घरटं
घरटं




घरातून बाहेर पडताना आजी नेहमीच देवाला...घराला नमस्कार करायची.
अस का म्हणून विचारलं...तर म्हणाली, "बाहेर गेलो की घर वाट बघत राहतं आणि आपली पावलंही आपोआपच लवकर माघारी येतात ..घराच्या ओढीने".
कशी कुणास ठाऊक मलाही सवय जडली मग रोज घराचा 'असा' निरोप घेण्याची.
आताही बाहेर पडलं की मन, चार घटका कुठेतरी रेंगाळतं.... कधी बावरतं , धास्तावतं. अन् परतीच्या वाटेवर...दुरूनही नात्यांच्या प्रेमात न्हालेलं... माझं वाट पाहणारं उबदार घरटं पाहून, बर्या- वाईट अनुभवांनी शिणलेलं काळीज एकदम सुखावतं.