Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

एसटी

एसटी

2 mins
285


एसटीबद्दल एक हळवा कोपरा आजही मनात आहे. अलीकडे एसटीचा फारसा प्रवास होत नाही पण पूर्वी एसटीचाच प्रवास असायचा. एसटीभोवती कितीतरी आठवणी गुंफल्या आहेत. एसटीच्या रुपये किती सुंदर. अगदी लांबून दिसून येणारा तिचा लाल रंग आणि त्यावरचा पिवळा पट्टा.


     खिडक्याचा आणि सिटांचा हिरवा रंग अगदी नऊवारी साडी नसणाऱ्या प्रेमळ आजीची आठवण यावी. जो कोणी ही रंगसंगती शोधली त्यांना सलाम. लहानपणी एसटीच्या सगळं जगच अद्भुत प्रचंड गर्दीत उभा राहून लोखंडी खांबावर टक-टक आवाज करत तिकीटे विकणारा तो कंडक्टर त्याची ती अॅल्युमिनियमची तिकिटाची पेटी त्यामधील वेगवेगळे तिकिटाचे गठ्ठे .


     त्यांचे ते तिकीट पंच करायचे यंत्र! गळयात अडकवायची पैशाची ती कातडी बॅग . आपण गाव सांगितल्यावर पटापट दोन-चार गठयातून तिकीटे फाडून ती योग्य त्या ठिकाणी पंच करून ती आपल्या हातात द्यायचा. त्याचा सगळा हिशोब कसा करत असेल हा. बरं तिकीटावर नुसते पाढे लिहील्यासारखे दोन रांगेत आकडे छापलेले असायचे. नेमके कुठे पंच मारायचे हे त्यांनाच माहीत. कंडक्टर चा सगळयात हेवा वाटायचा जेव्हा तो घंटी वाजवायचावाजवायचा!


     एसटी सुरू करायची आणि थांबवायची ताकपावर त्याच्याकडे आहे हे पाहून आदर अधिकच वाटायचा. दोन घंट दिल्या की एसटी सुरू आणि एक घंटी दिला एसटी थांबते. कधीतरी आपल्याला पण या एसटीची दोरी ओढून घंटी वाजवायची हे स्वप्न एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचं असायचं. कंडक्टर तिकीटे काडून झाले की आपल्या जागेवर जाऊन हिशेब जुळवत बसायचा. कधी-कधी हिशेब जुळला नसला तर परत आकड्याची बेरिज करत असायचा.


     एवढं काम झाले तरी कधी-कधी एसटीच्या टपावर सामान चढवायचा. पूर्वी एसटी ला एकच दार असायचे आणि डृ्यवरच्या पाठीमागे लांबलचक बसण्याची सिटी असायची. एसटीने प्रवास करायला फार मजा यायची. मी एसटीने आलो, म्हणून इतरांना सांगायला फार छान वाटायचे.तिकीटे काडून उरलेले सुटे पैसे तिकीटावर पाठीमागे लिहून द्यायचे. आपले गाव आल्यावर आपण ते लिहून दिलेले पैसे तिकीट दाखवून घ्यायचे. फार छान वाटायचे एसटीने प्रवास करायला...


Rate this content
Log in