Aruna Garje

Others

4  

Aruna Garje

Others

धडपड

धडपड

1 min
392


उड्या मारून मारून बाप्पाला पाहण्याची तिची धडपड चालू होती.

  

 ते पाहून त्याने तिला पटकन उचलून घेतले तेव्हा ती तिचे चिमुकले हात जोडून म्हणाली- "बाप्पा! मला माहित आहे तू लहान मुलांचे ऐकतोस मग माझ्या आई बाबांना लवकर पाठवून दे ना ." 

   

तो आणि त्याची पत्नी एकदमच बोलून गेले - "अगं! बाप्पांनीच तर आम्हाला पाठवले. " 


 आज खऱ्या अर्थाने बाप्पा दोघांनाही पावला होता. 



Rate this content
Log in