krishnakant khare

Others

4.5  

krishnakant khare

Others

गुरु चे महत्त्व

गुरु चे महत्त्व

7 mins
757


माणूस या जगात येतो पण जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला गुरु शिवाय पर्यायच नाही मग तो आईच्या रूपात असो मग तो वडिलांच्या रूपात असो मग तो भाऊ-बहिणीचा रूपात असो मग तो नातेवाईकांच्या रूपात असो मग तो इतर कोणाचाही रूपात असो गुरु हा गुरुच असतो.ज्या गोष्टी पासून माणसाला काही अर्थबोध होतो,शिकायला मिळतं,सामाजिक प्रबोधन होतो ती गोष्ट छोटी असो की मोठी ती गुरुच्या जागेवर म्हणून त्याचाही आदर असायलाच पाहिजे. जन्माने येणाऱ्या बाळाला या सर्वां कडुन त्याच्या पुढच्या भविष्यात संवर्धनासाठी गुरु प्रमाणे साह्य घ्यावेच लागते. 

गुरु कधीकधी स्वतः गोत्यात येतो पण शिष्याला अडचणीत आणत नाही. अशाच प्रसंगातली हि एक गोष्ट एकदा होतं काय...... 

कृष्णा आणि शेजारचा दिनेशयादव आणि त्यांचे इतर चारपाच मित्र जंगलात पिकनिक साजरी करायचा बेत करतात.आणि  पिकनिक बर्यापैकी पारही पाडतात.पण दिनेशच्या धांदरटपणामुळे दिनेशला धबधब्याच्या खाली छोटी नदीसदृश्य पात्रात ऊडी मारताना डाव्यापायाला मुका मार लागतो,या आधी कृष्णा त्याला समजावित होता" देखना दिनेश

इस नदी में लंबी छलांग कुदी मत मारना,और इससे तुझे समझ में नही आता तो वनखाते का जो प्रोव्हिबिटेड बोर्ड लगाया है।उसे अच्छे से पढ लेना,और लंबी डोव्हिंग मत मारना"पण या वेळी दिनेश कृष्णाच्या या गोष्टी ऐकाच्या मनस्थितीत नव्हता ,पण या आधी दिनेश कृष्णाला मोठ्याभावाप्रमाणे मानत होता,कृष्णा पण आपला छोट्या भावाप्रमाणे दिनशला मानत होता,दिनेश एक मोठ्या भावाचा आदर म्हणून कृष्णाला नावाने हाक न मारता मोठा भाऊ अर्थात "अप्पा" असं हाक मारायचा म्हणून कृष्णा सुद्धा त्याला मायेने त्याची काळजी घ्यायचा. त्याला कुठे कधी अडीअडचणी येऊ नये म्हणून गुरू प्रमाणे मार्गदर्शन करायचा दिनेश सुद्धा शिष्याप्रमाणे आदराने त्याच्या गोष्टी ऐकायचा पण आज दिनेशला जंगल्यातल्या या नैसर्गिक धबधबाचे,नदीचे आकर्षण फार वाटले.धबधब्याच्या पाण्यात व छोट्या नदीत खेळेन या आशेने दिनेशला फार आनंद झाल्याने कृष्णाचे इंस्ट्रेक्यंशन ऐकायला दिनेशचे मन थार्यावर नव्हते. आज दिनेश कसला कोणाचा ऐकायला,आणि ह्या पाण्यात जोशात किती वेळ तरी मित्रांबरोबर पाण्यात खेळत राहिला.शेवटी जे व्हायचे नव्हते तेच झाले एकदा दिनेशने खेळायच्या जोशात उंच उडी पाण्यात मारल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने दिनेशच्या डाव्या पायाला जबर मुका मार लागला,त्याच्या असहनीय  वेदना वाढल्या.

 या जंगला पासून ते गावापर्यंत जायाला अर्धा-पाऊण तासाचा रस्ता, मग कृष्णा भडकतो आणि म्हणतो"मी ऊगाच नही बोललो,खरं तेच बोलेलो,दिनेश तुझे ईसलिए पहले से यही समझा रहा था।आज तक किसी ने पंगा लिया है आग से,पानीसे,लाईट के बिजली से खेलने का ?"वही जल के राख हुवा है,मतलब कोई मौत से गया या कोई अपाहिज हुवा"पण इतक्यात हमिद कृष्णाला बोलला "वो तो ठिक है लेकीन अब दिनेश को घर कैसे लेके जाये?"तितक्यात जोन गोन्साविलीस बोलला "ईतना टेन्शन क्यों लेता यार कृष्णा संभाल लेगा कृष्णाचा राग काही थंड झाला नव्हता तो म्हणाला "अब भुगते वो अपना करम का फल ,मैं कब से जी तोडकर कह रहा था?अरे ये पानी है, यहा संभालके खेलों लेकीन नही, मेरे बात का कोई ध्यान दे तब ना"

पण एवढ्या वेळात कृष्णाचे बोलणे सगळ्यांना पटले होते,दिनेश मध्येच बोलला "सोरी अप्पा गलती हुवी अब ऐसी गलती नही होगी "अशा दिनेशच्या चुक कबुल वृत्तीने क्षमा मागीतल्याने सातव्या अस्मानात चढलेला कृष्णाचा गुस्सा त्वरीत थंड झाला,

(बघितलं खरंच आपल्याकडुन चुक झाली असेल तर लगेज कबुल करुन त्याबद्दल क्षमा मागण्याची वृत्ती ठेवली तर ना सगळ्या गोष्टी कशा सोप्या व पुर्ण टेंशन दुर गेल्यासारखं होतं,) दिनेशला कृष्णा मोठा भाऊ म्हणून हवा होता,त्याला अशा छोट्यामोट्या चुका करुन नातं तोडायचं नव्हतं,म्हणून क्षमा मागून दिनेशने कृष्णाचे मन जिंकले होते.कृष्णाचा राग थंड झाला होता,दिनेशला पण पटले होते,मोठा भाऊ सारखा राहून कृष्णा गुरुच्या सारखाआपल्याला मार्गदर्शन करतो त्यात माझं भलं आहे,मी जर अप्पाचे ऐकले असते ,तर हे संकट माझ्यावर आले नसते. 

कृष्णाने आपल्या बैगेतली फर्स्ट ऐडचा बोक्स काढला,कृष्णाला माहित होतं पिकनिक असो,किंवा कुठलाही प्रवास असो बैगेत फर्स्ट ऐडचा बोक्स जवळ असलेला बरा.कृष्णाने फर्स्ट ऐड बोक्स मधून वेदना कमी व्हायच्या गोळ्या दिल्या,आयोडेक्स मलम हळूवार लावलं,कारण मुका मार लागल्यावर मार लागलेल्या भागाला रगडून मसाज करायचं नसतं नाहीतर मुका मार बसलेल्या भागातल्या रक्तवाहिन्यांना, मुका मार बसलेल्या भागाला अजून इजा होऊ शकते.हे कृष्णाला पण माहित होते.दिनेशने गोळी घेतल्याने व मलम लावल्याने थोडं बरं वाटत होतं,आता सगळ्यांनी आपलीआवराआवर केली व आपल्या घरी जायला निघाले पण दिनेशला चालताना पाय दुखायचा ,तो पुर्णत:लंगडत चालत होता,आता बाकीचे त्याच्याच वयाचे चौदापंधरा वर्षाचे त्यांना कुणाला दिनेशला उचलून घरी नेता आलं असतं,कृष्णाने हे पाहिले आपण यांच्याहुन आठनऊ वर्षाने मोठे आहोत आपण दिनेशला घरी उचलून घेऊन गेलो पाहिजे,कृष्णाला दिनेशची दया आलीआपण मोठाभाऊ आहोत हे समजून कृष्णाने दिनेशला खांद्या, कंबरेवर घेऊन घराच्या दिशेने निघाला ,बाकीच्याने टाळ्यावाजून "गुरु अप्पा गुरु कि जय हो! "असे बोलत घरच्या दिशेने रवाना झाले पण वाटेत गावातला डॉक्टर त्यांना भेटला, दिनेशला खांद्यावर घेतलेला कृष्णाला बघितल्यावर डॉक्टर बोलले"ये क्या घोडागाडी जैसा लेके जा रहा है,"हे ऐकल्या बरोबर कृष्णाला वाटलं काय हे मी दिनेशला उचलून घरी घेऊन चाललोय आणि हे काय मला डॉक्टर घोडागाडी बोलताय,दिनेशला इथेच खाली ठेवू का असं झालं होतं.पण कृष्णा पटकन बोलला "डॉक्टर ,दिनेश के पैरों को मुकामार लगा है,उसे चलने को तकलीफ हो रही हैं इसलिए मैं उसे उठा के ले जा रहा हुं"लगेज डॉक्टर बोलले " शाबाश,अच्छा काम कर रहे हो,तुम्हारा छोटा भाई लगता है,शाम को क्लिनिक में ले आना," हे ऐकून कृष्णाला असं झालं कि मी डॉक्टरांना कसं सांगू की दिनेश शेजारी जरी असला तरी तो छोट्याभावा सारखाच चांगला आहे म्हणून, कारण दिनेश कधी पण माझ्या मदतीला येत असतो,डॉक्टर आपल्या जोगिंगसाठी पुढे निघुन गेले आणि कृष्णा,दिनेश मंडळी आपल्या रस्ताने पुढे जातात समोरच श्री दत्ताचे मंदिर लागले म्हणून कृष्णा म्हणला "कबसे दिनेश को ऊठा लिया है ,अब मैं थक चुका हुं चाहे तो हम इस श्री दत्त मंदिर में भगवान का दर्शन करते हैं और थोडा देर आराम करते फिर चलते है," कृष्णा ची हि गोष्ट सगळ्यांना बरी वाटली काहिकांनी देवाचे दर्शन घेतले,काहीकांनी मंदिराजवळच्या  पाणपोईतून पाणी पिऊन तहान भागवली,इतक्यात त्यांच्यातला सिद्धार्थ कांबले बोलला" अरे सब यहां तो देखो,दिवाल पे श्री दत्तजी के 24 गुरु के बारें में कितना अच्छा लिखा है" आणि सगळे भिंतीवरचे श्रीदत्त त्यांचे 24 गुरु हे वाचायला लागले.......   

श्री गुरुदत्त हे सर्वदेवलोकात पूजनीय असुन सुद्धा त्यांनीसुद्धा चोवीस गुरु केले होते.

त्यात छोट्या पासुन ते मोठ्या पर्यंत गुण घेतले व त्यांना गुरू केले.प्रत्येक गुरु मध्ये त्यांना त्यांचं महत्त्व कळलं होतं.  

ते गुरु खालील प्रमाणे 


1)पृथ्वी: 

त्यांच्याकडून धैर्या क्षमा हे संस्कार घ्यावेत 2)प्राणवायू: शरीरालाआवश्यक तेवढेच आहार घ्यावा.3)आकाश:

 प्रत्येक परिस्थितीत निर्विकार रहाणे हे गुण आपण आकाशाकडुन घ्यायला हवा 

4) जल:

 सजीवांचे तहान भागवतो कसं तसे आपण सर्वांचे उपयोगी व्हावे 

5) अग्नि :

अग्नि कधी मध्ये धगधगत असतो कधी मध्ये पेटत असतो पण कार्य ऊर्जेचं करीत असतो त्याचा उपयोग सर्वजण करीत असतात तसेच आपण अधून मधून जनतेच्या उपयोगी पडावे म्हणजेच जसा वेळ मिळेल तसा आपण सर्वांच्या उपयोगी पडावे 6) चंद्र: 

कलेकलेने वाढतो आणि कलेकलेने कमी होतो त्याप्रमाणे आपला स्वभाव त्याचा परिणाम कमी जास्त होतो पण जीवनात अशाच काही गोष्टी कमी-जास्त पणाच्या आपल्याला अनुभवायला येतात पण चंद्रासारखे पूर्ण राहून आपण त्या गोष्टीचा आपल्यावर परिणाम होऊ न देणे म्हणजे चंद्रासारखं तटस्थ राहणे व आपला कार्यभाग ओळखणे हे गुण चंद्राकडून घेणे, चंद्र कलेसारखा प्रभाव आपल्याला होऊ न देणे 7) सूर्य: 

वेळेनुसार वेळेच्या अनुकूल उपभोग घ्यायचा आणि अनुकूल उपभोग द्यायचा.

8)कबुतर:

आपले स्वातंत्र्य हरवून दुसर्याकरीता जास्त स्नेहभाव दाखवणे हे आपल्यावर अन्याय करतो असं आहे,म्हणून मर्यादेत राहणे योग्य. . 9) अजगर: 

जे मिळेल त्या आपले जीवनमान सांभाळून घेणे 

10) समुद्र: 

समुद्राला भारती ओहोटी येतच राहतात पण समुद्रासारखा तटस्थ राहाता आलं पाहिजे म्हणजे भरती ओहोटी सारखे पण आपण त्यात स्वतःला ढळू न देणे, सुखा दुखाच्या भरती ओहिटीच्या समुद्रात आपली मानसिकता ढळू देऊ नये 

11) पतंग: 

आपला विनाश होतो त्यामागे मोह हा दुर्गुण असतो. पतंग ही अधिक मोहामुळे स्वतःला जाळुन घेतो 

12) मधमाशी: 

मधमाशी जशी छोटेमोठे मधुकण गोळा करते तसं आपण लहान पोरांकडून थोरांकडून ज्ञानाचा अनुभवायचा मधुकण जमा करायला शिकलं पाहिजे,त्याचा आपल्याला भविष्यात चांगला उपयोग होतो. 13) हत्ती: 

माणसाने आपल्या आप्तस्वकीयांच्या मोहापासून ,गैरसमजा पासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. 

14) मध गोळा करणारा: त्यांच्याकडून आपण हे शिकले पाहिजे पैसा संचलन करून संचयन करून दुःख वाढवण्यापेक्षा कामापुरता पैसा संचयन करा त्याचा योग्य वापर केला पाहिजे 15) हरीण :

 वासना जागवणारे संगीत नृत्य ,वचन गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. 

16) मासा:

 जिभेचे जास्त चोचले पुरवू नये नाहीतर स्वादाच्या मोहाने आपल्या जीवाचा बळी पडतो 

17) पिंगळा,वेश्या: आपल्याकडून वाईट कृत्य झाले असेल त्यावर पश्चाताप करून पुन्हा ती वाईट गोष्ट घडु न देणे. 18) कुरर पक्षी: जमवलेल्या पैशाचा उपभोग घ्यायला जमलं पाहिजे.  

19) बाळा:

बाळ निरागस असतो, लोभ माया नसते निर्विकार असतो ,साधा सरळ असतो त्याप्रमाणे आपला सगळा अहंकार काढून बालकाप्रमाणे राहणे 

20) कुमारिका,बांगड्या:

जेथे आवश्यक असेल तेथे एकांतात राहणे आणि स्वतःला प्रकट न दाखविणे उदा.ज्या बांगड्याने पुजेत व्यत्यय येत असेल पण स्त्रियांचं बागंडी हे आभुषण आहे, तर मग पुजासाधना पण झाली पाहिजे व बांगडी पण आवश्यक आहे तर मग हे कसे शक्य आहे,अशावेळी एकाएका हातात एकच बांगडी घालून पुजन करतात त्यानं पुजातेली एकाग्रता पण साधते व आत्मिक शांती राहते,व एक एक हातात एक एक बांगडीचे आभुषण राहते म्हणून म्हटलय

21) बाण तयार करणारा: सतत कामात राहून ईश्वरात रमणारा.

22) सर्प :

माणसाने आपल्याला आवश्यक आहे त्यातच समाधान मानले पाहिजे,जर आपल्याला उदरनिर्वाहासाठी दारोदार हिंडावे लागत असेल तर आपल्याला घराची काय आवश्यकता म्हणजेच संसार मोह त्यागनाऱ्या माणसाला घराची काय आवश्यकता. 

23) कोळी: कोळी  ईश्वर सारखा स्वताच जाळं रुपी जग निर्माण करतो आणि स्वतःजाळाचं विनाश करतो 

24) भुंगा: भुंगा कमळात मधु वेचण्यात स्वतःइतका मग्न होतो कि वेळ निघुन गेला तरी तो कमळात तसाच पडुन राहतो.कमळ आपल्या पाकळ्या मिटुन घेतात म्हणून काय तो भुंगा कमळ्यांच्या पाकळ्यांना पोखरत नाही म्हणून आपण भगवंताचे चिंतन करता स्वतः स्वरूप होऊन जातो ईश्वर रूप होऊन जातो. 

एवढे हे 24 गुरूचे महत्व सांगणारे अर्थ आहेत. आणि जीवनाला याचे बरेच अर्थ आहेत.

कृष्णा त्यातला शब्द किचकट असला ते तो 

 असे सोपं करून सांगत ह़ोता,आणि ते ऐकून झाल्यावर सगळे आता घरी जायला घाईने निघाले. ,आता कृष्णा दिनेशला आपल्या घरापर्यंत घेऊन येतो सगळ्यांना कृष्णाने सांगितलेली गोष्ट आवडलेली असते कारण गुरु चे महत्व गुरु दत्ताच्या चोवीस गुरु वरून कळतं म्हणून गुरु आपल्या शिष्याला सावरण्याचा प्रयत्न करतो पण जरी स्वता बिकट परिस्थितित असला तरी पण शिष्याला सांभाळून घेतो मग ते नाते मोठा भाऊ व छोटा भाऊचे असु द्या मग ते शेजारी शेजारी असु द्या गुरुचे महत्त्व एक वेगळाच दर्जेचा असतो.,गुरूला मनाने पण मोठे व्हावे लागते वेळप्रसंग बाका आल्यावर, म्हणुन तर गुरुचे महत्त्व आहे.
Rate this content
Log in