Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Preeti Sawant

Others

3.2  

Preeti Sawant

Others

गुंतता हृदय हे - भाग १३

गुंतता हृदय हे - भाग १३

4 mins
374


समीरने गौरीला तिच्या मुलाखतीच्या ठिकाणी सोडले आणि तो त्याच्या ऑफिसला निघून गेला.. एकंदरीत गौरीची मुलाखत छान झाली. तिला काही वेळ बाहेर बसण्यास सांगितले गेले.. थोड्या वेळाने गौरीला पुन्हा केबिनमध्ये बोलावले गेले व सरळ तिच्या हातात तिच्या नियुक्तीचे पत्र दिले गेले.. गौरीला खूप आनंद झाला आणि होणारच ना..तिला कोणाच्याही शिफारशी बिना जी नोकरी मिळत होती.. तिला ही बातमी कधी एकदा घरी सांगतेय असं झालं होतं..


ऑफिसच्या काही फॉर्मलिटी पूर्ण करून ती तडक घरी निघाली..तिला उद्या पासूनच ऑफिसमध्ये रुजू व्हायला सांगितले गेले होते.. असो, ती घरी मिठाई घेऊन आली आणि तिने सुमती काकूंना आनंदाची बातमी दिली..काकूंनी देवाजवळ मिठाई ठेवून नमस्कार केला..मग गौरीने तिच्या बाबांना फोन करून ही बातमी कळवली..आज सगळं शास्त्री कुटूंब अगदी आनंदात होतं..सुमती काकूंनी रात्री गोडाधोडाचा पण बेत ठरविला..


अरे हो!! गौरीने समीरला ही आनंदाची बातमी कुठे दिलीये..हेच विचारायचं होतं ना तुम्हाला.. पण ती देणार तरी कशी!! त्याचा नंबर कुठे होता तिच्याकडे.. कळलं तुम्ही काय विचार करताय ते.. अहो, पण तुम्हीच विचार करा..ती काकुंकडे कशी काय मागेल समीरचा नंबर..!! मग काय समीरची वाट बघण्याखेरीज गौरीकडे काहीच पर्याय उरला नव्हता..समीर नेहमीप्रमाणे रात्री जेवायला हजर झाला..तो आल्याआल्या काकांनी त्याला आनंदाची बातमी दिली..त्यामुळे गौरीचा चेहरा जरा हिरमुसला..कारण तिला ही बातमी स्वतः समीरला सांगायची होती..जेवणं आटोपलं..तसं समीर काकांशी थोडं बोलून सगळ्यांना शुभ रात्री बोलून झोपायला गेला..


दुसऱ्या दिवशी गौरी लवकर उठली..आज तिच्या ऑफिसचा पहिला दिवस जो होता..गौरीची तयारी झाली आणि तिने देवाला व तिच्या आई-बाबांना नमस्कार केला आणि ती निघणार इतक्यात समीर दरवाजात उभा..तिला कोण आनंद झाला..समीरने तिच्यासाठी फुलांचा बुके आणला होता..तो त्याने तिच्या हातात ठेवला आणि त्याने गौरीचे अभिनंदन केले व तो ऑफिसला जायला निघाला..तेवढयात त्याच्या लक्षात आले की, गौरीचं ऑफिस तर त्याच्या ऑफिसच्या जवळच आहे..पण तो गौरीला हे कसं विचारणार..पण काय माहीत कसं..शास्त्री काकांनी स्वतः गौरीला आज समीर बरोबर जायला सांगितले..गौरीला खूप खूप आनंद झाला.. गौरी समीरच्या गाडीत बसली..आज तिने काल सारखचं समीरला गाणं लावायला सांगितलं..त्याने कालसारखचं एक रँडम गाणं लावलं..


🎶कितने ही दूर दूर हों उन दोनों के रास्ते 

मिल जाते हैं जो बने एक दूजे के वास्ते;एक दूजे के वास्ते ||

जैसे दिल है धड़कन है एक दूजे के वास्ते 

जैसे आँख है दर्पण है एक दूजे के वास्ते 

जैसे बरखा सावन है एक दूजे के वास्ते 

एक सजनी एक साजन है एक दूजे के वास्ते🎶


गौरी पूर्णपणे त्या गाण्यात हरवून गेली होती..ऑफिस कधी आलं तिला कळलं सुद्धा नाही..समीरने गौरीला हाक मारताच ती भानावर आली आणि तिच्या लक्षात आले की, ऑफिस तर आलं पण.. गौरीने समीरला निरोप दिला..आणि ती ऑफिसमध्ये निघून गेली..काही दिवस असेच गेले..गौरी आता पूर्णपणे तिच्या कामात रुळली होती..समीर तर तिला रोज रात्री घरी भेटायचाच पण त्याच्याशी काही जास्त बोलणं व्हायचं नाही..


एक दिवस अचानक संध्याकाळी खूप पाऊस सुरू झाला..इतका की काही समजायच्या आधीच सगळीकडे पाणीच पाणी झाले.. जवळ जवळ सुनामीचं ती.. त्या दिवशी गौरी सोडून सुदैवाने सगळेच घरी वेळेवर आले होते..अगदी समीरसुद्धा.. पण त्यादिवशी गौरीला एक महत्वाचा प्रोजेक्ट दिला गेला होता..त्यामुळे तिने आधीच घरी तिला यायला थोडा उशीर होईल असे कळवले होते..तेव्हा तर वाटलं पण नव्हतं की, इतका पाऊस पडेल म्हणून काकूंनी ही गौरीला परवानगी दिली होती.. आता मात्र कहर झाला, पाऊस थांबायचं नाव ही घेईना..त्यात गौरीचा फोन पण लागत नव्हता..सुमती काकू फारच चिंतीत झाल्या..काकांना ही काय करावं हे कळतं नव्हतं..वेदांतला एकट्याला ही ते इतक्या पावसात पाठवू शकत नव्हते..तेवढ्यात समीर तिथे आला.. काकांनी सगळी हकीकत समीरला सांगितली..समीरने गौरी कदाचित ऑफिसमध्येच असेल असे सांगून काका काकूंना दिलासा दिला..आणि काही वेळातच मी येतो असे सांगून तो निघून गेला..


इथे पावसाचा कहर वाढतच चालला होता..गौरी हिम्मत करून पण ऑफिसमधून निघू शकत नव्हती..कारण पाणीच इतकं भरलेलं..त्यात ती आज सकाळी घाईघाईत फोन चार्ज करायचा विसरली होती म्हणून तिचा फोन बंद झाला होता..लाईट गेल्यामुळे आता ती तो चार्ज ही करू शकत नव्हती..ऑफिसमध्ये काही निवडक सहकारीच थांबले होते..बाकी सगळे घरी निघून गेले होते..गौरी खूपच टेन्शन मध्ये आली होती..तिने एका सहकाऱ्याकडे फोन मागितला आणि ती घरचा फोन लावू लागली..पण तो काही लागत नव्हता..तिला काय करावे काहीच कळत नव्हते.. तिला ऑफिसमध्ये रात्र काढणे कठीण जात होते..घरची, आई-बाबांची तिला खूपच आठवण येत होती..


तिला अगदी रडू कोसळले..इतक्यात तिच्या हातात कोणी तरी रुमाल दिला..तिने वर पाहिले तर तो समीर होता..समीरला पाहताच ती इतकी खुश झाली की, तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि ती रडू लागली..समीरने तिला दिलासा दिला..आणि म्हणाला, "रडू नकोस गौरी, मी आलोय ना..पाऊस थांबला की, आपण निघू..तू काही खाल्लस का?" यावर गौरीने नाही असे उत्तर दिले..मग समीरने त्या ऑफिसच्या कॅन्टीनमधून जे मिळेल ते आणले आणि गौरीला दिले.. गौरी समीरकडे बघत होती..तिला विश्वासच होत नव्हता की, समीर तिच्यासाठी इथे आला होता.. तिने समीरचा हात घट्ट पकडून ठेवला होता..त्याला पाहता पाहता ती स्वतःच्या विश्वात हरवून गेली..ती सारखी हेच मनोमनी बोलत होती..


🎶थोड़ा सा प्यार हुआ है थोड़ा है बाकी

हम तो दिल दे ही चुके

बस तेरी हाँ है बाकि

थोड़ा सा प्यार हुआ है थोड़ा है बाकी🎶


(क्रमशः)


Rate this content
Log in