Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Pallavi Udhoji

Others


1  

Pallavi Udhoji

Others


एक अनुभव स्वप्नविन काही

एक अनुभव स्वप्नविन काही

2 mins 536 2 mins 536

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येतात. हे अनुभव आपल्या भावी आयुष्यात जगण्यास शिकवतात. अनुभव माणसाला शहाणा बनवतो. अनुभवल्याशिवाय माणसाचे ज्ञान अपुरेच आहे. जेव्हा आपल्या हाती काहीच लागत नाही तेव्हा आपल्याला अनुभव शिकवून जातो. आपण काय करतो माहिती आहे का आपण नेहमी दुसर्यांच्या चुका शोधत बसतो, उणिवा काय आहे ते बघतो, तर तुम्ही चुकांना शोधता स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघा. तुमच्या जीवनात तुम्हाला अनेक आव्हाने येतील की तुम्ही स्वीकारा एक तर त्या तुम्हाला विजय मिळेल नाहीतर तुम्ही हराल पण त्यातूनच तुम्हाला अनुभव मिळेल.

तुम्ही सतत प्रयत्न करा जर तुम्ही मागे वळून बघाल तर तुम्हाला अनुभव मिळेल त्यापुढे वळून बघाल तर तुम्हाला आशा मिळेल की तुम्ही विजय होणार. जर समजा तुम्ही कधीकधी बघाल तर सत्य तुम्हाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये खोलवर बघाल तर तुम्हाला आत्मविश्वास मिळेल तुम्ही स्वतःला सकारात्मक समजाल.

आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की आपल्या निर्णय हे चुकीचे ठरतात त्यातून आपल्याला यश मिळत नाही पण हा चुकीचा निर्णय आपल्याला एक अनुभव देऊन जातो आणि जर योग्य निर्णय आपल्याला आत्मविश्वास घेऊन जातो निर्णय चूक आणि बरोबर हा विचार न करता निर्णय घेऊन पुढे जायचे.

आपण म्हणतो परमेश्वर आहे. आपण मंदिरात जातो परमेश्वराचे दर्शन घेतो आपल्या मनाला शांतता मिळते आपण चांगले कर्म केले तर आपल्या कर्मात आपल्याला परमेश्वर दिसेल. आपल्या मनाच्या कोपऱ्यात आपण काही गोष्टी लपवून ठेवतो का तर समोरच्याला त्याचा त्रास होणार नाही. कारण सगळेच अश्रु हे दिसायला नको, सगळ्याच नात्यांना आपण नाव नको द्यायला स्वप्न पूर्ण होत नाही म्हणून आपण ते बघणं सोडून देतो का? तर नाही ना. कारण आपण ती आपल्या मनात जपून ठेवतो आपण आपल्या माणसांवर प्रेम करतो ते प्रेम गमावू नये म्हणून आपण भांडल्यावर आधी क्षमा मागतो आपल्याजवळ अमुल्य अशी कोणती गोष्ट आहे ती म्हणजे अनुभव. अनुभव हा माणसाला शहाणा बनवतो.

त्यासाठी व कामाप्रती माणसा जवळ येतात प्रेमाने राहतात आणि स्वार्थ संपला की दूर होतात. तसेच विचारांनी व प्रेमाने जवळ आलेली माणसं ही आयुष्यभर सोबत राहतात. चांगले कर्म केली की त्याचे कौतुक होते प्रशांसा होते हे कौतुक यांचे प्रोत्साहन वाढवते याउलट जर टीका झाली तर हीच टीका त्याला संधी देते त्याच्या चुका सुधाराव्यात म्हणून. एक सत्यता सांगते समोरच्या माणसाची जितका चांगलं वागता येईल इतकं चांगलं वागायला हवं आपण तर एवढं नक्की सांभाळू शकतो की आपल्यामुळे समोरच्या व्यक्ती दुःखी झाला नाही पाहिजे आणि हे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही


Rate this content
Log in