STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

दु:खाची जाणीव

दु:खाची जाणीव

1 min
292

  संत नामदेवांच्या आईने त्यांना बालपणापासून चांगले शिक्षण दिले होते. त्यामुळे कोणाला एखादी गोष्ट मनाला लागेल, वक्तव्य ते करित नसत. कोणतेही काम करताना ते अजमावत की ते करताना माझ्यवर काय परिणाम होईल? 

  

एकदा घरातील जळण संपले होते.नामदेवांच्या आईने नामदेवांना हाक मारली आणि साांगितलेे , 'जा परसातल्या पळसाच्या झाडाची साल काढून आण'. आई म्हणजेे नामदेेवांंचे दैवत! तिच्या आज्ञेेेचे ते त्वरेने पालन करीत. त्यांनी कोयता घेतला आणि ते झाडाकडे पळाले. झाडाची साल त्यांनी काढली. आणि आईला आणूूूून दिले. नंतर नामदेव खेळायला गेले.. नामदेव खेेळत- खेळत त्या झाडाकडे गेेेेले पाहिले तर काय झाडाचा बुंधा ओलसर झाला होता. ते झाड जणू रडतच आहे असे वाटते. नामदेव गलबलूून गेलेेे त्यांंना फार दु:ख झाले. त्यांनी कोयता घेतला व स्वतःच्या पायाचे सालटेे काढले, तर काय

पाय रक्तबंबाळ झाले होते.

सगळे आवाक झाले. आईला हाक मारली ती धावत आली. बघतेे तर नामदेवांचे पाय रक्तबंबाळ झाले तिने त्याच्या पायाला हळद लावली, पट्टी बांधली मग नामदेवांना विचारले, कशी झाली ही जखम? तेव्हा नामदेव म्हणालेेे झाडाची साल काढल्यावर झाडाला काय वाटले असेल? त्याचे बोलणे ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले होते. तेव्हा सर्व मंडळींना दु:खाची जाणीव झाली. 


Rate this content
Log in