गुरूचे महत्व
गुरूचे महत्व


मी इंदौरला नोकरी करत असताना काका, काकू, आत्या व आजीसोबत राहायचे. एके दिवशी काकूंनी चुलत बहिण व इतर काही नातेवाईकांना जेवायला बोलावले आणि पुरण करायचे ठरविले. मी आईला नेहमी पुरण करताना बघायची तर मला थोड़ी माहिती होती.
नेमक त्याच दिवशी मला ऑफिसमधून यायला उशीर झाला आणि घरी येऊन बघते तर काय सर्व अगदी आतूरतेने माझी वाट पाहात होते. काकूला पुरण करायचे जमले नव्हते. मी जशी घरी पोहोचले, तशी आत्या म्हणाली, अगं पहा गं पुरणाला कसे ठीक करायचे. तो दिवस आयुष्यातला मोठं यश मिळवणारा ठरला.
आईची शिकवण आणि मोठ्यांच्या आशिर्वादाने मी ते पुरण ठीक करून पोळ्यासुद्धा केल्या. आजही मी ह्यांना व पोरांना करून खाऊ घालते आणि माझे काका आजही पुरणाची पोळी आनंदाने खातात.