दरी
दरी
झोपडी असो वा माडी
आपापसांत होती गोडी
माणसं होती साधीभोळी
असं होतं आमच्या काळी
शेतामध्ये जाणं होतंं
मोटेवरती गाणं होतं
पाटामधलं पाणी होतं
पिकं आमचं सोनं होतं
दैवत आमचे बैैलजोडी
असं होतं आमच्या काळी
झालं का भाऊ जेवण?
असं आदरानं विचारवंत होतंं
असं सुख-दु:खाच्या गोष्टी करत
घरीदारी बसणं होतं
एकच होती चिलीम बिडी
असं होतं आमच्या काळी
शेवापदरानंं रहात बाया
सासू-सासऱ्याच्या पडत पाया
आल्यागेल्यांना लावत माया
अशा होत्या आमच्या आया
अंगभर घालत साडीचोळी
असं होतं आमच्या काळी
संबंध होते गावागावात
घरोबा होता रंक रावात
प्रेम होते भावाभावात
मान होता जावाजावात
नव्हता बंगला, नव्हती गाडी
असं होतं आमच्या काळी
आठवते ती गावची शाळा
आम्हाास तिचा होता लळा
घडवीत होती अजाण बाळा
संस्ककाराचा घेतला धडा
तिथेच घडली आमची पिडी
असं होतं आमच्या काळी
सुट्टीत मामाच्या गावी जायचो
नवा पायजमा शर्ट घ्यायचो
भजे, वडेे लाडू खायची
मित्रासंगे नदीत पोहायची
घ्यायला यायची बैलजोडी
असं होतं आमच्या काळी
नव्हता गॅस, नव्हती कुकर
चुलीवरची खरपूस भाकर
काला मोडून दुधात साखर
खाऊन तृप्तीची दयावा ढेकर
अमृताची होती गोडी
असं होतं आमच्या काळी
आबा, आजी गोष्टी सांगत
नातवांसाठी रात्री जागतिक
मध्येेच विचारत उत्तर मागत
संस्कार करत पकडत नाडी
मांडीवरच काही पेंंगत
असं होतं आमच्या काळी
मोबाईल आला, टी व्ही आला
माणूस पूूर्ण एकलकोंडा झाला
सुधारणेचा बोलबाला
गेला आमचा काळ
माणूसकीचा गेेला बळी
असं होतं आमच्या काळी!!!!!.....
