हेच माझे छंद
हेच माझे छंद


मला कविता शायरी लिहायची आवड़ लग्नाच्या आधीपासूनच होती. नंतर घरातली जबाबदारी आणि नोकरीच्या गड़बड़ीत कुठेतरी हरवून गेली.
तरी ऑफिसमधे नोटिंग-ड्राफ्टिंगच्या सूक्ष्म रूपात लेखन सुरू होते.
पण 3 वर्षांपासून तब्येतीमुळे काही बिकट परिस्थिती समोर आल्या आणि त्यातून फार हिंमतीने बाहेर पड़ले. त्यामुळे नोकरीसुद्धा सोडावी लागली. तेव्हा मला काहीच सुचेनासे झाले, आत्मविश्वासच हरवला माझा.
पण मी माझ्यातला मी शोधण्यासाठी डायरी लिहायलासुद्धा सुरू केली हो, मग माझ्या यजमान-मुलांनी पुन्हा जागरूक केले. आज ह्या विशाल मंचावर माझी आवड़ हिंदी-मराठी लेखनाच्या रूपात पूर्ण आत्मविश्वासाने पुन्हा मिळाली हो. माझ्या आवडीनीच दिले मला नवजीवन, सर्वांनी केले पूर्ण उल्हासानी माझे अभिनंदन!