Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

गुरू

गुरू

1 min
116


  आज ज्यांनी आपल्याला भरभरून दिले, त्यांच्या पायावर डोकं ठेवण्याचा एक कृतज्ञ व्यक्त करतो. ही कल्पना एका दिवसाची नाही गुरुचरणी नतमस्तक व्हायला ना मुहूर्ताची गरज असते ना निमित्ताची! 'तेरा तुझको अर्पण' असं म्हणत आपलं सारं त्यांच्या पायाशी ठेवायचंअसतंं आणि कायम त्यांच्या ऋणात राहून त्यांच्याकडून सतत नवनवीन शिकत रहायचं. आयुष्यभर चालणारंं हे अविरत चक्र आहे. 


  फार पूर्वीपासून आपल्या कडे एक वाक््य प्रचलितच आहे--गुरू मिळणं हाा नशिबाचा  भाग आहे आणि चांगला गुरू योग्य वेळी लावणे हे तर केवळ सुदैवाने! सगळ्याच्याच वाटयाला नाही येत गुरू लाभण्याचं भाग्य कित्येकांच्या वाटयाला तर केवळ एकलव्याचं दु:ख! आजच्या काळात कोणता व्यक्ती कोणाच्या वाटयाला धरुन मार्ग दाखवतो? नि:स्वार्थ भावनेने दुसऱ्या कोणाचे आयुष्य घडवायला वेळ आहे कुठे कुुुुणााला? आणि दुसऱ्या कुणावर मनापासून विश्वास ठेवत आपली वााट चालावील असा भरोसाआपल्याला तरी कुठे वाटतो?. 


    हे प्रश्न चुकीचे नाहीत पण बरोबरही  नाहीत. कारण आजही गुरू नवनवीन रुपात, नवनवीन संदर्भात भेटतो. पूर्वीसारखे सर्वच ज्ञान एका व्यक्तीकडून मिळेल असं आता उरलय कुठे? एकाच वेळी आपले अनेक गुरू ही असू शकतात. आणि कदाचित एकच गुुरू आपल्यालाआयुष्यभर पुरून उरेल अशी जगण्याची दृृष्टीही देेऊशकतो. पण गुरू मिळतो म्हणजे नक्की काय होते? कोणाला म्हणणार आपला गुरू ?. 


  गुरू म्हणजे आपल्या आयुष्यात जादूची कांडी फिरवून चमत्कार घडवणारा जादूगार आहे का? नाही अजिबात नाही. आपला गुरू आपल्या

अवतीभवती असेल आपल्यासारखाच चालत असेल. आपली आणि त्यांची भेट अशीच एका पवित्र शाळेत जिथे ज्ञानदानाचे पवित्र कार्य होते. तिथे गुरूनी आपल्याला योग्य दिशा, योग्य वाट सापडली म्हणून तो आपल्याला विचार करायला भाग पाडतो,आणि त्या विचारधारेने विद्यार्थी

उच्च पदावर पोहचतो.


Rate this content
Log in