दोस्ती
दोस्ती
चेतन आणि नदीम दोघे चांगले मित्र होते. ते दोघेही रिक्षा चालवित होते. दोघेही एकमेकांना दररोज भेटत होते, एकमेकांशी एकमेकांचे सुख, दु:ख सांगून मन मोकळे करायचे. दोघांचा एकमेकांना आधार वाटत होता, दोघेही एकमेकांच्या सुख, दु:खात मदत करत. दोघेही प्रामाणिकपणे आपला धंदा करीत असत. इतर सर्वांना यांच्या दोस्तीचे कौतुक वाटत.
सर्वत्र यांच्या दोस्तीचे चर्चा केली जात होती. नदीला लाॅटरी काढायची फार पूर्वीपासून सवय होती. कधी दहा रुपये, तर कधी शंभर रुपये लागायचे आणि कधीकधी काहीच लागायचे नाहीत. तेव्हा नाराज होत होता. अशावेळी चेतन त्याला समजावायचा. चेतन नदीमला खूप सांगायचा की लाॅटरी काढू नको. पण नदीम ऐकायचा नाही. केव्हा केव्हा तो लाॅटरी काढायचा.
अशातच चेतनचे लग्न जमले. लग्नात नदीम खूप काम केला. चेतनचे लग्न पार पडले. त्याचा संसार चांगला चालला होता. नदीचे अगोदरच लग्न झाले होते. त्याला दोन मुले झाली होती. दोघेही आनंदाने संसार करीत होते. संसार करीत असताना सुद्धा त्यांच्या मैत्रीत काही परिणाम झाला नव्हता. मैत्री ही अतूट होती.
एकदा नदीमला 50 हजाराची लाॅटरी लागली होती. तेव्हा नदीमने हाॅॅॅटेल टाकायचा विचार करत होता. नदीमने चेतनला म्हणाला आपण दोघे दोघांत
हाॅटेल टाकू. तेेव्हा चेतन नकार दिला. तेव्हा नदीम एकट्याने हाॅटेल टाकला. हा धंदा चांगला चालला होता.
एके दिवशी चेेतनचा अपघात झाले. त्यात त्याचा एक पाय गमवावा लागला. तेव्हा नदीम चेतनच्या सोबतच होता. तो आपला धंंदा बंंद
ठेवून चेतनसोबतच होता. दवाखान्याचा सर्व खर्च नदीमनेच केला. अशी होती दोघांची मैत्री. पुुढे चेतनची बायको दुुसऱ्याच घरची धुणीभांडी करून आपला संसाराचा गाडा चालवीत होती.
अशा मैत्रीला सलाम
