STORYMIRROR

Aruna Garje

Others

4  

Aruna Garje

Others

दुःख

दुःख

1 min
434

अलक 

दुःख


छोटेसे झुडूप मोठ्या वृक्षाला म्हणाले- "वृक्षराज, तुम्ही किती उंचेपुरे, फुलाफळांनी बहरलेले.तुमच्या सावलीत सारेच छान विसावतात. नाहीतर मी. एवढासा खुरटलेला. कोणीही यावे ओरबाडून जावे.

    " अरे वेड्या! ज्याचे दुःख त्यालाच ठावे. आपल्याला नेहमीच स्वतःचे दुःख मोठे वाटते. "

एवढ्यात पावसाने वादळीवाऱ्यासवे एवढे थैमान घातले की वृक्ष मुळासकट उन्मळून पडला. झुडूप तशाही परिस्थितीत ताठ उभे होते.



Rate this content
Log in