दिवाळी बोनस
दिवाळी बोनस


दिवाळीचा सण तोंडावर आला होता.त्यादिवशी आफिसमध्ये लक्ष्मीपुजा होती.साहेबांनी पुजा झाल्यावर पगाराचे पुडके व मिठाईचा पुडा वाटला.
डबलपगार पाहुन मी खुश होतो.दिवाळीत येणारा खर्च मारतो.पगार बँगेच्या कप्यात सुरक्षित ठेवतो.घरी गेल्यावर बायकोला भरझारी साडी,मुलांना चांगले कपडे,आँफिस,एक चांगल्या हाँटेलमध्ये जेवण.मुलीला एक सायकल ….असे अनेक खर्च तसेच भाड्याचे पैसे,उधारी फेडून टाकु,बायकोला काणातील सोण्याची झोंबले,नाहीतर एखादा छानसा स्मार्टफोन.
अशा स्वप्नदरीतुन व गर्दीतून मी प्लँटफाँर्मवर जडतो.संध्याकाळची वेळ असते.मी दादरला चढतो.बँगव्यवस्थित पाडतो.त्या बँगेत माझी स्वप्न असतात.त्या बँगेत माझा संसार असतो.त्या बँगेत माझा जेवणाचा डबा असतो.त्या बँगेत माझा फोन असतो.पैस्याचं पँकेट ही त्यांच कक्षात असत,असं एक छोटंसं कुटुंब त्या बँगेत सामावुन ठेवले होते.
त्यादिवशी पगार व दिवाळी बोनस मिळाला होता.म्हनुन जाम खुशी चेहर्यावर झळकत होतो.डबलपगार पाहिल्यावर बायको खुश होईल, ह्या स्वप्नांत मी रंगलो.आज रात्र खुपच मधहोश असेल, अशी अणेक स्वप्न एका दिवाळी बोनसवर माझ्या स्वप्नाची सजवट होतो.मुलांसाठी फराळांचा बेत,घरात गोडधोड,मुलांसाठी फटाके,
तेवढ्यात पाठी मागुन जोराचा धक्का लागतो, त्यासरशी स्वप्नपट अर्धवट राहातात.मी रँकवरती बँगेत ठेवतो.घाटकोपर आल्यावर बसायला सिट मिळते.आजानक मला डुलकी लागते.पुन्हा मी अर्धवट राहिलेल्या स्वप्नात सैर वावरतो.स्वप्नांत मी एक स्वप्नातल घर पाहतो,छोटासा परिवार दिवाळी साजरा करताना पाहतो.बायको घरात फराळाची यादी तयार करीत असते.घरात सणासुदीचे लगबग चालु असते.दरवाजावर कंदिल लटकवलेला,बायको सकाळीची तयारी करीत होती.मुलाला आंघोळीला उतणे ठेवलेले,तसेच घरात एक नविन फ्रिज घेतलेला.जुनाटिव्ही ऐवजी नविन एलईडी टिव्ही भिंतीला लटकेला होता.बायकोला गळ्यात भळामोठं सोण्याच मंगळसुत्र व कानातिल झुंबके पाहुन मी लगेचच दचकुन जागा झालो.
मला डोंबवली ला उतरायचे असते.मी ठाणे आल्यावर उठतो.ट्रेन पार्शी बोगद्यातुन जात होती.रँकवर ठेवलेली बँग चाचपडतो.बँग उचलतो.बँग किंचितशी हळकी वाटते.बँग मधील पँकिट शोधतो.पाहतो तर माझे गलित गात्र होते.पाकिट गायब होते.कोणीतरी बँक घाईगडबडीत स्वता:ची समजुन घेवुन गेला होता.
ज्या व्यक्तींची जी बँग होती त्यात फक्त एक जेवणाचा टिफीन होता.बँग बाकी रिकामी होती.मी सैरावैरा पाहतो.पगारच्या पगार बँगेत होता.ट्रेनमध्ये पाहिलेली स्वप्न धुळीला लागली होती.”काय करु, काय नको, असे झाले होते.डोकं काम करायचे थांबले होते.घराचे भांडे,बायकोचे कपडे,मुलांची दिवाळी, चांगले कपडे,फटाके,फराळ असे सर्वच माझ्या डोळ्यासमोर थैमान नाचत होते.
ज्याची बँग बदली होते त्या जागी दुसर्याची बँग येते.त्या बँगेच्या एका कप्यात आणखिन एक वस्तु सापडली ती म्हजे … एक फोनडायरी असते.त्या डायरीत काही फोन नंबर होते.मी त्या नंबरवर फोन करतो.
‘हेलो,माझी बँग तुमचाकडे गेली आहे,असे मी बोलतो.
‘मी नाही, घेवुन गेले, तुम्हाला कोण हवय,
ज्याची बँग आहे,त्या बँगेत डायरी सापडली त्यात तुमचा नंबर सापडला म्हनुन फोन केला...तुम्ही ओळखता का?...
त्याडायरीत फक्त दिवा असेच लिहीले होते.मग तो सांगतो की,तुमचा नंबर ह्या डायरीत आहे त्याचा बँग हरवली आहे” तुम्हाला माहीत आहे का? दिवा साईटला कोणी तुमचे नातेवाईकाची बँक ट्रेनमध्ये चुकुन माझ्याकडे आली आहे.व त्याने माझी बँग चुकुन स्वता ची समजुन घेवुन गेला आहे.
“ओके,आले लक्षात,मी तुम्हाला सांगतो.
दोन्ही प्रवासांकडच्या बँग आदली बदली होतात.दोघांच्या वस्तु बँगेत असतात.त्यामुळे कोणाला संपर्क करायचा हाच पेच होता.मी पिसीओवरुन फोन करुन प्रत्येक नंबरवर फोन करायचे.
माझा फोन ही माझ्या बँगेतच होता.म्हनुन मी पिसीओवरुन फोन करायचे.पण माझा फोन स्वीट आँफ दाखवत होता.मग माझी खात्री झाली की कोणीतरी फोन मुद्दाहुन बंद केला असेल,व लंपास केला असणार.मी त्याबँगेतिल
डायरी नीट निरखुन पाहिल्यावर त्या व्यक्तींचा नाव ‘प’अक्षरावरून असणार कारण की,बहुतेक व्यक्ती ची नावे कामगार व आडनाव असे काँलम करुन पुढे नंबर लिहीले होते.
मग मी तुमचे नाव’ प’अक्षरावरून आहे का?...तुमची बँग हरवली आहे का?
मग एकदासा एका दिव्याला राहानारा कामगाराला फोन लागतो.’प’
अक्षराची नावाची व्यक्ती दिव्याला राहते का?
तो” हो”म्हनतो.
“पवार” आडनावाची.
मग मी त्याला दिव्याला भेटतो.मग माझा जिवात जिव येतो.ज्याने बँग घेवुन गेला होता तो घरी पोचला होता.तोप्रर्यंत ईकडे केवढे महाभारत झाले असेल त्याची त्याया सुतारान पण कल्पना नसावी.
ज्याव्यक्तीला फोन लागतो तो व्यक्ती दिव्या ला आपल्या ओळखीचा माणसांना फोन करतो.मग खुप प्रर्यंत केल्यावर त्याला समजते की,त्यांचीच नातेवाईक आहेत.
मग आम्ही घरी पोचतो.दरवाजावर ठोकावतो.
टक टक आवाजाने दरवाजाच्या कडीची आवाज उघडण्यात येतो.
त्यामित्राला पाहुन, ‘भाऊजी,आत या ना !”
मग आम्ही सविस्तर घटना वर्णन करतो.
ज्याने चुकुव बँग घेवुन आला होता.त्याला माहीत नव्हते की,त्याने चुकुन दुसर् याची बँग घेवुन आला होता.ज्याची बँग होती त्या बँगेत त्याचा संसार होता.पगार होता.पाहतो तर पगार फोन व्यवस्थित होता.त्याला तो धन्यवाद देतो.माझ्या जिवात जिव येतो.बायकोला घरी गेल्यावर,घटनेबद्दल काहीही सांगीतले नाही.तिला एक महिण्यानंतर जेव्हा ही घटना सांगितली तेव्हा ती डोक्यावर हात आपटून घेत होती.