STORYMIRROR

Aruna Garje

Others

5  

Aruna Garje

Others

घोषणा

घोषणा

1 min
766

   सर्व कार्यकर्ते दिवसभर 'जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त ' घोषणा देऊन थकले. रात्री रेस्टॉरंट आणि बिअर बार मध्ये शिरताच जोरात ओरडले "ए पोऱ्या डोळे फुटलेत का? चल टेबल साफ कर." गडबडीत त्या छोट्या पोराच्या हातून ग्लास पडून फुटला. मालकाने खाडकन त्याच्या मुस्कटात लगावली. 

     घोषणा देणारे पेगवर पेग आत रिचवत होते तर पोराचे अश्रू डोळ्याबाहेर पाझरत होते. 


Rate this content
Log in