STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

दिवाळी

दिवाळी

2 mins
294

दीपावली 


🌷 शुभेच्छांचा मेसेज करण्याऐवजी प्रत्यक्ष फोन करावा समोरच्या व्यक्तीला छान वाटते.

🌷 हल्ली फराळाचे एवढे काही अप्रूप राहिले नाही कारण आपण वर्षभर फराळ कोणता ना कोणत्या मिठाईच्या दुकानातून आणत असतो आणि खात असतो परंतु फराळाच्या निमित्ताने एकमेकांकडे जावे एकमेकांच्या भेटी घ्याव्यात. एवढे सोपे नाही पण तरीसुद्धा भेट घेतली तर खूप आनंद होतो एकमेकांना.

🌷 ज्या मित्रांची, ज्या नातेवाईकांची खूप वर्ष आपण भेट घेतली नाही त्यांच्या घरी थेट भेट घ्या किती आनंद होईल बघा आपल्या दोघांनाही आनंद होईल हो की नाही बरं!

🌷 नोकरी करून आपण खूप कंटाळलेलो असतो पण काही वेळ आपल्या मुलांसाठी द्या.नातेवाईकांसाठी द्या.आपल्या कुटुंबासाठी द्या. मस्त मजेमध्ये फिरायला जा एन्जॉय करा. आणि पुढील वर्षासाठी पूर्ण ताजेतावाने व्हा.

🌷 शाळा कॉलेजमधील काही मित्र-मैत्रिणी असतील तर खरंच एकमेकांची भेट घ्या गेट-टुगेदर करा. आपल्या सुखदुःखांची देवाण-घेवाण करा.

🌷 एखाद्या सामाजिक संस्थेला भेट द्या. जन्माला आलो आहे तर आपल्या नोकरीचा ,आपल्या पगारातील काही भाग आपण अनाथ, दीन मुलांसाठी खर्च करूया.

🌷 आपल्या घरी काम करणारी बाई, स्वच्छता कामगार, दूध घालायला येणारी मुलं, पोस्टमन, सोसायटीचे वॉचमन यांना हसत मुखाने दिवाळी भेट द्या. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवा.

🌷 दिवाळीमध्ये आपण खूप खरेदी करतो पण हे खरेदी करताना मोठमोठ्या दुकानांच्या ऐवजी फुटपाथ वर घेतलं तर त्या लोकांना आनंद होतो.

🌷 फुटपाथ वरून घेण्याच्या वस्तू अगदी साध्या साध्या आहेत. दारापुढे लावण्याचे स्टिकर्स, रंग, रांगोळी, फुलं, पणत्या इत्यादी साहित्य आपण फुटपाथ वरून खरेदी करू शकतो.

🌷 दिवाळी पहाट हे कार्यक्रम बऱ्याचदा नि:शुल्क असतात त्याचा उपभोग पण घ्यावा. आणि ते खूप छान असतात. त्यानिमित्ताने आपण सर्व घराच्या बाहेर एकत्र पडतो.

🌷 हल्ली एकमेकांकडे जायला जर का वेळ नाही आपल्याला तर आपण एखादा छानसा प्रोग्राम अरेंज करून सर्वांना इन्व्हाईट करावे. व मनसोक्त आनंद घ्यावा आणि द्यावा.

🌷 जिथे आपल्याला आमंत्रित केले असेल तिथे तर नक्की भेट द्यायला जा.


 अशाप्रकारे ही दिवाळी आपण साजरी करूया शुभम भवतू!!!🍫🌹❤️

 वसुधा नाईक पुणे


Rate this content
Log in