Nurjahan Shaikh

Others

3  

Nurjahan Shaikh

Others

दूरदृष्टी

दूरदृष्टी

2 mins
217


भविष्य कोणासही पाहता येत नाही. आलेल्या अनुभवातून भविष्यात काय होईल याची आधीच कल्पना येत असते. त्या दृष्टीने विचार करणे म्हणजेच थोडक्यात दूरदृष्टी बाळगणे होय. दरवर्षी येणारे सारखेच अनुभव भविष्यातही येणारच याबद्दल दुमत नाही. काही अंशी, कमी- जास्त प्रमाणात त्याची प्रचिती येऊ शकते. परंतु भविष्यात येणाऱ्या समस्यांचा वेळीच अंदाज बांधून त्यातून मार्ग कसे काढावे हेच आपल्याला दूरदृष्टीतून शिकता येते. 

       निसर्गप्रलयाच्या समस्या आज काल भेडसावत आहे. ज्या लोकांना या प्रलयाला सामोरे जावे लागते त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे आणि दुःख हि वाटते. त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकत आहे. अशावेळी मनात एकच प्रश्न निर्माण होतो याला जबाबदार कोण ? प्रलय एक निर्जीव घटक आहे तो पूर्वकल्पना देऊन प्रलय माजवत नाही आणि त्याचा प्रकोप इतका भयंकर आहे की तो कोणाचे ऐकत ही नाही किंवा कोणासमोर नमत नाही. निसर्गाच्या प्रकोपाला काही घटक कारणीभूत आहेत, ते घटक देखील मानवाच्या नियंत्रणाबाहेरचे आहेत.

      असो ! आपण दूरदृष्टी बद्दल बोलत होतो. दूरदृष्टी असणारी व्यक्तीच चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकते. परंतु दूरदृष्टी म्हणजे काय ? एखादा येणारा संभाव्य धोका, घटना किंवा अनुभवाने मांडणारे मत, भविष्यात काय होईल? याबद्दल केलेले भाकीत, हेच आहे. रोजच्या जीवनात येणारे अनुभव सगळेच अनुभवतात. दरवर्षी घडणार्‍या घटनांमधून, समस्यांमधून सगळ्यांना जावे लागते. मग उद्या किंवा येणाऱ्या वेळेत काय होईल, याची कल्पना माणसाला कशी येत नाही ? वयस्कर असो किंवा ज्यांनी अनुभवाचे चटके सोसले आहे, अशी माणसे आपल्या अनुभवाचा उपयोग का करत नाही? नेहमी समस्या येण्याची वाट का बघतात ? का वेळीच उपाय करून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकत नाही?

       म्हणतात ना 'घरोघरी मातीच्या चुली' मग अशा समस्या सर्वच घरात असतात. स्वतःच्या हिमतीने स्वतःला का सावरत नाही? ज्यावेळी मानव आपल्या कुटुंबाचा विचार करतो, त्यावेळी पहिले प्राधान्य त्याने कुटुंबाच्या सुरक्षिततेला द्यावे. आज सामाजिक माध्यमे एवढी सक्रिय आहेत निदान त्यांचा योग्य वापर करून तरी आपल्यात दूरदृष्टी ठेवावी. ज्या धोक्याच्या स्थितीत आपण जाणार आहोत निदान त्याची कल्पना तर प्रत्येकाला असायला हवी. शालेय शिक्षणात लहान मुलांना समस्यांमधून बाहेर कसे पडावे, ज्या समस्या असतील त्यांची कारणे, उदाहरणे, उपाययोजना या सगळ्यांची माहिती दिलेली असते. अशा वेळी निदान मिळालेल्या शिक्षणाचा ज्ञानाचा तरी वेळेवर उपयोग करावा.

       म्हणूनच म्हणावेसे वाटते की प्रत्येकाने दूरदृष्टी बाळगावी. वेळेवर सर्वांना समज द्यावी. गरज पडेल तेव्हा त्याचा योग्य उपयोग करावा. दुसऱ्यांनाही योग्य पद्धतीने मार्गदर्शन करावे. म्हणजे भविष्यात कोणालाही कठीण प्रसंगातून जावे लागणार नाही व सहजतेने तो या दुःखातून संघर्षातून स्वतःची व इतरांची सुटका करू शकेल.


Rate this content
Log in