Aruna Garje

Others

4.0  

Aruna Garje

Others

दुसरी लाट...

दुसरी लाट...

1 min
340


ती सारं काही संपवून टाकावे या उद्देशाने समुद्र किनाऱ्यावर आली.

   एवढ्यात एक लाट येऊन तिचे अश्रू पुसून तिला भिजवून गेली. तेव्हा काही थेंब तिच्या तोंडात गेले. 

   असेच सर्वांच्या डोळ्यातील अश्रू पुसता पुसता समुद्राचे पाणी खारट तर झाले नसेल ना? 

   अगं वेडे! खरे आयुष्य जगणे ह्यालाच तर म्हणतात दुसरी लाट सांगून गेली. 


Rate this content
Log in