Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Pallavi Udhoji

Others

0.5  

Pallavi Udhoji

Others

एक थरारक अनुभव

एक थरारक अनुभव

1 min
579


खूप आपण आपल्या आयुष्यात व्यस्त झालो स्वतःसाठी असा वेळ नाही असा मनात विचार करत होती. आज रविवार घरातले सगळे झोपले अन् मी मात्र जागी. रोजच्या सारखी सवय लवकर उठण्याची. निपचित खुर्चीत बसली होती खिडकीबाहेर पडणारे दवबिंदू फुलाशी हितगुज करत होते. चिमण्यांची किलबिल खूप प्रसन्न वाटत होते तेवढ्यात संजूनी हाक मारली रूपा चहा हवाय. म्हणून लगबगीने उठली.


चल रूपा आज आपण सिनेमाला जाऊ. एक हॉरर सिनेमा लागलाय. संजुला हॉरर सिनेमा खूप आवडायचं पण मला खूप भीती वाटायची पण त्याला आवडतो म्हणून मी हो म्हटले. दिवसभर सगळी कामं लवकर आटोपली अन् आम्ही संध्याकाळी शो बघायला निघाली. त्या हॉरर ह्या शब्दांनीच माझ्या मनात धडकी भरायला सुरवात झाली.

शो सुरू झाला. तसा मी संजुचा हात घट्टा धरला. वेडी आहे का अजून सुरूच व्हायचा आहे ना. काय करावं ह्या बाईचं असं म्हणून संजुने माझ्याकडे दुर्लक्ष केला. तेवढ्यात रात्र होते हिरॉईन रस्त्याने जाता रातकिड्याची किरकिर माझ्या मनात धडधड निर्माण करत होती. तेवढ्या ओसाड जागी ती उभी राहिली आणि जमिनीतून हात वरती आला. तेवढ्यात ती किंचाळली आणि इकडे माझी डरकाळी संजुला मला अवरणे कठीण झाले. तो सिनेमा आम्ही अर्धाच पाहून घरी आलो.


घरी आल्यावर तो जमिनीतून निघालेला हात माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हता. तेव्हापासून संजुने कानाला खडा लावला, हिला कधी परत सिनेमा दाखवायचा नाही.

माझ्या आयुष्यातला तो अखेरचा सिनेमा होता...


Rate this content
Log in