Shobha Wagle

Others

2.2  

Shobha Wagle

Others

गुप्त दान

गुप्त दान

10 mins
491


मालतीबाईकडे यमुना धुणी भांड्यांचे व स्वयंपाकाचे काम अनेक वर्षापासून करत होती. त्यांची प्रज्ञा व यमुनेची सीमा दोघी जवळपास सारख्याच वयाच्या होत्या. दोघीही शाळेत शिकत होत्या.

सीमा सरकारी शाळेत तर प्रज्ञा बिन सरकारी मोठ्या शाळेत. यमुना काम करायला येताना सीमालाही बरोबर आणायची. दोघी बरोबर खेळायच्या व अभ्यासही करायच्या. मालतीबाई ही सीमाला आपल्या मुलीबरोबर खायला प्यायला द्यायच्या.

त्यांच छान टुनिंग जमलं होतं. यमुनाही आपलं घरचच समजून काम करत होती. प्रज्ञाचे बाबा कामाकरता कधी कधी बाहेर गावी जायचे व येताना आपल्या मुलीकरता काही तरी भेट वस्तू आणत. तेव्हा मालती बाई म्हणायच्या," अहो सीमालाही काहीतरी आणत चला. आणि नंतर प्रज्ञाचे बाबा प्रज्ञाला आणतात तसेच सीमालाही भेट वस्तू आणू लागले. सीमा आनंदित व्हायची व यमुनेला ही खूप आनंद व्हायचा व त्यामुळे त्यांच्या कामात ती स्वतःला जोकून द्यायची.

हळूहळू मुली मोठ्या होऊ लागल्य चौथीतून पाचवीत गेल्या. अभ्यासही वाढला. दोघी बरोबरच अभ्यास करायच्या. पाचविच्या सहामाई परिक्षेत सीमाला जास्त गुण मिळाले. व प्रज्ञा थोडी मागे राहिली. प्रज्ञा अभ्यासा इतरिक्त बाकीच्या गोष्टीत ही जास्त रमायची. सीमा आईला थोडी मदत करायची व बाकीचा वेळ ती अभ्यासच करायची. तिची प्रगती दिवसे न दिवस वाढू लागली तर प्रज्ञाचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागले व व्हायचा तो परिणाम झाला. फायनल परिक्षेत दोघी पास झाल्या. प्रज्ञाचा पाचवा नंबर तर सीमाला पहिला नंबर मिळाला. शिक्षकांनी सीमाचे कौतुक केले. प्रज्ञाच्या वडिलांनी ही दोघीना एक एक फाउंटन पेन बक्षीस दिले. व सीमाला वरून एक शंभर रूपयांची नोट दिली. मालतीबाईना ही गोष्ट अजिबात आवडली नाही. त्यावरून त्या रात्री त्या दोघांच भाडंण ही झालं. व तेव्हा पासून मालती बाईच्या वागण्यात फरक जाणऊ लागला. आपल्या मुलीपेक्षा काम करणाऱ्याची मुलगी हुशार हे त्यांना सहन होईना. त्या हळूहळू तिचा द्वेष करू लागल्या.

एक दिवस यमुनेला सडकून ताप आला. एक मेटाशीन ची गोळी घेऊन ती कामाला आली. आईला बरं नाही म्हणून प्रज्ञा बरोबरचा खेळ सोडून सीमा आईला मदत करायला लागली. दुसऱ्या दिवशी ही यमूना ताप भरलेला असताना मालतीबाईकडे काम करायला आली.

अभ्यास, खेळ सोडून सीमाही आईला मदतच करू लागली. प्रज्ञा ही त्यांना मदत करायला येऊ लागली. त्या दोघीनी तिला नको नको म्हणून सांगितले तरी ती एकेचना आवाज एकून मालती बाई तेथे आली व पोरीने पाण्यात हात घातलेला पाहून एक जोराचा धपाटा तिच्या पाठीत घातला. व फरफटत ओेढून तिला बाजूला केले. ती मुसमुसत कोपऱ्यात बसली. सीमाला व यमुनेला खूप वाईट वाटले

यमुनेचा तापाचा तिसरा दिवस होता. रोजच्या सारखं तिने उठायचे केले तर तिला गरगरू लागले. तिला चक्कर येत होती. ताप ही खूपच वाढला होता. आज कामावर जाणे अश्यकच होते. तिने सीमाला मालतीबाईकडे निरोप देऊन पाठवले. आईचा निरोप सीमाने सांगितला,"आईला खूप ताप आहे व तिला चक्कर ही येतेय ती कामावर येऊ शकणार नाही" निरोप एकताच मालतीबाई ओरडल्या," मग कोण करेल काम? तू आली आहे ना? व दोन दिवस आईबरोबर काम करत होती ना? तसं आता सगळं काम तूच कर" सीमा घाबरली व तसाच तिने कामाला हात घातला. तिच्या वयाच्या मानाने ते काम खूपच जड होते. प्रज्ञा तिच्याकडे केवलवाण्या नजरेने बघत होती. तिला ही आईची भीती वाटत होती.

यमुनेला टायफोड झालेला. दहा पंधरा दिवस तर तिला काम करणे शक्यच नव्हते. सीमाच मालतीबाईकडे काम करत होती. सगळी कामे निपटून शाळेत जायला तिला उशीर व्हायचा तर कधी कधी शाळेला जाता ही येत नव्हते. प्रज्ञा रोज तिला तिच्या शाळेच्या गमंती व तिला शाळेत काय काय शिकवले ते सांगायची. सीमा रात्री घरी जाऊन प्रज्ञाने सांगितलेल्या गोष्टी तिच्या पुस्तकांतुन पडताळुन पाहत असायची.

एक दिवस साहेबाना प्रज्ञाच्या वडिलांना सीमा काम करताना दिसली. त्या बद्दल त्यांनी विचारले. "दुसरी बाई कां नाही ठेवत तिच्या बदली. कां त्या चिमुरड्या पोरीला वैठणीला लावते? तर मालती बोलली ,"दुसरी ठेवली तर यमुनेचे कामच जाईल. त्यापेक्षा थोडे दिवस हिलाच करू दे. दोन दिवस शाळा चुकली म्हणून काही अनर्थ होत नाही." असे बोलल्यावर ते गप्प झाले पण त्यांना पोरीची दया आली. कां बरे मालती तिचा राग करते? आपल्या प्रज्ञासारखीच तर आहे ती. त्यांना तिची खूप दया आली पण मालती समोर त्यांच काही चालत नव्हतं.

सीमाची शाळा चुकत होती. शाळेत काय काय शिकवले याची सविस्तर माहिती व गृहपाठ प्रज्ञा सीमाला देत होती. सीमाच्या परिक्षे पर्यन्त तिची आई ठीक झाली. व सीमाची परिक्षा सुरळीत पार पडली. एवढी कामे करून व शाळा चुकवून सुध्दा वार्षिक परिक्षेत सीमाचाच पहिला नंबर आला सर्वांना आनंद झाला पण मालती बाईचा जळफळाट झाला. व सीमाचा त्या जास्तच द्वेष करू लागल्या.

वर्षा मागून वर्षे सरू लागली. दोघी दहाविला पोचल्या. पुढचे भवित्वय दहावीवर अवलंबून असतं. जास्तीत जास्त गुण मिळवायचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पैसेवाले वेगवेगळ्या विषयांचे घरी मुलांकरता टुटर लावतात तसे प्रज्ञाकरता ही वेगवेगळ्या शिकवण्यांचे शिक्षक लावले. ते तिला घरी येऊन शिकवायचे. मालतीबाईनी सीमाला तिच्या बरोबर बसायला, बोलायला बंदी घातली. पण घरातली बरीच वरची कामे तिने सीमावर सोपवली तिचे ही दहावीच वर्ष हे माहीत असूनही! व सीमा ही ती निमुटपणे करायची. पण घरात वावर करत असताना शिकवणाऱ्या शिक्षकांचे शब्द तिच्या कानावर पडायचे. आणि प्रज्ञाने ही ती दहावीत असल्याचे त्यां शिक्षकांना सांगितले होते. तेव्हा ते बोलले होते," तिला ही बसू दे ना तुझ्याबरोबर." पण ह्या गोष्टीला मालतीबाईनी ठाम विरोध केला. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. एकदा काय झाले, बिजगणिताचे एक उदाहरण प्रज्ञाला सोडवायला दिले. तिला ते जमेचना फॉर्म्युला वापर व पटकन करून टाक" सांगितले. तरी तिला जमेना तेव्हा तेथे काम करणाऱ्या सीमाने तो फॉर्म्युला सांगितला व तोंडी ते गणित सोडवले. ते सर ही चकित झाले. अशा हुशार मुलीला शिकवायची त्यांना उर्मी आली व त्या करता अधून मधून तिला ते प्रश्न पत्रिका देऊन , "वेळ मिळेल तसं कर बाळा ,मी तपासून देत जाईन व अडचण आली तर सांग" असे सांगितले. बाकीच्या शिक्षकांनी ही स्वतःहुन तिला तशीच गपचूप मदत केली ह्याचा सुगावा मालती बाईना लागू दिला नाही. जातीवंत शिक्षकांना हुशार मुलांना शिकवायला एक उत्साहच असतो तेथे मग पैसाच्या व्यवहाराचा अजिबात विचार केला जात नाही.

शेवटी दहावीची परिक्षा आटोपली. व दोन महिन्यानी निकाल आला. आणि सीमाने सर्वांना

तोंडात बोटे घालायला लावली. तिने ९८%गुण मिळवले व बोर्डात दुसरी आली. आणि प्रज्ञाला ७५% मिळाले. मालतीच्या रागाला पाराच राहिला नाही पण साहेबाना मात्र सीमाचे खूप कौतुक वाटले तरी ते उघडपणे तिचे कौतुक करू शकले नाही. प्रत्यक्ष नाही केले तरी अप्रत्यक्ष त्यांनी तिचे भरभरून कौतुक केले.

दोघी ही कॉलेज ला जाऊ लागल्या पण ,प्रज्ञाला गुण कमी असल्याने दूरच्या कॉलेज मध्ये जावे लागले तर सीमाचे गुण चांगले असल्याने तिला म़ुंबईत मिळाले. दोघी ही सायन्स पण एकमेकांचा सहवास नाही. सीमाला स्कोलर शीप मिळाली व तिचे राहणे वगैरे होस्टेल मध्येच झालं. इथे यमुनेला पण मालतीबाई खूपच त्रास देऊ लागल्या. तिची पोरगी ही जवळ नाही मग,इकडच काय होते ते सगळं विकून ती दोघं गावी जाऊन शेती करून उदरनिर्वाह करू लागली. पोरगी हुशार निघाली. आता पुढ शिकतेय सगळं देवाच्या कृपेन चांगलच झालं म्हणून देवाचे आभार मानून ती गावी गेली.

प्रज्ञा खरं म्हणजे चांगलीच होती. फक्त तिला सामान्य लोकांबरोबर जास्त जवळीक वाटायची. व हे तिचे वागणे मालतीबाईना, श्रीमंतीचा डौल असलेल्या बाईला पसंत नव्हते.

व आवडत ही नव्हते. त्यामुळे बऱ्याच वेळा आई व मुलीचे खटके उडायचे. वडिल बाहेरच्या कामामुळे त्यांच घरात जास्त लक्ष नव्हतं.

कशी तरी तिची बारावी झाली व तिने बी. एस.सी. करायचे ठरवले.

इथे सीमाला बारावीत ही नंबर लागला व तिला आरक्षण असल्याने मेडिकला सहज प्रवेश मिळाला. तेथे ही शिक्षणाची व होस्टेलची चांगली सोय झालेली. तिच सगळं सुरळीत चालले होते. कधी कधी सीमाच्या मनात विचार यायचे,"मलाच कां बरे एवढ्या सवलती तिच्या सारख्या बाकीच्यांची बरीच ओढताण व्हायची. मेडिकलचा खर्च काही कमी नाही तरी माझं कुठच अडवणूक होत नाही. तिनी ऑफिस मध्ये चौकशी करून आपल्याला एवढी सारी मदत कोण करतं हे विचारायचा पर्यत्न केला पण कुणी ही तिला काही ही सांगितले नाही. सारी देवाचीच कृपा. म्हणून ती नेटाने अभ्यास करायची. व देवाच्या दयेने तिला भरमसाठ यश ही मिळत गेले.

एम.बी.बी.एस. परिक्षा झाल्यावर ती गावी जाऊन आपल्या आई वडिलांना भेटून आली. निकाल लागला ती डिस्टिनशन गुण मिळवून एम. बी. बी.एस पास झाली. त्या काळात सीमाला एक निनावी पत्र आलं त्यात तिचं खूप कौतुक केल होतं तिच्या बद्दल खूप खूप अभिमान वाटतो व पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा दिल्या होत्या. त्या खाली सही नव्हती. कोण बरं आपला हितचिंतक असेल?समोर कां येत नाही? ती चक्राऊन गेली होती.

निकाल लागल्यावर तिला त्याच हॉस्पिटलमध्ये इंटेन्शिप करायला मिळाली.

प्रज्ञा बी. एस. सी. झाली व एका खाजगी कंपनीत नोकरी करू लागली. जास्त करून ती घराबाहेरच असायची. वडिलांना तिच्या करता काही चांगल करावं अस खूप वाटायचे. पण आई व मुलीच्या तंट्या मध्ये त्यांना दोघी बोलायला देत नव्हत्या. आपलीच बायको व आपलीच मुलगी त्यांना काही सुचेनासे होई. प्रज्ञाचे चांगला मुलगा पाहून लग्न करून द्यायचं ह्या विचाराने ने आपले वर शोधत होते. आणि त्यांच सगळं ठरलं ही होतं फक्त मुला मुलीने एकमेकाला पसंत केलं की, बार उडवून देऊ ह्या विचारात ते होते.

साहेबानी आपल्या कुटुंबाला घेऊन चार दिवस फिरून यायच ठरवलं त्याप्रमाणे सगळी तयारी ही झालेली. कधी नव्हे ती प्रज्ञा ही खुश होती. तिच्याकडे पाहून साहेब ही जाम खूश होते. एवढ्यात प्रज्ञा बाहेरून आली व ती बाबांना म्हणाली," बाबा तुम्ही उद्या चला मी नंतर येते. माझ्या मैत्रिणीचे उद्या लग्न आहे. मी सांगायला विसरले होते. ते करून मी नंतर येते. एवढ्या चागंल्या मुड मध्ये तिने सांगितले की, तिच्या बाबाना तिला नाही म्हणता आलं नाही.

आणि ठरल्या प्रमाणे तिचे आई बाबा दुसऱ्या दिवशी निघाले. प्रज्ञाने आपलं प्लॅनिंग व्यवस्थीत ठरवले होते. तिचं ऑफिस मधल्या एका साधारण होतकरू मुलाशी प्रेम होतं. दोघांची ओळख कॉलेज पासूनच होती. तो त्यांच्या श्रीमंती डौलाला शोभणारा नव्हता. आपले आई बाबा लग्नाला संमत्ती देणार नाहीत व आई तर नाहीच नाही. म्हणून दोघांनी परस्पर लग्न करून मोकळ व्हायच व नंतर बघू काय करायचे ते, हे ठरवून ती आई बाबा बरोबर टुर ला गेली नाही.

मालतीबाई व साहेब फार खुशीत होते. साहेबानी मालतीबाईना आपण प्रज्ञा करता मुलगा पाहिल्याचे सांगितले. तो मुलगा व त्याचे आई वडील मुंबईत येतील. पाहण्याचा पसंतीचा कार्यक्रम इथच उरकून घ्यायच ठरलयं हे ही सांगितलं. आपल्या तोला मोलाचीच माणसं निवडली म्हणून मालतीबाई ही खूश झाल्या.

हॉटेल मध्ये उतरून फ्रेश झाल्यावर जरा फेरफटका मारायचा म्हणून दोघं गप्पा मारत बाहेर पडले. गप्पाच्या नादात बरेच लांब आलोत हे त्यांच्या लक्षात आलं नाही. चला हॉटेलवर जाऊ म्हणून परतणार तेव्हा त्याचा फोन वाजला. प्रज्ञाचा फोन बघून ते खूप आनंदित झाले 'हेलो' म्हणून फोन कानाला लावला. हळूहळू त्यांचा चेहऱ्याचा रंग उडाला. पांढरा फिकट चेहरा बघून मालतीबाई घाबरल्या. "काय झालं कुणाचा फोन?" बोलल्या व तिने फोन कनाला लावला तर प्रज्ञाचे शब्द कानावर पडले. "मी त्या साधारण माणसा बरोबर सुखात राहिन माझा शोध घेऊ नका" एवढ्यात साहेब खाली कोसळले. जिवाच्या आंकाताने मालती बाई ओरडल्या. जवळ पास असलेली माणसे मदतीला आले. साहेब बेशुध्द झाले होते त्या लोकांनी त्यांना उचललं व जवळ असलेल्या के. ई. म. मध्ये घेऊन आले. तेव्हा चहा पिण्याकरता बाहेर निघालेल्या दोन चार मुलीपैकी एक सफेद एप्रेन घालून पुढे चालत होती ती धावत पुढे झाली तत्काळ केस आल्याने तिच्यातला डाँ जागा झाला होता व तिने मोठ्या डाँ ना नर्सेसना तातडीने बोलावणे पाठवले व नंतर त्यांना आय सी यू मध्ये भरती केले. सुरुवातीला ती एक पेशंट म्हणूनच धावली होती पण जवळ गेल्यावर मालती बाई व पेशंट साहेब बघून तिची पाचावर धारणा बसली होती. पण लगेच ती सावरली पेशंटला त्वरीत ट्रीटमेंट मिळायला हवी ह्याकरता तिने लगेच धावपळ केली. व बाकीचे सुध्दा सगळेच धावपळ करू लागले . मोठ्या डॉक्टरना पण बोलावणं पाठवलं ते घरी निघालेच होते तेवढ्यात हॉस्पिटल मधून फोन आल्याने ते पुन्हा वरती आले. साहेबांवर लगेच उपचार सुरू केले. त्यांना आय .सी. यू मध्ये भरती केले. साहेबाना माल्ड हार्ट अटॅक आला होता. मालतीबाईची शुध्द हरपायची बाकी होती पण त्या धिटाईने सगळे बघत होत्या तिच्या समोर सीमा डॉक्टर बघून जीवात जीव आला होता. खरं म्हणजे सीमा डॉ, की करते हे तिला तेव्हांच समजले. सीमाने त्यांच्याा पाठीवर हात फिरवून धीर दिला. "मॅडम साहेबांना काही ही होणार नाही ठीक होतील ते काळजी करू नका. मी आहे इथे" आणि मालती बाईना ते शब्द खरेच लाख मोलाचे वाटले. आणी त्या सावरल्या.

चार डाँ. मुली होत्या पण त्यातली एकच सगळी म्हणजे सीमा धावपळ करत होती. व त्याच्यावर तातडीने उपाय करायला सांगत होती. आणि त्यांच्यावर उपाय केले व त्यांचा उपयोग ही होऊ लागला. रात्रभर सुध्दा सीमा साहेबाच्याच उशाशी होती. मालतीबाईना तिने थोडा वेळ झोपायला सांगितले. पण ती मात्र रात्रभर साहेबावर देखरेख ठेऊन होती. सकाळी साहेबानी डोळे उघडले. तिचा जीव भांड्यात पडला. मोठ्या डाँ ना फोन लावला त्यांनी ही आपण लगेच येतो हे सांगितले.

ही आनंदाची बातमी सांगायला ती चहा घेऊन मालती बाईकडे गेली. तिने साहेब शुध्दीवर आल्याची गोष्ट मॅडमना सांगितली. त्या आत त्यांना भेटायला जाऊ लागल्या सीमाने त्यांना थोपवलं

" मॅडम, अगोदर हा चहा घ्या आपल्या साहेबांना  डॉ तपासतात तो पर्यन्त तुम्ही फ्रेश व्हा नतंर आपण साहेबाकडे जाऊ या"असे म्हणून तिने बळजबरीने त्यांना चहा प्यायला लावला व नंतर त्यांना आत घेऊन गेली.

एवढ्यात मुंबईचे मोठे डॉ आले. त्यानी नीट तपासले. आता धोका टळला. पण अजून दोन दिवस इथेच थांबायचे आहे हे सांगितले. डॉ मालती बाईकडे पाहुन बोलले डॉ सीमाचे कौतुक करावे तेवढे थोडे तिच्या मुळे तुमच्या मिस्टरवर लगेच उपचार झाले. तिने दाखवलेल्या दक्षतेमुळेच मला त्याच्यावर उपचार करता आले. सगळ्या स्टाफला तिने हाताशी धरून तत्परता दाखवली खूप चांगली कामगिरी केली सीमा भविष्यात खूप नाव कमवशील तू अशा तुझ्या गुणांनी. मॅडम सीमामुळे तुमचे मिस्टर तुम्हाला दिसतात. तिचे आभार माना. ऑफ वेळेत ही ती आपल्या डॉ की पेशाला जागली अभिनंदन बेटा " असे म्हणून त्यांनी तिला हस्तोलंद केले.व साहेबाना काळजी घ्या सांगून डॉ बाहेर गेले. मालतीबाई साहेबा जवळ गेल्या. त्यांना रड आवरत नव्हते. साहेबानी नजरेनेच त्यांना शांत राहायला सांगितले. नंतर साहेबानी सीमाला जवळ बोलावलं तिचा हात हातात धरून ते धिम्या स्वरात बोलले "सीमा, बेटा,खूप खूप अभिमान वाटतो तुझा. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. आज तू मला कृर्ताथ केले. अशीच खूप मोठी नामवंत डॉ हो. आज मी धन्य झालो बेटा."असे म्हणून त्यानी तिच्या डोयावरून हात फिरवला व तिला पोटभरून आशीर्वाद दिले.

मालतीबाईनी ही तिला आशीर्वाद दिले." खूप वाईट वागले मी तूझ्याशी मला माफ कर बेटा,"व तिने तिला मिठीत घेतले.

शेवट पर्यन्त सीमाला पत्ता लागला नाही की तिच्या शिक्षणाचा व बाकीचा खर्च कुणी केला.

प्रज्ञाच्या लग्नाने हतबल झालेले साहेब मात्र सीमाने आपल्या पैसाचे चिज केले म्हणून खूप धन्य धन्य झाले.

       


Rate this content
Log in