अंगणात तमाशा सुरू केला.....मोठमोठ्या आवाजात बोलायला लागले.एक कोड असलेल्या मुलीला आमच्या घरात दिली. फसवणूक केली...वगैरे वगैरे. खरंतर घरातील लोक पण बुचकाळ्यात पडली हे ऐकून... कारण असं काही असेल यावर त्यांचा विश्वास बसेचना... शेवटी शहानिशा करायला आई अनामिकाला घेऊन घरात गेली.... अनामिका आरशासमोर स्वतः ला पाहत होती पण कुठे काय... काहीच नाही... मग आई पुढे झाली... तिने अनामिकाला सासरी काय काय झाले ते विचारले... अनामिकाने आईला सगळं सांगितले... आईने अनामिकाचे केस पाठीवरून हलकेच बाजूला सारून बघितले... बघते तर काय... आईच्या पायाखालची जमीनच सरकली...


अनामिकाच्या पाठीवर कपड्याने झाकून बंद असलेल्या भागावर एक रूपयाच्या नाण्याएवढा कोडाचा चट्टा आईला दिसला... गळून गेली बिचारी पोरीच्या काळजीनं... बाहेर येऊन शांतपणे उभी राहिली... सगळ्यांना काय समजायचं ते समजले... सासरची मंडळी तमाशा करून अनामिकाला कायमचे माहेरी सोडून गेली... पण जाता जाता कुणालाही न माहिती असणारी गोष्ट... सगळीकडेच पसरवून गेली... ज्या मुलीच्या सौंदर्याचं गुणगान करणारे आता तिच्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघत होते.... घरातील लोक पण तुटक तुटक वागू लागले होते. अनामिकाला हे घरच्या आणि बाहेरच्या सगळ्या लोकांच्या तुटक आणि तिरस्कारयुक्त वागण्याचा खूपच त्रास ह़ोत होता... खरंच यात माझी चूक आहे का? मला सतत या अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागेल का..? असंख्य प्रश्न मनात घालमेल करत होते...


शेवटी अनामिकाने एक निर्णय घेतला...

कुणालाही काही पण न सांगता ती एका रात्री अचानक घरातून निघून गेली... गेली ती कायमचीच.

समाजाने तिला नाकारली... का तर फक्त एक पांढरा डाग दिसला अंगावर.... कोडाचा....या एका पांढऱ्या डागामुळे तिची चूक नसताना तिला समाजाने नाकारली...


Rate this content
Log in