The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Preeti Sawant

Romance Others

3  

Preeti Sawant

Romance Others

गुंतात हृदय हे!! (पर्व १) भाग५

गुंतात हृदय हे!! (पर्व १) भाग५

5 mins
701


ती आज खूप खुश होती..तिच्या प्रेमाचा समीरने स्वीकार जो केला होता..तरीही तिला मनात कुठेतरी वाटतं होतं की, समीरचे खरे प्रेम आर्यावरच आहे..जरी ते एकतर्फी असले तरी.. पण तिला हे ही माहीत होतं की, समीर आता आयुष्यात पुढे निघून गेलाय आणि आता तो फक्त तिचा आहे..फक्त तिचा..असा विचार करून गौरी तिच्या सुखी भविष्याची स्वप्ने बघू लागली..आणि बघता बघता ती कधी झोपली तिला कळलेच नाही..


इथे समीर गौरीचाच विचार करत होता..त्याला माहीत होतं की, आर्याची वाट बघणं आता व्यर्थ आहे..कारण म्हणतात ना, "आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या आनंदातच आपला आनंद असला पाहिजे". समीर अगदी ह्याच विचारांचा होता म्हणून तर तो आर्याच्या आयुष्यातून इतका लांब निघून आला होता.. त्याला आर्याच्या आठवणींमध्येच उरलेलं आयुष्य काढायचं होतं..पण देव नेहमी चांगल्या लोकांबरोबर चांगलंच वागतो, म्हणून देवाने समीरच्या आयुष्यात गौरीला आणलं होतं..त्याच्या हृदयातील जखमांना भरून त्याला एक सुखद आयुष्य देऊ केलं होतं..फरक इतकाच होता की, जिथे समीर कधीकाळी उभा होता..आज तिथे गौरी होती..जसे समीरला आर्यावर प्रेम झालं होतं..अगदी तसच वा त्याहूनही जास्त गौरीचं प्रेम समीरवर होतं..आणि आता समीरने गौरीला होकार देऊन गौरीला तिचं प्रेम देऊ केल होतं..आता त्याच्या जगण्याचं एकच कारण होतं, ते म्हणजे गौरी...


(काही महिन्यांपूर्वी मुबंई मधली सकाळ!!)


"आर्या, अगं उठ बाळा आता..ऑफिसला नाही जायचंय का? साडे आठ वाजत आले..जळलं मेलं ते लक्षण..नजरच लागली अमेयला..त्याचा प्रोग्रॅमच बंद पडला..काय आवाज होता त्याचा..आता जमतंय का कोणाला त्याच्यासारखं लाघवी बोलायला." सुकन्या काकू असं बोलत बोलत स्वयंपाक खोलीत गेल्या.. आर्या उठली आणि तयारी करून नेहमीप्रमाणे ऑफिसला निघाली..आज प्रथमच तिची सकाळ अमेयच्या आवाजाने झाली नव्हती..ती अमेयला म्हणजेच समीरला खूप मिस करत होती..ती स्वतःशीच पुटपुटली, "मिस यु अमेय"..

आज स्निग्धा ऑफिसला येणार नव्हती..सो आर्याला एकटच ऑफिसला जायचं होतं..तिने किती दिवस रेडिओ सुद्धा लावला नव्हता..ती फटाफट तयार होऊन ऑफिसला निघून गेली.. तिला आज ऑफिसला जायची इच्छा होत नव्हती..तिने अनिशला फोन करून खोटं सांगितलं की, ती एक महत्वाच्या मीटिंगमध्ये आहे आणि ती संध्याकाळी फ्री होईल. मगच ती त्याला फोन करेल आणि तिने तिचा फोन सायलेंट केला आणि ती थेट चौपाटीवर गेली आणि त्या फेसळणार्या समुद्राकडे एकटक पाहत राहिली..आज तिला स्वतःसाठी वेळ हवा होता..एकांत हवा होता..


ती समीरचा विचार करत होती..त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण तिला आठवत होता..ते क्षण आठवता, ती मंद हसली..तिने कधीच विचार केला नव्हता की, समीर हाच अमेय होता..अमेयला भेटण्यासाठी तिने काय नाही केलं आणि तो तर नेहमी तिच्याबरोबरच होता..तेव्हा तिला तिच्या साखरपुड्यातला दिवस आठवला आणि तिचे डोळे पाणावले.. त्यादिवशी ती इतक्या शॉक मध्ये होती की, काय करावं हे तिला कळत नव्हतं..समीर जाताना त्याला थांबवावं असं तिला फार वाटतं होतं..पण तिचं प्रेम तर अनिशवर होतं ना!! ती मनात विचार करत होती, "कुठे असेल समीर? कसा असेल? त्याने एकदाही मला भेटायचा प्रयत्न का नाही केला?" ती इतकी कन्फ्युज होती की, तिला हेच समजत नव्हते की, अनिश तिच्याबरोबर असताना ती समीरला इतकी का मिस करतेय..तिला स्निग्धाची खूप आठवण येत होती कारण या द्वंद्वातून तीच आर्याला बाहेर काढू शकत होती..


आर्याने स्निग्धाला फोन करण्यासाठी तिचा फोन हातात घेतला तर त्यामध्ये अनिशचे १२ मिस् कॉल होते.. तिने लगेच अनिशला फोन केला..आर्याचा आवाज ऐकताच अनिश रडायला लागला..त्याला धड बोलताही येत नव्हते..इतक्यात कोणीतरी त्याच्या हातातून फोन घेतला..तेव्हा कळले की, अनिशच्या आईला हार्ट अटॅक आला आहे आणि तिला अतिदक्ष विभागात ठेवण्यात आले आहे..आर्या काहीवेळातच हॉस्पिटलमध्ये पोहोचली..सगळे रिपोर्ट येईपर्यंत संध्याकाळ झाली.


डॉक्टरांनी अनिशला कॅबिनमध्ये बोलविले आणि ते म्हणाले,"तुझी आई ह्या प्रसंगातून थोडक्यात वाचली आहे..आता तिची तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल..तिला कसलाही स्ट्रेस देता कामा नये..तिला खूप जपावं लागेल..सध्यातरी तिला दगदग करून चालणार नाही.." अनिशने डॉक्टरांचे नीट ऐकून घेतले..तो ह्याच वाक्याने खुश झाला की, त्याची आई आता ठीक आहे..डॉक्टरांनी तिला महिनाभर तरी विश्रांती घ्यायचा सल्ला दिला..आर्या आणि अनिश दोघेही गोडबोले काकूंना म्हणजेच अनिशच्या आईला बघायला तिच्या रूममध्ये गेले..काकूंना अजून २ दिवस तरी अतिदक्षता विभागातच ठेवण्यात येणार होते..आर्या आणि अनिशला पाहून काकू खूप खुश झाल्या..आता लवकरात लवकर त्यांना आर्याला त्यांच्या घरी कायमचे आणायचे होते..काकूंनी तशी इच्छा दोघांना बोलून ही दाखवली..दोघांनाही काकू बऱ्या होऊन घरी आल्याशिवाय लग्नाचा विषय नको होता..तरीही काकूंसाठी त्या दोघांनी होकार दिला..


काकू घरी येईपर्यंत आर्याने काकूंची खूप काळजी घेतली..स्वतःच्या आईप्रमाणे त्यांचं सर्व काही केलं..काकू घरी आल्यावरही आर्या घरातले सर्व काही बघत होती..अनिश तर हे सर्व पाहून भारावून गेला..आर्या आता इतकी व्यस्त झाली होती की, तिचा स्वतःसाठी विचार करायला वेळच नव्हता..तिने ऑफिसमध्ये १५ दिवसांची सुट्टी सांगितली होती..ती फक्त झोपण्यासाठी तिच्या घरी जात असे..बाकी पूर्ण दिवस ती गोडबोले काकूंची काळजी घेण्यात घालवत असे..अनिश घरी आला की, मग ती जेवून, सर्व आवरून तिथून निघत असे..


काकू आता हळूहळू बऱ्या होत होत्या..आर्या ही आता ऑफिसात पुन्हा रुजू झाली..अनिशने त्याच्या आईची समजूत काढून २-३ महिन्यासाठी लग्नाचा विचार पुढे ढकलला..कारण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस तरी गोडबोले काकूंना दगदग करता नये होती..


असेच काही महिने निघून गेले..आता गोडबोले काकू पूर्णपणे बऱ्या होत्या..त्यांचे पथ्यपाणी व्यवस्थित चालले होते..आज जोशी कुटूंबाला मुद्दामूनच त्यांनी रात्रीच्या जेवणाला बोलविले होते..कारण त्यांना आता आर्या आणि अनिशच्या लग्नाचा विषय काढायचा होता..पण त्याआधी त्यांनी सर्वप्रथम ह्या विषयावर अनिश आणि त्याच्या बाबांशी चर्चा केली..यावर अनिशने संमती दर्शविली..फक्त त्याची एक अट होती..लग्न अगदी साधेपणाने व्हावे..मोजक्याच जवळच्या लोकांना बोलवून..

काकूंना प्रथम हे अमान्य होतं पण त्या आताच बऱ्या झाल्या आहेत व अजून त्यांना दगदग नको..असे जेव्हा अनिशने त्यांना पटवून सांगितले..तेव्हा त्या ह्या गोष्टीला तयार झाल्या..पण आर्याशी आणि तिच्या घरच्यांशी बोलल्याशिवाय त्यांना कोणताही निर्णय घायचा नव्हता..


आर्या आणि तिच्या कुटूंबाचे अनिशने आणि त्याच्या आईवडिलांनी स्वागत केले..काही औपचारिक गोष्टी झाल्यानंतर गोडबोले काकूंनी सरळ विषयाला हात घातला आणि त्यांनी आर्या व तिच्या आई-बाबांना पुढच्या काही महिन्यातले काही मुहूर्त दाखविले..आर्याचे आई बाबा तर खूपच खुश झाले..पण गोडबोले काकूंना आर्याची संमती हवी होती..तिने अनिशकडे बघितले आणि तुम्ही जे म्हणाल ते..असे ती म्हणाली..


मग काय २ महिन्यांनी जो पहिला मुहूर्त होता तो ठरला..अनिश आणि आर्याच्या म्हणण्यानुसार लग्न अगदी साधेपणाने करायचे ठरले..अगदी मोजकीच घरातील मंडळी आणि मित्र-परिवार.. अनिश तर इतका खुश होता की, बोलायला शब्द अपुरे पडतील..आर्या ही खूप खुश होती..अनिश तर अगदी मनातल्या मनात हेच म्हणत होता..


हीरीये सेहरा बांधके मे तो आया रे।।

डोली बारात भी साथ मे, मे तो लाया रे।।

अब तो ना होता है एक रोज इंतेजार सोनी।।

आज नही तो कल है तुझको तो बस मेरी होनी रे।।

तेनू लेके मे जावांगा, दिल देके मे जावांगा


(क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from Preeti Sawant

Similar marathi story from Romance