घुसमट
घुसमट
1 min
232
" तू मोठी आहेस . समजून घे." हे ऐकता ऐकताच ती लहानाची मोठी झाली. सर्वांना समजून घेणे जणू तिच्या अंगवळणीच पडले.
लग्न झाले तरी. मात्र स्वतःला समजून घ्यायला ना तिला वेळ मिळाला ना कुणी तिला समजून घेतले.
सर्वांची काळजी अन् मोठेपणाचे ओझे आताशा तिला पेलेनासे झाले. सर्व ओझे फेकून द्यायचे तिने ठरवले. हे चूक की बरोबर. काहीच कळत नव्हते. विचाराने डोके जड झाले. घुसमट वाढली.तिने हलकेच डोळे मिटले. ते कायमचे.
