एक वाईट स्वप्न
एक वाईट स्वप्न
स्वप्न ही काय असतात हे स्वप्न पडल्यावरच आपल्याला कळते. भारतात तर स्वप्नांवरून पण भविष्य सांगितलं जातं. पण ह्यातली स्वप्न अर्धे स्वप्न खरी होतात आणि अर्धी स्वप्ने खोटी ठरतात. भल्या पहाटे पडलेली स्वप्न खरी ठरतात. असं स्वप्नांवर भविष्य अशा पुस्तकात दिलेल्या असतात. स्वप्नात काय काय आलं त्यानुसार भविष्य सांगतात आजचे भविष्य किती लवकर किती उशिरा घडेल हेही सांगतात. गौतम बुद्ध जन्माला येण्याच्या आधी त्यांच्या मातेला हत्तीच स्वप्न पडलं होतं त्यानुसार राजदरबार यातल्या स्वप्नांचा तज्ञ यांनी येणाऱ्या बाळाचं भविष्य वर्तविला होता गौतम बुद्ध भविष्यात फार मोठ कर्तव्य करणार नाव मोठं करणार जगात शांतेतेचा मार्गाची शिकवण येणार.असं आपण शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात विद्यार्थी दशेत असताना अभ्यासक्रमात होतं. म्हणजेच स्वप्न काही चांगली असतात काही वाईटही असतात माणूस जगात वावरताना त्याची स्वप्न असतात ती त्याची स्वप्न पूर्ण झाली की ती त्याची स्वप्ने त्याला चांगले वाटतात पण का ते स्वप्न पूर्ण झालीच नाहीत तर मग ती स्वप्ने त्याच्याकरता त्याला वाईट वाटतात. इथे स्वप्न म्हणजे माणसाची ध्येय पण म्हणू शकतो.
बापूजी का सपना था सुंदर, स्वच्छ देश हो आपणा हे बापूजी का सपना था असे आपण आपल्या भारत देशात कुठे कुठे आहे स्लोगन वाचतो. इलेक्शनच्या वेळी राजकारणी माणसं जनतेला दिलासा देऊन मतांसाठी त्यांची स्वप्ने हळवी करतात जनतेला मतांसाठी वेगवेगळे स्वप्न दाखवतात म्हणजेच येथेही स्वप्नही आलीच म्हणजेच राजकारणी व्यक्ती निवडून आला आणि ती स्वप्न जनतेची पुरी केली गेली नाहीत तर ते स्वप्न जनतेला वाईटइच असतात. आईबापांचांही आपल्या मुलांबद्दल चांगली स्वप्ने असतात आपल्या मुलांचं चांगलं शिक्षण व्हावं, तो चांगलं कामाला लागावा, त्याला चांगली बायको मिळावी, चांगले मुले व्हावीत, चांगला त्याचा संसार व्हावा पण मुलांच्या बाबतीत असं होताना आई-बापांनी जी स्वप्न बघितलं असतात ती स्वप्न ते स्वप्न मुलांचे पूर्ण होतात असं पण नाही ती मुलं अशी स्वप्न बघणाऱ्या आई-बाबांचं स्वप्न चांगली करतात का ?,कारण अशीच काही मुलं आपल्या आई-बापांचा दुस्साहस करतात त्यांना परावलंबी झालं की व्यवस्थित लक्ष देत नाहीत ,आईबापांची काळजी घेत नाहीत कधीकधी ती मजल त्यांना घरातून काढण्यापर्यंत होऊन जाते काहींकाना अनाथ आश्रम मध्ये सोडलं जातं म्हणजेच आई बापाने मुलांकरता जे काही स्वप्न बघितले असतात ती नंतर आईबापाला म्हणजेच आई बापानेच मुलांची स्वप्न बघावी का?
का मुलांना आपल्या आई बापा साठी स्वप्न बघता येत नाहीत? आपण मोठे झालो की आपण आपल्या पायावर उभा राहिले की आई-बाबांसाठी त्यांच्याकडे जातीने लक्ष द्यायला हवं त्यांचं आरोग्य सांभाळायला हवं, त्यांचं वय फिरण्याचं असल्यामुळे त्यांना फिरण्यासाठी मदत करायला हवी, त्यांना काय हवं त्यांना काय नको त्यांच्या गरजा बघायला हव्यात मग ही स्वप्ने मुलानी आपल्या आई बापा साठी बघितलं तर काय वाईट आहे?पण मुलांनी आईबापाला चांगलं ठेवण्यासाठी स्वप्न नाही बघीतल तर ते स्वप्न वाईटच. आताच्या पिढीने आई-बाबांसाठी चांगली स्वप्न बघितलं तर मुलांना सुद्धा आपला आई बापा साठी चांगली स्वप्न बघायची सवय लागेल म्हणजेच स्वप्न हि स्वप्न राहणार नाहीत ही स्वप्ने मुलांबरोबर आई-बाबांचे ही स्वप्न पूर्ण होणार म्हणजेच ही स्वप्न वाईट असणार नाहीत. जेव्हा आई आपल्या बाळाला बाळसं घेतलेल्या गोंडस बाळाला आपल्या पदरात दूध पाजते तेव्हा त्या आईचं बाळासाठी एक वेगळं स्वप्न असतं तिला माहित नसतं ते बाळ मोठ्या झाल्यावर आपलं बायकोचं बरं वाईट ऐकून आपल्याला घराबाहेर काढून टाकेल अशी ती स्वप्न बघत नाहीत, पण ती स्वप्न पण बघायला हवीत म्हणजेच आताच वाईट स्वप्न पुढे सावध होऊन मुलाला चांगली, सवयी वळने लावून ते स्वप्न चांगले होऊ शकतात.
अब्दुल सत्तार नावाचे गृहस्थ भारतातल्या एका सरकारी खात्यात चांगले कामाला असतात. ते आपल्या कामाशी ईमानदार असतात. अब्दुल सत्तार आपलं घर आपलं कुटुंब आपलं काम,आपली सर्वीस या संसारात मग्न असतात त्यांना पाकिस्तानातल्या मुस्लिमा पेक्षा आपल्या भारतातल्या मुस्लिमांचं स्वाभिमान असतं ते कधी पाकिस्तान जिंकलं क्रिकेटमध्ये तर फटाके वाजवत नाहीत, पण क्रिकेटमध्ये भारत जिंकला तर फटाके आवर्जून वाजवत आहेत कारण त्यांना आपल्या भारतातल्या एकनिष्ठतेशी प्रामाणिकपणा आवडतो त्यांना माहित आहे कि ज्या भूमीत आपला जन्म झाला, आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न पडतो तो दूर झाला ज्या भूमीत आपला संसार झाला तीच आपली भूमी, तोच देश आपला, भारत देश आपला म्हणून त्यांना आपल्या भारताचा स्वाभिमान आहे आणि ते आपल्या भारतात सर्व धर्मात असे राहतात, एकत्र राहतात जसे एका कुटुंबात भाऊ बहीण, आई वडील राहतात, एकोपाने राहतात तशी ती अब्दुल सत्तार त्यांचे कुटुंब एकत्र राहतात. सुरुवातीला अब्दुल सत्तार यांचं नोकरीतील दिवस फार गरिबीचे होते ते पातलीपाडा गावात रामचंद्र खरे यांच्या चाळीत राहायला आले आणि रामचंद्र खरे बरोबर त्यांचे भावाभावासारखे दोस्ती यारी झाली आणि ते कित्येक वर्ष त्यांच्याकडे राहत होते आता त्यांची मुलं लहानांचे मोठे होणार म्हणून त्याने पातलीपाडा गावातच त्यांच्यासाठी स्वतःचा घर विकत घेतलं आणि त्यांना तीन मुले . हि तिने मुले अब्दुल सत्तार सारखेच चांगली स्वभावाची ,यांची मिसेज सुद्धा म्ह
णजे बायकोसुद्धा चांगल्या स्वभावाची. एकदा काय होतं रक्षाबंधनचा दिवस होता. त्यादिवशी सगळीकडे बहिण आपल्या भावाला राखी बांधत असते तसेच रामचंद्र खरे ह्यांची मुलगी आपल्या भावाला घरी राखी बांधते हेच अब्दुल सत्तार चे मुले पाहतात त्यांना दुःख होतो आमचे बहीण असती तर आम्हाला पण राखी बांधली असती मग होतं काय रामचंद्र खरे हे लांबूनच पाहत असतात अब्दुल सत्तार यांची मुलांचे रक्षाबंधनच्या वेळी भावनेत घालमेल बघतात त्यांना रहावत नाही ते त्या मुलांसाठी राखी घेऊन येतात चुपचाप आपल्या मुलीकडे देतात आणि म्हणतात मीना जा त्या अब्दुल सत्तार यांची मुलं आहेत त्यांना हि राखी बांध हे काय पैसे ताटात ठेवत असतील तर घेऊ नको ,पैशापेक्षा राखीला आणि भाऊ बहिणीच्या नात्याला फार महत्व म्हणून मीना त्यातील त्या अब्दुल सत्तार यांच्या तिघा मुलांना राखी बांधते त्यादिवसापासून आतापर्यंत भाऊ बहिणीचं नातं अमर आहे काही वर्षाने अब्दुल सत्तार यांच्या तीन मुलांचा लग्न होतं त्या लग्नात या बहिणीचा हि मानपान करतात त्या मुलांच्या बायकांना ती मुले सांगतात ये आपकी प्यारी ननंद है इससे अच्छा प्यार मोहब्बत रखना, रक्षाबंधन को हमे राखी बांधणे आयेगी उसकी इज्जत रखना,करना मग त्यांच्या बायका हसून या मानलेल्या बहिणीचा कौतुक करत म्हणत "ऐसा भी कोई हो सकता है भला, ये भाभी प्यारी ननंद भूल सकती है भला असे हे हे दृश्य खरोखरच्या असल्यावर प्रत्येकाच्या मनात पवित्र भावना किती चांगल्या झालेले असतात अशी स्वप्न अचानकच होत असतात पण एक वेळ अशी येते कि ते वाईट स्वप्न दोघां कडच्यांना नको असते.
ते स्वप्न हे असते, हिंदू मुस्लिमांचा दंगा होतो. त्यावेळी रामचंद्र खैरे अब्दुल सत्तार ह्यांना चांगल्या माणुसकीने त्यांची रक्षा करतात, त्यांच्या कुटुंबाचा रक्षा करतात .रामचंद्र खरे ना नंतर गावातील काही लोक त्यांच्याकडे चौकशीला येतात,त्यांना रागावतात पण रामचंद्र खरे पण काही कमी नसतात,त्यांची पण त्या गावात चांगलीच जरब असते भलभले त्यांना घाबरून असतात.कारण रामचंद्र खरे गोरगरिबाना अडले नडलेंना सगळ्याबाबतीत मदत करीत असतात,म्हणून रामचंद्र खरेंच्या विरोधात जायला गाववाल्यान हजारदा विचार करावा लागणार, दंगे मध्ये कोणाचा लक्ष नसताना त्याआधीच या मुस्लिम बांधवांना अब्दुल सतारला, त्यांच्या तीन कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पाठवतात, त्यांच्या मुलाला बाळाना सर्वांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर पाठवतात कारण त्या वेळेवर पाठवलं नसतं तर रामचंद्र खरे यांच्या चाळीत दोन-तीन मुसलमानांची कुटुंब उद्ध्वस्त झाली असती, त्याने जगाच्या पलीकडे माणुसकी दाखवली होती,वास्तविक भारतल्या मोठ्या समाज संस्थेने त्यांचा सहा कुटुंब वाचवले म्हणून पुरस्कार, सत्कार करायला हवा होता पण रामचंद्र खरेंनी त्याची कधी आशा केली नाही हिंदू मुस्लिमांचा दंगा संपल्यानंतर मुस्लिम बंधू मुस्लिमांच्या आपल्या एरिया राहायला गेले व मुस्लिम बंधू रामचंद्र खरेंना तिथे असलेली घरजागा देऊ करत होती पण त्यांनी घेतली नाही उलट ते म्हणाले अपना ये हिंदु मुस्लिम का भाईचारा है, ईसमे किसी बात की लालच मत डालो, अब्दलभाई हे रामचंद्र खरेंचे बोलनं बघून धिप्पाड देहाच अब्दुलभाई भावनेने लहानमुलासारखं हुमसाहुमसा रडायला लागला होता, रामचंद्र खरेनी अब्दुलभाईंना प्रेमाने शांत केले.
रामचंद्र खरे अब्दुल सतार बोलले ,"अब्दुलभाई कभीकभी बुरा सपना मेरा मतलब वाईट स्वप्न सुद्धा माणुसकीची परिक्षाच घ्यायला येतं " पण रामचंद्र खरेनी आणि अब्दुल सत्तार यांचा भाईचारा कायम टिकून होता धर्माधर्मात आपापले नियम असतात पण अशा या भाईचारा मुळे धर्माधर्मात चांगल्या भाईचारासाठी धर्मातल्या शास्त्रात या गोष्टीचा आधार घ्यावा लागतो त्यामध्ये सुद्धा भाईचारा पेक्षा दुसरा कोणतच महत्त्वाची गोष्ट नाही असं दिसून आलेला आहे म्हणून तर अब्दुल सत्तार वत्यांचं कुटुंब रामचंद्र खरे यांच्या गणपतीला दहा दिवसाच्या गणपतीला येतात गणपतीची मनोभावे पूजा करतात गणपतीचा महाप्रसाद आपल्या मुस्लिम कुटुंबासमवेत घेतात आणि आनंदाने आपल्या घरी येतात येथे रामचंद्र खरे यांची मुलगी मीना या मुस्लिम मुलांना भावंडाना रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधायला जात असते तिची हि मुस्लिम भावंडे चांगल्या बहिणीची आवड करतात तिला साडी मिठाई घेतात आणि तिच्या नवर्याकडे ची, तिची संसाराची विचारपूस करतात,त्यानाही वाटतं आपली हि बहीण संसारात चांगली राहावी.ईदच्या दिवशी अब्दुल सतार कडची स्वादिष्ट शिर कुरमा रामचंद्र खरेकडे पोहचलेली असायची आणि दिवळीच्या दिवशी रामचंद्र खरेंकडची दिवाळीची मेवामिठाई,लाडू करंज्या बरफी अब्दुल सतारां कडे पोहचली असायची. असे हे हिंदू मुस्लिमांचं भावाभावाचं,भाऊ-बहिणीचा नातं सांगणार पवित्र बंधने असतात या बंधनात काही वाईट स्वप्न पडतात पण ती स्वप्न श्री रामचंद्र खरेने हिंदुमुस्लिम दंगा च्या वेळी अब्दुल सत्तार यांच्या भाई चाऱ्यात कमी पडू दिले नाही हिंदू-मुस्लीम चा हा दंगा हे वाईट स्वप्न होतं पण रामचंद्र खरेने आणि अब्दुल सत्तारांने आपल्या भाईचार्याने हिंदू मुस्लिमाचे दंगेचे हे वाईट स्वप्न चांगल्या हिंदू मुस्लिमच्या भाई चाऱ्यात चांगलं स्वप्न तयार केल होत मग हे दंगेचे वाईट जरी स्वप्न असले तरी रामचंद्र खरे आणि अब्दुल सत्तार त्यांच्यासारखे हिंदु धर्मात मुस्लिम धर्मात राष्ट्रीय एकोपा साधणारे आपण चांगली स्वप्न बघायला हवेत नाही का ?
मग हे वाईट स्वप्न स्वप्न राहणारच नाही.