Preeti Sawant

Others

4.5  

Preeti Sawant

Others

हिममानव (येती)

हिममानव (येती)

3 mins
541



तुम्ही कधीही हिमालयात गेला नसलात तरीसुद्धा येती कसा दिसतो, याची कल्पना तुम्हाला असेलच!!


बर्फाळ प्रदेशात राहणारा माणसांसारखाच दोन पावलांवर चालणारा पण दिसण्याच्या बाबतीत वानर आणि माणूस यांचे मिश्रण असलेला हा हिममानव तिबेट, नेपाळ आणि हिमालयाच्या बर्फाळ डोंगरामध्ये आजही राहतो. त्याला “बिगफूट” किंवा “येती” या नावाने ही संबोधले जाते.


हा हिमालयात राहणारा अत्यंत गूढ प्राणी आहे.


तो खरंच अस्तित्वात आहे किंवा नाही यावर शास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही परंतु अनेक दशकांपासून हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशात हिममानव बघितल्याचा दावा अनेक लोकांनी केला आहे.


गेली अनेक दशकं सिनेमे, कार्टून, व्हिडियो गेम्स यामधून येती तुमच्या परिचयाचा झाला असेल. मोठमोठे पाय आणि अनकुचिदार सुळे असलेला महाकाय केसाळ प्राणी, असं येतीचं चित्र रंगवलं जातं. तो करड्या किंवा पांढऱ्या रंगाचा असतो. बर्फाळ हिमालयात तो एकटाच फिरताना नेहमी दाखवलं जातं.


येती हा महावानरसदृष्य मनुष्य (ape man) असल्याचा समज आहे. पूर्व नेपाळमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या शेर्पा या समाजाचा इतिहास, त्यांच्या प्राचीन आणि पौराणिक कथांचा तो एक भाग आहे.

जगभरात 'बिगफूट' म्हणजेच महाकाय पावलांच्या ठशांच्या कथा सांगितल्या जातात.


९ एप्रिल २०१९ रोजीही हिममानवाच्या पावलांचे ठसे भारतीय सेनेच्या एका टीमला नेपाळच्या हद्दीत जवळ असलेल्या मकालू बेसजवळ आढळले. हे ठसे जवळपास ३२X१५ इंच इतक्या मोठ्या आकाराचे होते भारतीय सेनेच्या या घोषणेमुळे येती हा हिममानव अस्तित्वात आहे की नाही या विषयावर तज्ञांची आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे..


शिवा धाकल यांनी 'Folk Tales of Sherpa and Yeti' या त्यांच्या पुस्तकात १२ पुराणकथांचा समावेश केला आहे. या कथांमध्ये येती धोकादायक, भीतीदायक चितारण्यात आला आहे.


१९५०च्या दशकात तर या हिममानवाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्याच्या शोधासाठी गिर्यारोहकांनी अनेक मोहिमा आखल्या.

हिमालयात कधी कुणाला एखादी कवटी, हाडाचे तुकडे किंवा केस सापडायचे. हे येतीचे असल्याचं सांगितलं जायचं. मात्र, निरीक्षणाअंती ते अस्वल किंवा माकडाचे असल्याचं सिद्ध व्हायचं.


कुठलाच ठोस पुरावा नसतानाही आजही अनेक जण हिमालयात येतीच्या शोधात जातात. येती हे 'क्रिप्टोझुऑलॉजी'चं उदाहरण आहे. क्रिप्टोझुऑलॉजीमध्ये अशा प्राण्यांचा शोध घेतला जातो जे खरंच अस्तित्वात आहे की नाही, हे पुरावा नसल्याने खात्रीशीरपणे सांगता येत नाही.


येतीचा शोध घेणाऱ्यांमधलं सुप्रसिद्ध नाव म्हणजे रेनहोल्ड मेसनर. १९८०च्या दशकात हिमालयामध्ये आपण येतीला बघितल्याचा दावा त्यांनी केला होता आणि मग याच येतीचा शोध घेण्यासाठी ते अनेकदा हिमालयावर गेले.


१९५३ ला एवरेस्ट च्या पहिल्या मोहिमेत सर एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे ह्यांनी एवरेस्ट वर यती च्या पाऊलखुणा दिसल्याची नोंद केली आहे. ह्या नंतर अनेक गिर्यारोहक ते अनेक सामान्य लोकांना हिमालयात यती च्या पावलांचे ठसे दिसल्याची नोंद जगभर झाली आहे.


नेपाळमधील दंतकथांमध्ये यतीचा उल्लेख त्रास देणारा हिमामानव असा आहे. हा एखाद्या मोठ्या अस्वलासारखा दिसतो. सामान्य पुरुषाच्या उंचीहून अधिक उंच असणारा हा प्राणी दोन पायांवर थोडा पोक काढून चालतो. हा प्राणी हिमालयात, सैबेरियात आणि मध्य तसेच पूर्व आशियामध्ये अढळतो.


१९२० च्या दशकापासून हिमालयामध्ये भटकंतीसाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांनाही यती शोधण्याचा मोह आवरला नाही. मागील शतकभरामध्ये अनेक गिर्यारोहकांनी यतीला शोधण्यासाठी हिमालयामध्ये पायपीट केली आहे. काही वेळेस त्याच्या पावलांचे ठसे तसेच केस सापडल्याचेही सांगितले गेले. मात्र माणसाच्या नजरेतून निसटणारा हिममानव म्हणून लोकप्रिय असणारा हा प्राणी कधीच कोणाला सापडला नाही वा इतक्या वर्षांमध्ये या प्राण्याचा एकही फोटो कोणालाही काढता आलेला नाही.


Rate this content
Log in