हे सारं काही 'Lockdown' मुळे.. (भाग पहिला)
हे सारं काही 'Lockdown' मुळे.. (भाग पहिला)
(भाग पहिला)
सुयोग आज परदेशातून घरी येणार होता. डिव्होर्स ची प्रोसिजर सुरू करायची होती. वकिलांची तारीख घेतली होती शिवाय काही पेपर वर त्याच्या आज सह्या लागतील म्हणून शुक्रवारी निघाला आणि त्याच रात्री निघून वीकेंड मिळतील त्यात ऑफिस ची राहिलेली काम करता येतील असा विचार केला होता. मेघा आणि सुयोग चा सात वर्षांचा संसार त्या संसार वेलीवर सुयश नावाचं पाच वर्षांच फुल देखील होत. पण सुयोग लग्न झाल्या पासून परदेशी कामाला असल्याने तिथेच राहायचा. अधून मधून सुट्या मिळाल्या की येई. सुयश झाल्यानंतर एकटी असणारी मेघा त्याच्यात पूर्णपणे गुरफटून गेली. घरची कामे, ऑफिस चा थकवा आणि सुयश ची देखभाल करण्यात तिचा दिवस जाऊ लागला. शारीरिक त्रासासोबत तिला मानसिक आधाराची गरज होती. लग्न झाल्यावर त्या नंतर ची कर्तव्य पार पाडत असताना जोडीदार ची सोबत ही लागतेच. तो प्रेमळ आधार सुयोग कडून मिळत नव्हता. तो नेहमी त्याच्या ऑफिस च्या कामात व्यस्त राहायचा. मेघा ने खूपवेळा बोलून दाखवली होती गोष्ट पण हे सगळ आपल्यासाठी करतोय अस म्हणून तो नाराज होत. आई बाबांना देखील ही गोष्ट सांगितली पण त्यांचही हेच म्हणणं होत. तिलाच मग अपराधी वाटत राही. पण तिला ही
खूप वाटे सुयोग ने थोडे दिवस का होईना आपल्या सोबत राहावं.
एकतर येतो ते ही तीन महिन्यातून आठवडाभर त्यात त्याच्या आरामामुळे दोन दिवस असेच निघून जातात. त्याला आई वडील घरी हवे असतात. मान्य आहे ते आई वडील आहेत पण एक नवरा म्हणून बायकोला विचारपूस नको का करायला. मी फक्त सगळ्यांना आवडत ते बनवून खायला घालत राहायचं. शेवटचे काही दिवस मित्र मंडळीला भेटून यायचं. इथल्या बँकेची काम असतील ती करायची नाहीतरी सोबतीला ऑफिस चे कॉल्स असतात. मग शेवटचा दिवस हॉटेल. जेव्हाही तो घरी यायचा हेच रूटीन असायचं.
एका पॉइंट ला तिला असह्य झालं आणि अचानक मेघा ने काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला होता.सुयोग ला कळलं तेव्हा तो खुप बिथरला होता. घरात सर्व सुखसुविधा होत्या. त्याच्या घरून देखील काही सासुरवास नव्हता. हवं तस ती तिची लाईफ जगात होती त्यामुळे तिच्याकडून अस काही ऐकण्याची त्याला अपेक्षा नव्हती. ती ऐकत च नव्हती म्हणून त्यानेही होकार कळवला. पुढच्या आठवड्यात च घरी येऊन ते वकिलांची तारीख घेणार होते आणि ह्याबाबत आता घरी काहीही न सांगण्याच दोघांनी ठरवलं.सुयोग ने दारावरची बेल वाजवली. दार उघडून मेघाने त्याला आत घेतल. ती नुकतीच झोपेतून जागी झाली होती.