गुंतता हृदय हे!! (पर्व १)भाग १
गुंतता हृदय हे!! (पर्व १)भाग १
गुड मॉर्निंग!! मुंबई!!
मी आहे तुमचा सर्वांचा लाडका RJ अमेय..
सो, चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया ह्या सुंदर अश्या गाण्याने..
"पाहिले न मी तुला तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला"
मुबंईमधली सात मजली इमारत..आणि तिथे सहाव्या मजल्यावर राहणारे जोशी कुटूंब...घरात माणसे ४..सुभाष जोशी, त्यांची पत्नी सुकन्या जोशी, मुलगा ऋग्वेद जोशी आणि मुलगी आर्या जोशी..
सुभाष काका बँकेत मॅनेजर आणि सुकन्या काकू.. त्या गृहिणी आहेत, तसेच ऋग्वेद ११वीत कॉलेजमध्ये शिकत आहे आणि आर्या एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामाला आहे..दोन स्वतंत्र खोल्या, लिविंगरूम आणि किचन असलेले प्रशस्त घर..
सध्या सकाळ झाली आहे.काका आणि ऋग्वेद आपापल्या कामाला निघून गेले आहेत आणि रेडिओ वर RJ अमेयचा "गुंतता हृदय हे" हा कार्यक्रम सुरू आहे..काकूंचा अगदी आवडता कार्यक्रम...आणि अमेय चा आवाज सुद्धा बरं का..तो ऐकल्याशिवाय ह्या घरची सकाळ होतच नाही..
पण हो, तो ऐकायला फक्त काकू आणि आर्याचं हजर असतात..म्हणजे काय आहे ना!! आमच्या आर्याचे ऑफिस सकाळी १० वाजताचं. आणि हा कार्यक्रम सकाळी ८ वाजता लागतो..तोपर्यंत काका आणि ऋग्वेद घरातून निघालेले असतात..
असो, आर्या झोपली आहे आणि झोपेतच सध्या रेडिओ वर सुरू असलेल गाणे ऐकत आहे..जणूकाही तिला स्वप्नच पडलं आहे..अमेयच
गाणे कोणते??अहो तेच हो ते..मगाशी चालू होते ते..
"पाहिले न मी तुला तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
पाहिले न मी तुला "
"वाह! किती रोमॅंटिक गाणे आहे आणि त्याचबरोबरचा अमेय चा हृदय चिरणारा आवाज! हा कसा असेल ना दिसायला.काश तो माझ्यासमोर येईल आणि..." आर्या स्वप्नचं बघत असते की, अचानक...
"आर्या..अग ये आर्या!!! उठ लवकर बाळ, उशिर होईल नाहीतर ऑफिसला जायला.." काकूंनी आवाज दिला..
"अमेय....????? आई ग.... ....हो ग आई, उठतेय..ही आई पण ना, मला स्वप्न ही बघू देत नाही..जाऊदेत आता उठायलाच हवे..नाहीतर late मार्क लागायचा, आणि तो बॉस..तो तर खाऊनच टाकेल मला.." आर्या स्वतःशीच पुटपुटली.
काही वेळानंतर.....
"अग नाश्ता तर कर नीट, काय हे नेहमीचंच तुझं आर्या. घाईघाईत नीट नाश्ता पण नाही करायचा..अग कुठे जातेयस..संपव आधी ते सगळे..आर्या.." काकू म्हणाल्या..
"आई pls मला खूप उशीर झालाय..माझी ट्रेन मिस होईल..चल बाय..हे apple घेऊन जाते..बाय..लव्ह यु आई" आर्या म्हणाली..
काही वेळानंतर..
"रिक्षा......" रिक्षात बसल्यावर, "हे इअरफोन कुठे गेले..हा मिळाले.." आर्या पुटपुटली..
"कितीदा नव्य
ाने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे..
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी,
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी,
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी,
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी,
कितीदा सुकून पुन्हा फुलावे...
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे...
"वाह!!किती मस्त गाणं.." आर्या मनातच म्हणाली..
तेवढ्यात स्टेशन आले..इतक्यात अचानक,
"हॅलो फ्रेंड्स, तर कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड..मला नक्की कळवा..आणि अजून एक..मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं त्याप्रमाणे तुमच्यासाठी मला भेटायची एक संधी मी तुम्हाला देत आहे..हा पण..त्यासाठी तुम्हाला मला एक रोमॅंटिक अशी स्टोरी ई-मेल द्वारे लिहून पाठवायची आहे..ज्याची स्टोरी मला सगळ्यात जास्त आवडेल..त्यालाच मला भेटायची संधी मिळेल.. सो bye..take care..उद्या नक्की भेटू.."
अमेय म्हणाला.
"ओ मॅडम, पैसे तर द्या..मग ऐका की, गाणी..ओ मॅडम..कुठून कुठून भेटतात सकाळी" रिक्षावाला म्हणाला.
आर्या भानावर येत.." अरे हो, सॉरी दादा..हे घ्या तुमचे पैसे".तिने पटकन जीभ बाहेर काढली..
स्निग्धा!!!!!स्निग्धा!!!!!
स्निग्धा ही आर्याची ऑफिस friend..रोज आर्या आणि ती एकत्रच ऑफिस ला जातात..
"आग ये बये, किती तो उशीर, आजपण लेटमार्क लागणार वाटते..तू पण ना, आजपण तो अमेयच असेल ना उशिरा येण्याच कारण, फुकणीच्याला एकदा खवडाच देणार आहे मी" स्निग्धा म्हणाली.
"अग हो, हो, किती रागवशील..चल निघू..बाकीचा राग ट्रेन मध्ये काढ.." आर्या म्हणाली..
दोघी ऑफिसला पोहचतात..
"Hi गर्ल्स, आजपण उशीर, एक काम करा, उद्यापासून येऊच नका, म्हणजे इथवर येण्याचा त्रास वाचेल..नो excuses pls" बॉस म्हणाले.
हे आहेत अस्मिता pvt ltd चे सर्वेसर्वा शेखर प्रधान..ते कितीही ह्या दोघींना बोलले..तरी त्यांना हे पण माहीत आहे की, ह्या दोघी टॉप ranker employees आहेत कंपनीच्या..तसेच त्या दोघींना ही ह्याची कल्पना आहे..की, शेवटी त्यांचीच मदत लागते सरांना..
Here is come, the dashing, handsome आणि शेखरचा खास employee समीर पटवर्धन..सगळ्या ऑफिस मधल्या मुली समीर वर मरतात..अगदी स्निग्धा सुद्धा..पण आपली आर्या त्याच्याकडे डुमकूनही बघत नाही..
बिलकुल नाही..तुम्ही जे समजताय तसे काही होणार नाहीये..म्हणजे आर्या आणि समीर ची लव्ह स्टोरी..वगैरे वगैरे..pls.तसं कसं होईल
तुम्ही एक विसारताय..आपला RJ अमेय..
आता तर कुठे सुरुवात आहे..
क्रमश:
(कथेचा पुढील भाग पुढच्या आठवड्यात पोस्ट केला जाईल...कथा आवडल्यास अभिप्राय जरूर देणे.. धन्यवाद)