आयुष्य...
आयुष्य...
1 min
37
सुपातील धान्य पाखडून निवडून मापटात भरतांना ती मनाशीच म्हणाली - "आजपर्यंत आपण आयुष्य जगलो पण आयुष्य जगणे तरी वेगळे असे काय आहे?
निवडक सुखद क्षणांना मनाच्या मापटात साठवून जपून ठेवणे आणि मनाला टोचणाऱ्या क्षणांना दूर सारणे ."
'चल हट फटाफट' म्हणत आयुष्य कसे जगायचे इवल्याशा सुपाने आज तिला शिकविले.
