STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

दु:ख असेही...

दु:ख असेही...

1 min
87

आज या सुंदर जगात माणूस जन्म घेऊन काही जण प्रगती करु लागले आहेत, तर काही जण अधोगती करत आहेत. माणूस जीवन जगत असताना तो जर प्रामाणिक पणे जीवन जगला तर त्याची किर्ती अजरामर राहते, लोक त्यांच्या हयातीनंतरही त्यांचे नाव काढतात आणि याच्या उलट जर एखादा माणूस वाईट वृत्तीचा असेल तर त्याला लोक कंटाळून जातात. हे काय मुशीबत आपल्या समोर आली. म्हणून लोक म्हणतात त्याचे नाव काढू नका. अशा माणसांच्या या दोन पद्धती आहेत. चांगला आणि वाईट. वाईट माणूस जीवन जगत असताना इतरांना त्रास देत राहतो. तो अनेक वाईट व्यवहार करतो, ऐतखाऊ वृत्तीने तो वागत असतो. काहीही झाले तरी मी ऐश- आरामात जगले पाहिजे.            


म्हणून तो काहीही कामधंदा न करता इतरांना त्रास देऊन, धमकी देऊन आपले स्वार्थ साधतो. आणि त्यांच्या पासून निष्पाप माणूस दु:खायला जातो. व इतरांच्या डोळयात पाणी येऊ लागते. कशामुळे तर या वाईट माणसाच्या वागणुकीमुळे. लोक त्याला पाहिले की घाबरून जातात. हे काय आलंय राक्षसी अवतार! हा माणूस एखाद्याला त्रास देत असेल तर ते पाहणाऱ्या इतर माणसांना पण त्याच्या या वागणुकीमुळे दु:ख होते. अरे! हे असे का वागत आहे? म्हणून तो दु:खी होतो. 


      प्रामाणिक माणूस असे विचार करतो की, आपल्यापासून इतरांना त्रास होणार नाही, इतरांची मने दु:खावणार नाही, आपल्यापासून इतरांच्या डोळयात पाणी येणार नाही. असे विचार करतो. याचा सारासार विचार केला तर वाईट माणसांच्या वर्तणूकीमुुळे इतर माणसे असे दु:खावतात.त्यांना हा अन्याय नको होता.. 


Rate this content
Log in