Swarup Sawant

Others

2.0  

Swarup Sawant

Others

एकीचे बळ मिळते फळ

एकीचे बळ मिळते फळ

3 mins
6.1K


पोखरण गाव तालुक्याच्या जवळचे.आजूबाजूच्या गावात दहावी पर्यंत शाळा नव्हती. तसेच त्या शाळेत शिक्षणाबरोबरच, क्रीडा ,नाट्य यांवरही भर दिला जात असे. म्हणूनच आजूबाजूच्या बारा कोशीत त्याचे नाव होते.मग काय?विद्यार्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती.पालकांना रोज विद्यार्थांना ने आण करणे कठीण जाई.ते पाहून ग्रामसेवक ,शिक्षक ,सरपंच यांनी शाळेतच वसतिगृह चालू केले. मुले रुपी फुलाखरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली . मुलांना ही शिस्त चांगली होती .सगळीजण गुण्यागोविंदानं रहात होते आणि विकेत नावाचे वादळ त्या वसतिगृहात आले. एका वर्गात दोन वेळा बसल्यामुळे सातवीत असला तरी मोठा होता. तो मुलांबरोबर दादागिरी करू लागला. लहान मुलांकडून स्वत: ची कामे करुन घेऊ लागला .सगळे हैराण झाले.त्याला घाबरणारे पण काही चतूर मुले त्याने जवळ केली. त्यामुळे त्याच्याविरुध्द कोणी बोलले की ही मुले लगेच त्याला सांगू लागली. बदल्यात तो त्या मुलांचे लाड करी. त्यांना त्याची कामे सांगत नसे.

इतर मुले घाबरत. त्याची कामे करायचा कंटाळा येऊनही नाईलाजास्तव कामे करीत. भित्यापाठी ब्रम्हराक्षस.

सावंत बाईंच्या हळूहळू लक्षात येऊ लागले. त्यांनी मुलांना बोलते करायचा प्रयत्न केला.पण छे ! कुणीच काही बोलेना. त्याला मुद्देमालासह पकडायचा प्रयत्न केला पण चेले त्याला जागरूक करत.

आता काय करावे बरे ? बाईंनी खूप विचार केला.प्रथम त्यांनी चेले शोधले. इतर मुलांपैकी थोडेसे दणकट् दहा मुले निवडली. त्यांना गपचूप घरी बोलावले.

तब्येतीने दणकट असूनही ती मुले घाबरतच सावंत बाईंकडे गेली. बाईंनी त्यांना खाऊपिऊ घातले.त्यांना गोड शब्दाने आपलेसे केले व त्यांचा आत्मविश्वास जागरुक केला . अन्याय सहन करणे म्हणजेही गुन्हाच असतो. ते सांगितले.मुलांची हळूहळू भीड चेपली. त्यांनी सगळे खरे खरे सांगितले.

सावंत बाई म्हणाल्या "बाळांनो ,मला माहित होते. पण तुमच्या तोंडून ऐकायचे होते. आपल्यावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडणे हे सुशिक्षित पणाचे लक्षण आहे. फक्त आपण आपला प्रश्न कसा सोडवतो ते महत्वाचे असते.

बाईंनीच त्यांना एकजुटीचा मार्ग सांगितला . काहीही झाले तरी एकानेही मागे फिरायचे नाही.उलट आणखी मुलांचा सहभाग वाढवायचा.

त्या मुलांना हुरुप आला .विकेत च्या चेल्यांना आणी त्याला थांगपत्ता न लागू देता आपली टीम वाढवली. सगळ्यांना एकीचे महत्त्व सांगितले. कोणतेही चांगले काम एकीने केल्यास यश नक्की मिळते. हे त्यांना पटले.

सगळे वेगवेगळे अन् लांब असतील तर एकमेकांना बोलावण्यासाठी खुणेची शीळ ठरली. कारण ते स्वत:हून कोणालाच त्रास देणार नव्हते.अगदी विकेतलाही . धडा शिकवायचा पण तत्त्व पाळून .नाहीतर त्यांच्यात काहीच फरक राहिला नसता. हा नविन ग्रुप संधीची वाट पहात होता.

अखेरीस तो दिवस उजाडला. बाईंच्या टिम मधिल एकाला विकेत ने पकडले. उगाचच वादावादी उकरली. अन् त्याला मारायला सगळे चंगूमंगू धावले. तो घाबरला पण खुणेची शीळ बाकी दिली. सगळे आवार शिळीने दुमदुमले. काही कळायच्या आत विकेत व त्यांच्या चंगूमंगू समोर खूप मोठी पलटणच उभी राहिली

ते घाबरले पळू लागले

ते पाहताच एकीच्या बळाची जाणीव होऊन त्या चमूंनी विकेत त्याच्या टीमला पकडले आणी सावंत बाईंकडे नेले

एक सोडून बरीच मुले असल्याने विकेतला तो करत असलेल्या दुष्कृत्याची कबुली द्यावी लागली .

सावंत बाई त्यांना मोठ्या सरांकडे घेऊन गेल्या. अथ पासून इतिपर्यंत सर्व घटना कानावर घातल्या. मुलांचे एकजुटीने केलेल्या चांगल्या कामाचा नेहमी विजय होतो ते दाखवून दिले

पण एकजुटीचा फायदा चांगल्या कामासाठीच करावा हे ही बिंबवले. ती मुले एकजुटीने विकेतच्या टीमला नामोहरम करू शकली असती. परंतू तो सिलसिला चालूच राहिला असता. आपण मारूनही आपल्याला कुणी हातही लावला नाही या गोष्टीचे त्याला वाईट वाटले. पुन्हा असे करणार नाही अशी त्याने शपथ घेतली.

बघता बघता पोखरण गावातील वसतिगृहात पुन्हा नंदनवन फुलले.आणी आता एकीचा उपयोग मुलांनी शिक्षणासाठी ,चांगल्या वागणुकीसाठी केला.

एकीचे बळ मिळते फळ


Rate this content
Log in