Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!
Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!

Preeti Sawant

Others Romance


4.0  

Preeti Sawant

Others Romance


गुंतता हृदय हे!! (पर्व १)भाग २

गुंतता हृदय हे!! (पर्व १)भाग २

3 mins 556 3 mins 556

"Woww किती handsome आहे ग हा!!, त्याची बॉडी बघ ना..हाये....." स्निग्धा म्हणाली.

"चूप ग तू..इतका पण काही खास नाहीये तो दिसायला...काय तुम्ही सगळ्या मुली मरता त्याच्यावर मला कळतच नाही" आर्या म्हणाली..

"असुदेत, अटलिस्ट मी ह्याला बघू शकते..हाथ ही लावू शकते..तुझ्या त्या अमेय सारख नाही ..बघावे तेव्हा रेकत असतो रेडीओ वर" स्निग्धा म्हणाली.

"ए आता बस हा, अमेय कुठे मधून आला आणि रेकतो काय ग किती गोड आवाज आहे त्याचा" आर्या उत्तरली..

"चल आता काम करूयात नाहीतर येईल आपला बॉस कान खायला" आर्या म्हणते आणि मग दोघीही खळखळून हसतात.


रात्री झोपताना आर्या मनातल्या मनात बोलत असते आणि काहीतरी लिहीत असते .

"कशी बरं सुरुवात करू, रोमँटिक स्टोरी लिहायला

एक मुलगा आणि मुलगी..नको नको खूपच टिपिकल वाटतंय..मग, हा.....एक राजकुमारी...ईई..काहीतरीच वाटतंय.." आणि बघता बघता सगळ्या रूमभर कागद पडलेले असतात..गोळा करून फेकलेले..


तेवढ्यात आई रूममध्ये येते आणि ओरडते,"आर्या काय ही खोलीची अवस्था..झोपायचे सोडून कचरा कसला करतेयस..ऐकतेयस का माझं, आर्या"

आर्या दचकले आणि म्हणते, "बापरे, सॉरी आई, मी उचलते सगळे कागद, अग ऑफिसचे काम करत होती..रोमँटिक..." मधेच अडखळत म्हणते, "म्हणजे माझ्या ऑफिस प्रोजेक्ट साठी tagline शोधत होती, सो भानच नाही राहिले" 

"ठीक आहे, ते कागद उचलून वेळेवर झोप. गुड नाईट" असे बोलून आई निघून जाते झोपायला.

"हुश्श..बापरे नशीब आईने काही वाचले नाही.." झोपते आता.


दुसऱ्या दिवशी, 

"गुडमॉर्निंग मुंबई!!

||गणपती बाप्पा मोरया||

मी तुमचा सर्वांचा लाडका RJ अमेय..तुमचे सर्वांचे स्वागत आहे "गुंतता हृदय हे" च्या नवीन एपिसोड मध्ये..

आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झालंय..सगळीकडे कसं प्रसन्न वातावरण आहे..कुठे धूप, अगरबत्ती चा सुवास पसरलाय तर कुठे टाळ, घंटीचा नाद घुमतोय..आणि त्यामध्ये हा बरसणारा पाऊस..

मन कसं आठवणींमध्ये हरवून जाते..आणि मग बोलू लागते,


पानपान आर्त आणि झाड बावरून||

सांजवेळी जेव्हा येई आठव आठव

दूर कुठे मंदिरात होई घंटारव

उभा अंगावर राही काटा सरसरून||

नकळत आठवणी जसे विसरले

वाटेवर इथे तसे ठसे उमटले

दूर वेडेपिसे सूर सनईभरून||

झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा

आता जरी आला इथे ऋतु वसंताचा||


सो guys कसे वाटले गाणं??

आता आपल्या contest बद्दल थोडंस.

कसे चाललय लिखाण, मला भेटायचे आहे की नाही?? 

सो उचला पेन आणि लिहा रोमॅंटिक स्टोरी..आणि मिळवा चान्स मला म्हणजे तुमच्या सर्वांच्या आवडत्या RJ अमेय ला भेटण्याचा!! परवा शेवटची तारीख आहे तुमच्या स्टोरी submission ची.

सो भेटूया उद्याच्या एपिसोड मध्ये..

Siya, बाय आणि yessssss

||गणपती बाप्पा मोरया||


"Wooww सो रोमॅंटिक, माझी सकाळ तुझ्यापासूनच होते आणि रात्र तुझ्या आठवणींमध्ये जाते, वाह!किती छान बोलतो हा" आर्या पुटपुटते.


"आर्या उठ बघू. आज पहिला दिवस गणपतीचा..आपल्याला दादांकडे जायचंय..तुझे बाबा आणि ऋग्वेद कधीच तयार झालेत..तू पटकन तयार हो..मग निघू आपण." आई म्हणाली.


"हो ग आई, उठतेय मी" आळस देत आर्या उठली.


सगळे जण सुयश जोशी (उर्फ दादा) ह्याच्या घरी म्हणजे आर्याच्या मोठ्या काकांच्या घरी पोहचले..दरवर्षी जोशींचा गणपती दीड दिवसांसाठी दादांच्याच घरी येतो..सगळे जोशी कुटूंब दीड दिवस इथेच असते..गणपती बाप्पाची सेवा करायला..आणि गणपती बाप्पाला निरोप देऊन सगळे आपापल्या घरी परतात.


"कसा दिवस गेला कळलंही नाही..आज गणपती बाप्पांचे विसर्जनही झाले..अगदी भरून आलेलं हो निरोप देताना" काकू काकांना म्हणाल्या..


"हो ग, दिवस कसे जातात समजतच नाही" काका उत्तरले.


"आर्या, अग ए आर्या, थोड्यावेळाने आपल्याला साठेकाकूंबरोबर आमच्या पाककलेच्या क्लासच्या गोडबोले काकूंकडे जायचंय गणपती दर्शनाला. त्यांचा गणपती ५ दिवसांचा असतो.." 

काकू म्हणाल्या.


"काय ग आई, आताच तर आलो विसर्जन करून..थांब ना थोडावेळ..नाहीतर तूच जा ना. सांगा ना हो बाबा हिला" आर्या म्हणाली.


"थकली असेल ग ती, राहुदेत तिला घरात, तूच जाऊन ये सुकू." काका म्हणाले.


"अहो, असे काय करताय, आर्या चल तयार हो, लगेच येऊ आपण" काकू म्हणाल्या.


काही वेळानंतर, आर्या, काकू आणि साठे काकू गोडबोले काकूंच्या घरी पोहचल्या.

आर्या तर त्यांचे घर पाहून भारावून गेली. गणपतीची आरास खूपच सुंदर केलेली होती..सगळीकडे खूप प्रसन्न वातावरण होते..

काकूंनी आर्याची ओळख करून दिली..आर्याने फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता, त्यावर झुमके आणि कपाळावर diamand ची बिंदी, तसेच केस एक क्लिप लावून मोकळे सोडले होते, ओठांवर हलकी गुलाबी लिपस्टिक लावली होती. आर्या आज खूपच उठून दिसत होती..


इतक्यात तिथे अनिश ची एन्ट्री झाली. अनिश गोडबोले काकूंचा एकुलता एक मुलगा. त्याने आकाशी रंगाचा सदरा घातला होता..दिसायला देखणा, रुबाबदार..आर्या त्याला बघतच राहिली..त्याची नजर ही आर्या वर खिळून होती..तो तिच्या सोज्वळ रूपावर पाहताच क्षणी फिदा झाला होता.


इतक्यात गोडबोले काकू म्हणाल्या, "हा माझा मुलगा अनिश. रेडिओवर कामाला असतो"


रेडिओ?????????


Rate this content
Log in