Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

होती ती चूक..

होती ती चूक..

2 mins
269



"होती ती 'चूक 'माझी  शिकून सार गेली  


आज या निमित्ताने थोडं भूतकाळात जाऊन पाहिलं...

 चूक होती तरी कुणाची ?ते त्या क्षणात जाऊन थोडं अनुभवून पाहिलं...

 चूक नव्हती कोणाची  

तरी काहीवेळा विखुरली गेली मन....

 उसळल्या लाटा,अन् हरवले सुखाचे ते क्षण ... 

" क्षमा विरस्य भूषणम् " हे जैन धर्माची आहे शिकवण ...


 छोटासा आहे संसार ..

चुका झाल्या आहे अपार..

 आपल्याच तर जवळ आहे,

 माफी मागण्याचा व माफ करण्याचा अधिकार...

 'माणूस' म्हटले तर चुका या होणारच...

 क्षणोक्षणी चुका घडतात, आणि काही वेळा आपण आपली माणसं हरवून बसतो...

चुकीचा रस्ता ,चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव जीवनात येणे अत्यंत गरजेचे आहे ... कारण चुकी असो तुमची ,माझी.. नातं तर आपलंच आहे.. त्यासाठी कधी चूक मान्य करावी लागेल, तर कधी तडजोड ही महत्त्वाची ठरेल... त्यामुळेच आपल्यासाठी 'काय' आणि 'कोण' योग्य आहे ते आपल्याला कळेल ....


 आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण चुकीचे नसतो आपण चुकीचे ठरवले जात असतो, त्यावेळी शांत बसणं योग्य असतं... समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही व आपल्याला लक्षात येत नाही म्हणूनच काय चुकलं हे शोधायला हवं....

 खरे बोलून ,मन मोकळं करून ,चूक मान्य करून मनावरचं ओझं सुद्धा काही वेळा कमी करायला हवं ... कारण मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला खूप शहाणपण लागतं ....


 आज पुन्हा एकदा भूतकाळाला वर्तमानामध्ये आणून मी बघते...

 गतकाळात माझ्याकडून झालेल्या कळत-नकळत चुकांची... मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांची, माझ्या संपर्कातील जवळच्या लोकांची, माझ्या सभोवतालच्या जैविक अजैविक घटकांची, मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत प्रत्येक व्यक्तीची मनापासून माफी मागते

कारण कधी कधी कळत नाही चूक कोणाची?  चूक कोणाची असली तरी मात्र कधीतरी मी पण चुकले असेल, कधी बोलण्यातून तर कधी वागण्यातून, चुकत गेलेच असेल..  

कधी डोळ्यांना दिसले नाही कधी कानांनी ऐकले नाही नक्की चुकलं काही....

 चुकले असेल मी शब्दात , पण चूक नव्हती अर्थात..

 जगात सगळ्या गोष्टी सापडतात पण ....

 स्वतःची चूक कधी सापडत नाही...

 म्हणूनच चूक,बरोबरीची जाणीव करून द्या, मन मोठं करून एकदा मला माफ करून द्या...


 चूक लहान की मोठी हे महत्त्वाचं नसतं प्रत्येक चुकीतून आपण काहीतरी शिकत असतो ...तेच खरं आपलं प्रायश्चित असतं...

 म्हणूनच काहीतरी सांगावसं वाटतं ...

 पुन्हा आयुष्य बहरणारं असेल तर काय हरकत आहे माफी मागायला ,माफ करायला...

नाहीतर आठवणी तर आहेतच मनातल्यामनात झुरायला..

 म्हणूनच  

असेल नसेल चूक मान्य करूया,

 थोडे मोठे मन करून ति चूक  

माफी मागून,कधी माफ करून सुधारून घेवू या... उत्तम क्षमा, सबको क्षमा, सबसे क्षमा... = 


Rate this content
Log in