The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Sangieta Devkar

Others

5.0  

Sangieta Devkar

Others

दिल ही तो है

दिल ही तो है

19 mins
720


धावतपळत कट तू कट वेळेवर ओवी ऑफिसमध्ये पोहचली. फक्त दोन मिनिटं तिला उशीर झाला होता. तिच्या टेबलजवळ येऊन तिने बॅगमधून पाण्याची बाटली काढली आणि तोंडाला लावली. बाहेर सकाळचे दहाचे ऊन पण नको नको वाटत होते, त्यात बसचा प्रवास सो ओवी अगदी घाईघाईत ऑफिसला आली.


आज तिचा पहिला दिवस होता. या मीडिया वेव्जमध्ये राहुलने तिला जॉब मिळवून दिला होता. या कंपनीत राहुल आणि त्याचा मित्र आदित्य खानविलकर पार्टनरशिपमध्ये होते. ही मोठी ऍड एजन्सी होती. पाणी पिऊन तिने बॅग जागेवर ठेवली. तितक्यात इंटरकॉम आला, तिने घेतला, तर आदित्यने तिला केबिनमध्ये बोलावले होते. ती त्याच्या केबिनकड़े गेली, मे आय कम इन सर? आदित्यने तिच्याकड़े पाहिले आणि म्हणाला, येस कम इन. ती त्याच्यासमोर उभी राहिली. मिस ओवी मी कामाबाबत खूप परफेक्शनिस्ट आहे, त्यामुळे मला माझा स्टाफही तसाच आवडतो. कामात आणि वेळेत हलगर्जीपणा केलेला मला चालत नाही. तुम्ही पहिल्याच दिवशी लेट आलात. सर मला फक्त दोनच मिनिटं लेट झाला.

मिस ओवी 2 मिनिटंसुद्धा लेट चालणार नाही. काम आणि वेळेची जो कदर करतो, त्याचीच मी पण कदर करतो, पुन्हा असा लेट मला चालणार नाही. ओके. 

सॉरी सर. ती बोलली.

लेट्स गो अँड डू युवर वर्क.

ती बाहेर आली ती विचार करू लागली, किती हे रूड आहे. दोन मिनिटं लेट झाला तर इतकं बोलायचं, तरी राहुल तिचा मित्र म्हणाला होताच की आदित्य स्वतः खूप डिसीप्लिन्ड आहे तसेच कामपण त्याला परफेक्ट लागते, त्याला राग पटकन येतो, रागात तो काही ही बोलतो. पण ओवीसुद्धा तिच्या कामात हुशार होती. जिंगल्स, ऍड, स्लोगन ती सहज बनवत असे. तिचे लिखाण जबरदस्त होते. तिला या नोकरीची गरज होती. सो गप्प राहून कामाकड़े लक्ष द्यायचे असे तिने ठरवले. आदित्य सहा फुट उंच रुबाबदार, फ्रेंच कट दाढ़ी ठेवणारा, तड़फदार कामाप्रति निष्ठा असणारा असा. त्याचा भारदस्त आवाज मनात खोलवर उतरणारा, पण कायम एका अँटीटयूडमध्ये वावरणारा असा होता. ओवी तिच्या टेबलपाशी आली. तिचे काम समजून घेत होती. पूर्वा तिला मदत करत होती. आदित्य त्याच्या केबिनमधून कॉम्प्यूटरवर बाहेरचा स्टाफ बघत होता. बाहेर कॅमेरा होता सो कोन काम करतं कोण टाईमपास करतं हे आदित्यला बसल्या जागी दिसत होते. त्यामुळे सगळा स्टाफ त्याला घाबरून असायचा. जरा जरी चूक झाली तर त्याच्या रागाला त्यांना सामोरे जावे लागायचे. आदित्यने पाहिले ओवी पूर्वासोबत होती. मोठे गहिरे डोळे, गव्हाळ वर्ण, किंचित छोटे नाक, खांद्यापर्यन्त कट केलेले केस, गुलाबी ओठ. ओवी दिसायला सुंदर होती. हसताना तिच्या गालावर पडणाऱ्या खळ्या कोणाचेही लक्ष वेधून घ्यायच्या. ती पूर्वासोबत हसताना आदित्यने पाहिले, तो ही तिच्या खळ्यांकड़े पाहात राहिला. खूप छान दिसत होती ओवी. आदित्य एकटक पाहात होता. ओवी तिचं काम करत होती. हैल्लो ओवी हॉउज द वर्क? राहुल तिच्या शेजारी उभा राहून तिला विचारत होता.


तिने मान वर करून पाहिले, ओह राहुल, तू कुठे होतास? अरे मी एका मिटिंगसाठी बाहेर गेलो होतो.

तुला काम समजले ना?

हो, पूर्वाने मदत केली.

मग कसे वाटले आमचे ऑफिस आणि आमचे बॉस?

ऑफिस छान आहे, पण बॉस मात्र खडूस आहे हा राहुल...

ओवी अगं असं का बोलतेस आदित्यबद्दल

मग काय आल्या आल्या फायरिंग सुरु त्याचं

तो उगाच नाही ओरडत, तू काहीतरी केलं असणार

काही नाही राहुल फक्त 2 मिनिटं लेट आले मी

ओह्ह मग बरोबर आहे, आदित्यला कोणत्याच बाबतीत लेट आवडत नाही.

अरे पण म्हणून इतकं बोलायचं.?

हम्म्म बाय द वे ही वॉज अ नाइस पर्सन... ओके नंतर बोलू बाय. असे म्हणत तो आदित्यच्या केबिनकडे गेला. ऑफिस सुटल्यावर ओवी तिची बॅग, पर्स, फोन सांभाळत घाईने निघत होती कारण बसची वेळ चुकली तर पुन्हा एक तासाने तिला बस मिळणार सो ती घाईघाईत निघाली आणि अचानक आदित्यला धडकली, तिची पर्स खाली पडली,

ती बोलली, सॉरी सर, आय एम व्हेरी सॉरी

मिस ओवी किती हा वेंधळेपणा जरा नीट लक्ष देऊन चालायचे ना...

सर माझे लक्ष नव्हते सो सॉरी आदित्य रागाने तिच्याकडे पाहात निघून गेला.


         आदित्य घरी आला जेवण उरकून तो बेडवर पडला, पण त्याच्या मनात ओवीचेच विचार येत होते, त्याला वाटले आपण उगाच तिला इतकं बोललो आज तिचा ऑफिसचा पहिला दिवस होता तिचा चेहरा, तिची गालावरची खळी राहून राहून त्याच्या नजरेसमोर येत होती. संध्याकाळी पण तो तिला ओरडला सो त्याला ते गिल्टी वाटले उद्या तिला सॉरी म्हणायचे ठरवून तो झोपी गेला.


      दुसऱ्या दिवशी ओवी लवकरच बाहेर पडली. वेळेच्या आधी ती ऑफिसमध्ये पोहोचली. पाचच मिनिटांत आदित्य आला. तिला सर्वांत आधी आलेले पाहून त्याला हसू आले, तो तिच्याकडे गेला, गुड मॉर्निंग ओवी.

ती ही हसून म्हणाली मॉर्निंग सर.

ओवी आय एम सॉरी

का सर?

काल मी उगाच तुला बोललो बट मला कामात बेपर्वाइ नाही आवडत सो.

इट्स ओके सर ती हसून म्हणाली.

तो त्याच्या केबिनकडे गेला मात्र तिचं हसू तिच्या खळ्या यात कुठेतरी हरवत चालला. अधूनमधून कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये आदित्य ओवीला पाहात राहायचा, खूप वेगळी वाटत होती ती त्याला, निरागस, बालिश, तो तिच्या विचारात होता आणि गालातल्या गालात हसत होता. हे सगळं बाजूला बसलेल्या राहुलने पाहिले...

तो त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, क्या बात है सरकार, आज चक्क हसताय तुम्ही, नक्कीच काहीतरी आनंदाची गोष्ट असणार...

तसा आदित्य भानावर येत म्हणाला, नथिंग राहुल ते असंच...

असंच कसं आदि, ओवी तुला आवडायला लागली काय?

तसं काहीही नाही राहुल्या, यू नो आय हेट लव्ह.

आदित्य एका व्यक्तीमुळे सगळं जगच वाईट आहे असं नसत. जगात वाईट लोक आहेत तसे चांगले लोक पण आहेत आणि ओवीला मी ओळखतो खूप चांगली मुलगी आहे ती.

राहुल तुला समजत नाही का मी तसा कोणताच विचार करत नाही अँन्ड आय नेव्हर फॉल इन लव्ह अगेन सो स्टॉप टाँकिंग अबाऊट इट.

ओके आदि, मी तुला ओळखतो तू जगासमोर रुड, हार्टलेस व्यक्ती म्हणून वावरतोस बट मनातून किती हळवा आहेस हे फक्त मी जाणतो

राहुल आपण काम करू यात, ओके. आणि त्याने ओवीला बोलावले. ती त्याच्या केबिनमध्ये आली

मिस ओवी या अँडमध्ये अजून चेंजेस हवेत पुन्हा लिहा.

पण सर मी ऑलरेडी चार वेळा त्यात चेंजेस केले आहेत.

मिस ओवी यापेक्षा अजून वेगळी आणि कॅची अॅड मला हवी आहे. गो अँन्ड डू इट. ती बाहेर आली तिच्या जागी येऊन बसली, तिला समजेना अजून काय बदल करून लिहायचं, ती हाताने डोकं धरून बसली, इकडे राहुल आदिला बोलला, काय चाललय हे आदि, तू माझा राग त्या ओवीवर का काढलास?

राहुल मी काही राग वैगरे नाही काढला मला खरंच त्या अॅडमध्ये चेंजेस हवेत, खूप बालीश लिहिलंय तिने...

मला समजते सगळे आदित्य आज ओळखतो का मी तुला... ऑफिस सुटले सगळे घरी जायला निघाले पण ओवी थांबली कारण काम पूर्ण केल्याशिवाय जायचे नाही हा आदित्यचा नियम सो, ती विचार करू लागली आदित्यने तिला पाहिले, तो तिच्याजवळ आला, त्याने विचारले हॅलो काही सुचते की नाही आजच्या दिवसात?

तिने मान वर करून पाहिले, आय विल ट्राय सर.

ओके थोडा ब्रेक घ्या, मग सुचेल असे म्हणत त्याने ऑफिस बॉयला 2 कॉफी आणायला सांगितले, ती थांबली, तो तिच्या शेजारीच खुर्चीवर बसला. तिला खरच कॉफीची गरज होती. कॉफी आली.

मग मिस ओवी, घरी कोण कोण असतं तुमच्या, त्याने विचारले.

आई बाबा आणि मी एकुलती एक, ती म्हणाली.

ऑफिसला कशा येता आपण?

सर बसने येते सो पहिल्या दिवशी लेट झाला, बस मध्येच बंद पडली होती.

कॉफी संपली, तशी ती बोलली सर जस्ट अ मिनिटं, आय गॉट इट. म्हणत ती काही लिहायला लागली, आदित्य तिच्याकडे पहात राहिला,एकदम निरागस दिसत होती ती.. तो गालातल्या गालात हसत होता,तिचे लिहून झाले तिने तो पेपर त्याला दिला सर हे वाचा,,तिला कॉफीची च अँड लिहायची होती,कॉफी पिता पिता तिला हे सुचलं,तो वाचू लागला मोठ्याने, "निसटून गेले कडु गोड क्षण तुझ्या माझ्या तले काही...

आज सांगावेसे वाटते मला,त्या आठवणी,कॉफी आणि बरच काही..."!!,,वा,,,इट्स आँसम,तो हसतच म्हणाला. खूप छान ओवी इट्स वर्क.ती ही हसलीआणि तो तिच्या खळी कडे पाहात राहिला. तिच्या मिलीयन डॉलर स्माईल मध्ये गुंतत चालला होता. ऑफिस ,आदित्य,ओवी सगळं रोजच रुटीन चालू होत,आदित्य थोड्या थोड्या गोष्टी वरून भडकायचा परत ओवी ला सॉरी म्हणायचा असं काहीसं चालू होत. तरी ही कुठे तरी ओवी लाही आदित्य आवडू लागला होता त्याच्या डोळ्यात ओवी बद्दल वाटणार प्रेम दिसून यायचं,पण ते तो दाखवून देत नव्हता.

 ओवीला आज सकाळ पासूनच बरे वाटत नव्हते ,तिला ताप आला होता,सो ती ऑफिस ला नाही गेली. तिने राहुल ला येत नसल्याचे कळवले होते. इकडे ऑफिस मध्ये आदित्य ओवी ची वाट पहात होता. खूप वेळ झाला अजून कशी ती आली नाही याचे त्याला कोडे पडले होते,तिची काळजी ही वाटत होती. आणि तिचा खूप राग सुद्धा येत होता,तो खूप बैचेन झाला होता. दुपार नंतर त्याने तिला कॉल केला बट नो रिस्पॉन्स ,,,त्याने खूप वेळ फोन ट्राय केला पण कोणी तो रिसिव्ह करत नव्हता. त्यामुळे तो जास्तच चिडला. संध्याकाळी राहुल ऑफिस मध्ये आला,आदित्य डोळे मिटून बसला होता. त्याला असे पाहून राहुल ने विचारले,आदि काय झाले?

तसा आदित्यने राहुल कडे पाहिले आणि म्हणाला,या मुली स्वहताला काय समजतात राहुल,,साधा कॉमन सेन्स नसतो यांना,,कामाची कोणाच्या वेळेची यांना कदर नसतेच मुळी. अरे साधा एक फोन नाही करता येत,असं खूप काही आदित्य बोलत सुटला. सगळा ओवी वरचा राग त्यातून बाहेर पडत होता राहुल ने त्याला शांत केले म्हणाला,आदि इतका का हायपर होतोस ,ओवीची काळजी वाटते का तुला? आज ती ऑफिस ला नाही आली सो तुला बैचेन होतय का? का तिचा इतका विचार करतोस?

राहुल मला काही तिची काळजी वैगेरे नाही वाटत पण असे न सांगता कामावर गैरहजर राहणे हे शोभते का तिला? चिल आदि काहीतरी प्रॉब्लेम असेल तिला म्हणून आली नसेल. राहुल मुद्दाम असे बोलून त्याच्या मनातलं काढून घेत होता

अरे मग तसे कळवता येत नाही का तिला?

तिने मला सांगितले होते,सॉरी पण मीच तुला सांगायला विसरलो आदि.

काय प्रॉब्लेम राहुल?

अरे तिला ताप आला आहे,आजारी आहे ती.

ओह, राहुल अरे सकाळीच सांगायचे ना मला

का? कशा साठी सांगू तुला?

अरे मी मग इतका गैरसमज करून घेतला नसता ना तिच्या बद्दल,आणि वाटेल तसे बोललो पण नसतो.

असू दे आदि नाहीतरी तुला कोणाच्या फिलींगशी काय देणं घेणं ना!! सगळ्या मुली सारख्याच.. तो असे मुद्दाम बोलत होता कारण त्याने ओळखळे होते ओवी आणि आदित्य एकमेकांच्या प्रेमात पडले होते पण दोघे ही ते स्वीकारायला तयार नव्हते.

राहुल तसे काही नाही मी इतका ही भावना हिन नाही.

ओह्ह ,म्हणजे तू ओवीच्या प्रेमात पडला आहेस आणि तुला ती आवडते हो ना?

नाही राहुल जस्ट ह्युमन बिइंग आय केयर फॉर हर.

आदि,तू किती ही लपव पण तुझे डोळे खरे बोलतात.,दयाट यू लव्ह ओवी.

नो नेव्हर राहुल आय कान्ट.

आदि काही झालं तरी तू फॅक्ट नाही बदलू शकत.या वर आदित्य काहीच बोलला नाही.डोळे मिटून शांत बसला,त्यालाच समजत नव्हते,का त्याचे मन ओवी कडे इतकं ओढ घेत होत. कॉलेज मध्ये रिचा सोबत त्याच अफेयर होत,मना पासून त्याने रिचा वर प्रेम केलं तिला सर्वस्व मानलं,पण रिचा ने त्याच्या मनाचा विचार न करता त्याच्या भावनांशी खेळली. तिला पैसा स्टेटस,लकझरी यातच आयुष्य घालवायच होत. त्यावेळी आदित्य आज इतका स्टॅन्ड नव्हता. सो त्याच्या निस्वार्थी प्रेमाला झिडकारून ती निखिल सोबत फॉरेन ला निघून गेली. तिला प्रेमा पेक्षा पैसा महत्वाचा होता. पण आदित्य खूपच खचून गेला,प्रेमा वरचा,मुलीं वरचा त्याचा विश्वास उडून गेला फक्त पैशा साठीच मुली प्रेम करतात अस त्याच मत झालं. म्हणूनच तो असा रुड,कठोर वागायचा. पण ओवी बाबत त्याच त्यालाच समजत नव्हते,तो तिला ओरडायचा,बोलायचा,पण पुन्हा सॉरी ही म्हणायचा. तिची काळजी घ्यायचा,हे प्रेमच होत,पण तो स्वीकारत नव्हता इतकंच...

   दोन दिवसांनी ओवी ऑफिस ला आली,तिला बघून आदित्य खूप खुश झाला. तिच्या तब्येती ची त्याने चौकशी केली. ऑफिस सुटल्यावर ओवी तिचे टेबल आवरून निघत होती आदित्य तिच्या जवळ आला आणि म्हणाला,ओवी मी सोडतो तुला आज घरी जर तुझी इच्छा असेल तर.

नको सर मी जाईन बसनेच थॅंक यू.

ओवी तू माझ्या सोबत आलीस तर मला बरे वाटेल बाकी अँज यू विश.

ओके सर चला,म्हणत ती त्याच्या मागे निघाली.

पार्किंग मधून त्याने कार बाहेर आणली,ती त्याच्या बाजू च्या सीट वर बसली. त्याने तिला पत्ता विचारला आणि गाणी लावण्यासाठी स्वहता चा मोबाईल टेप रेकॉर्डर ला जोडला," दिल है के मानता नही,मुश्किल बडी है,रस्मे मोहब्बत ये जानता ही नही,," हे गाणं लागलं. ओवीला आश्चर्य वाटलं, की या खडूस कडे अशी पण गाणी आहेत.. मग ऑफिस मध्ये का असा रुड वागतो. तिच्या कडे एक नजर पहात आदित्य म्हणाला,ओवी तुझ्या मनात काय चालय हे मी ओळखले आहे,हो मला गाणी खूप आवडतात. तुला आवडतात का?

हो सर मला सुद्धा,,

अजून एक मी जरी असा कठोर रागीट वाटत असलो तरी गाणी मात्र रोमँटिक शांत अशीच ऐकतो.

ती त्याच्या कडे पाहून हसली .आदित्य ने लेमन कलर चा शर्ट आणि ब्लु जीन्स घातली होती,तो खूप हॅन्डसम दिसत होता. पुन्हा पुन्हा ओवी ची नजर त्याच्या कडे जात होती. आणि ती आपल्या कडे चोरून पाहतेय हे आदित्य ने कधीच ओळखले होते.

तो म्हणाला ओवी माझे ऑफिस तिथले काम तुला आवडले का?

हो सर खूपच,आणि राहुल ने आधी मला सगळ्या गोष्टीची कल्पना दिली होती.

ओके, आपण कॉफी घेऊयात का ?

हो सर चालेल,तसे ही तिला त्याच्या सोबत अजून थोडा वेळ घालवायला मिळणार असेल तर तिला ते हवेच होते.तिला आदित्य मना पासून आवडला होता. हा थोडा रागीट होता तो पण तिला ते मान्य होत. त्याचा हाच स्वभाव त्याच्या पर्सनालिटी ला अजूनच दमदार बनवत होता. ते एका कॉफी शॉप मध्ये गेले आदित्य ने विचारले ओवी तू काही खाणार का?

नको सर फक्त कॉफी . त्याने 2 कॉफी ऑडर केली.

पिंक कलर चा टॉप आणि जीन्स मध्ये ती छानच दिसत होती. त्यात तिचा चेहरा कायम हसरा,आदित्य तिच्या कडेच पहात होता,तिचे ते मिलियन डॉलर स्माईल त्याला तिच्यात गुंतवून ठेवत होते.

इकडे ओवी मात्र स्वहता पेक्षा जास्त आदित्य वर जीव लावून बसली होती, आदित्य बद्दल चे प्रेम,तिच्या भावना सगळं तिने तिच्या डायरी मध्ये लिहून ठेवलं होतं. तिला दोघांमधला हा दुरावा आता सहन होत नव्हता. ती एका संधी ची वाट पहात होती,मग ती त्याला स्वहता प्रपोज करणार होती. तिला ही त्याच्या डोळ्यात तिच्या बद्दल चे प्रेम दिसत होते,सो शी वॉज क्वायट एक्सायटेड . तिला खात्री होती की आदित्य च्या मनात ही हेच असेल.

आज सकाळ पासूनच पावसाला सुरुवात झाली होती. ओवी बस स्टॉप वर येऊन थांबली होती. पावसा मुळे बस ला उशीर होऊ नये हीच भीती तिला वाटत होती. रोडवर रिक्षा पण खूप कमी दिसत होत्या,त्याही भरून जाणाऱ्या. तिला वेळे वर ऑफिस ला पोहचायचे होते नाहीतर तिचे काही खरे नाही. आदित्य नावाच्या तोफे ला सामोरे जावे लागणार होते. ती बस ची वाट पहात होती,इतक्यात तिथे एक कार येऊन थांबली,कार पाहताच तिला आनंद झाला कारण ती आदित्य ची कार होती. त्याने कार ची ग्लास खाली घेऊन ओवीला आवाज दिला. ओवी कम हियर.. ती पटकन कार कडे गेली,,जाता जाता थोडी भिजलीच. ओवी समोर टिश्यू पेपर आहेत ते घे आणि चेहरा पूसून घे,आदित्य म्हणांला. तिने टिश्यू घेतले आणि चेहऱ्या वरचे पाणी पुसू लागली तो नकळत तिच्या कडे पहात होता,पाण्याचे दवबिंदु तिच्या चेहऱ्या वर मोत्या सारखे त्याला भासत होते,केसातुन चुकार एखादा पाण्याचा थेंब अलगद खाली ओघळत होता. तिने बॅग मधून नॅपकिन काढला आणि केस ही पुसले,काही केसांच्या बटा तिने काना मागे घेतले,तिच्या या हालचाली त्याला खूप मोहक वाटत होत्या, तिच्या वरची त्याची नजर क्षण भर ही हटत नव्हती. हा प्रवास संपूच नये असे त्याच्या मनात आले,पण अचानक त्याला वाटले, हा कसला विचार आपण करतो आहोत,मला खरच ओवी आवडू लागली आहे का? मी तिच्या प्रेमात पडलो आहे काय? पण नकोच हे पुन्हा गुंतने,आणि पुन्हा तुटणे.एकदा अनुभव घेतला आपण ,परत विषा ची परीक्षा नको. खूप प्रयासाने आपण स्वहताला सावरले आहे इतके कठोर बनवले आहे की कोणा बद्दल आपल्याला प्रेमाचा पाझर कधीच नाही फुटणार. हे फक्त तात्पुरते आकर्षण आहे हे प्रेम नाही. तो स्वहताच स्वःताला समजवत होता. त्याला इतकं शांत पाहून ओवी म्हणाली, काय झाले सर? एनी प्रॉब्लेम ?

नो ओवी,व्हाय यू आस्कड ?

सर तुमचा चेहरा बघा किती टेन्स दिसतो आहे. काहीतरी विचार करता आहात तुम्ही.

कामाचे टेन्शन थोडे बाकी काही नाही. ते दोघें ऑफिस ला पोहचले. आदित्य ने ऑफिस बॉय कडून तिला कॉफी पाठवून दिली. ओवीला वाटले हा का माझी इतकी काळजी घेतो. पण तिला छान वाटले. पाऊस दिवसभर सुरूच होता. ऑफिस सुटले तसा आदित्य ओवी कडे आला आणि म्हणाला मिस ओवी पाऊस खूप आहे बाहेर,मी सोडतो घरी तुम्हाला.

तिने जास्त आढेओढे न घेता ओके म्हणाली.ते दोघे पार्किंग कडे आले,कार मध्ये बसले,आदित्य ने सवयी ने एफ एम लावले,आर जे संग्राम बोलत होता,पाऊस आणि प्रेम या बद्दल,ओवी निट ऎकत होती. कारण संग्राम तिचा फेवरेट होता,ती आदित्य ला म्हणाली, सर संग्राम छान बोलतो ना?

हो आवाज मस्तच आहे त्याचा.

वन ऑफ माय फेवरेट आर जे ही वॉज.

ओहह नाईस ओवी. आर जे संग्राम बोलत होता,आज खूप मस्त पाऊस पडतो आहे सगळी कडे वातावरण छान आहे. पाऊस म्हंटल की हमखास आठवते ती म्हणजे कविता,रोमँटिक गाणी,आणि प्रेम,,आणि आपल्या प्रिय सोबत एकत्र घेतलेला चहा,. पावसाचं आणि प्रेमाचं काही वेगळंच नातं आहे,तो इसी बात पे हो जाये,कुछ खास बात,,तर तुम्ही मला सांगा अशा पावसात कोणाला प्रपोज केलं आहात? नसेल तर आता ट्राय करून बघा,आणि तुमची ही लव्ह स्टोरी मला लगेचच कळवा. तो फिर चाय के साथ करो दिल की बात,,,,असे म्हणत ,त्याने 'कह दु तुम्हे,या चूप रहु के दिल में मेरे क्या है,,,हे रोमँटिक गाण सुरु केलं.

आदित्य ड्राईविंग मध्ये मग्न होता. ओवी च्या मनात आलं,मी ही आज आदित्य ला प्रपोज केले तर,,,काय हरकत आहे. मला माहित आहे त्याच उत्तर पण हो च असणार. आणि तिने ठरवले ,आज आदित्य शी बोलायचेच. आदित्य तिला म्हणाला,ओवी आज पाऊस खूपच आहे सो आज कॉफी नाही देऊ शकणार मी. ती फक्त त्याच्या कडे पाहून हसली. तिच्या डोक्यात विचार चालू होते. ती म्हणाली सर मला थोडे बोलायचे आहे तुमच्याशी.

ओके बोल ना मग.

सर आपण थांबूयात का थोडा वेळ?

ओवी इतक्या पावसात आपण कुठे थांबणार?

सर आपण कार मध्येच बसून बोलू.

ओके थोडं पुढे जाऊन थांबू असे तो म्हणाला.त्याला वाटले हिला कामा बद्दल काही बोलायचे असेल,रोडवर तशी जास्त गर्दी नव्हती,एका बाजूला रिकामी जागा बघून त्याने कार थांबवली. आता ओवीची हार्ट बिट्स कमालीचे वाढत होते. ती मनातून घाबरली होती पण आज बोलायचेच असे तिने ठरवले होते,आदित्य म्हणाला,बोल ओवी काय बोलायचे तुला. कामात कांहीं अडचणी,,काही तक्रार काही असेल ते सांग.

सर कामच काही प्रॉब्लेम नाही,

मग काय,,त्याने हसत विचारले.

ती एका दमात बोलून गेली,सर खूप दिवस झाले मला सांगायचे होते ,दयाट आय लाईक यू सर सो मच.

व्हॉट?? ओवी काय बोलतेस हे?

हो सर आय रियली लव्ह यु,मला नाही माहित हे कधी आणि का घडले पण हे खरं आहे की माझं तुमच्यावर खुप प्रेम आहे.

ओवी माझा प्रेमावर विश्वास नाही मी कोणा मध्ये गुंतून राहू शकत नाही.

म्हणजे सर मी तुम्हाला थोडी पण आवडत नाही.का तुमच्या प्रेमाला लायक नाही मी? तुमच्या काय अपेक्षा आहेत ते सांगा मी तसे करेन बट आय कान्ट लिव्ह विदाउट यू!!

ओवी,तू भावनेच्या भरात बोलते आहेस,हे जस्ट अट्रक्शन असेल प्रेम वैगेरे नाही.

नो सर मी सिरियसली प्रेम करते तुमच्यावर...

ओवी माझ्यावर प्रेम करावं इतका मी योग्य पण नाही मला माफ कर.

सर मग माझी काळजी करणं,मला मदत करणं ओरडणं परत सॉरी म्हणणं,,याचा अर्थ काय होतो?

ओवी तू माझी एम्प्लॉई आहेस सो तुझी काळजी करणं,तुला मदत करणं हा कामाचाच एक भाग आहे दयाटस ऑल!! याला प्रेम म्हणत नाहीत.

ओवीला आदित्य असे काही बोलेल याची अपेक्षाच नव्हती. मग प्रेम कशाला म्हणतात सर ? माझ्या कडे पाहून सांगा मी तुम्हाला आवडत नाही का?

आदित्य तिच्या कडे पहात म्हणाला,ओवी प्रेम कशाला म्हणतात,मला माहित नाही,आपलेपणा,जिव्हाळा,प्रेम याचा आणि माझा जवळपास कुठेच संबंध नाही,आणि तुझे आवडणे,ते तर तू कोणालाही आवडशील अशीच आहेस. मला ही आवडतेस पण म्हणून त्याचा अर्थ प्रेम असा होत नाही. आता ओवीचे डोळे भरून आले होते,ती म्हणाली,सर तुमचे डोळेच सगळं बोलतात,तुम्ही का लपवत आहात मला नाही माहित, पण हे तुमचं फायनल उत्तर आहे का?

हो ओवी,मी कोणावरच प्रेम नाही करू शकत. ती यावर काहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यातले अश्रु मात्र थांवत नव्हते आदित्य ला तिला पाहून खूप वाईट वाटले,तो म्हणाला,ओवी स्टॉप क्राईग,आय कान्ट सी यू लाईक धिस.

व्हाय? सर मी रडेन किंवा हसेन तुम्हाला फरक पडतो का? ती रागातच बोलली.आदित्यला समजेना तिला कसे समजवावे त्याच ही प्रेम होत ओवीवर पण त्याच मन हे मानायला तयार नव्हते ,कारण त्याच्या कम्फर्ट झोन मधून त्याला बाहेर पडायचेच नव्हते . त्याने काही ही न बोलता कार सुरु केली. दोघेही शांत होते. आर जे संग्राम पुन्हा बोलत होता,खूप जणांचे कॉल त्याला येत होते,पण ओवीची लव्ह स्टोरी सुरु होण्या आधीच संपली होती,तिने रेडिओ बंद च केला.आदित्यने तिच्या कडे पहिले ती बाहेर बघत होती,बाहेर पाऊस,आणि आत ओवीच्या डोळ्यातलं पाऊस अविरत बरसत होता. तिच्या घरा जवळ त्याने कार थांबवली ती काहीच न बोलता कार मधून उतरली. आदित्यच म्हणाला,ओवी बाय ,टेक केयर. पण ती मागे न पाहताच निघून गेली.

आदित्य घरी आला,त्याला राहून राहून ओवी चा चेहरा डोळ्या समोर येत होता,आज तिच्या गालावरच्या खळ्या कोमजून गेल्या होत्या,टपोऱ्या डोळ्यात आसवांची गर्दी होती,तिचें मिलियन डॉलर स्माईल त्याला पुन्हा पुन्हा आठवत होते.सकाळी तो ऑफिस ला आला,थोड्या वेळात राहुल पण आला,त्याला बघून राहुल म्हणाला,हे आदि गुड मॉर्निंग ,पण आदित्य त्याच्याच विचारात मग्न होता,तो काहीच बोलला नाही,राहुल ने त्याच्या जवळ जात विचारले आदि कुठे लक्ष आहे तुझं,,काय झाले?

काही नाही राहुल,

आदित्य डोळे का सुजल्या सारखे दिसतात तुझे,झोपला नाहीस का रात्री ?

हु,नाही झोप लागली काल.

का? काही टेन्शन आहे का ? राहुल ने काळजी ने विचारले तसा आदित्यने राहुल ला काल ओवी जे बोलली ,त्याच्या दोघां मधले बोलणे सगळं सांगितले.

आणि म्हणाला,तिच्या विचारात झोप नाही लागली,मी काय करू ?

राहुल म्हणाला,आदि,मी ओवीला कॉलेज पासून ओळखतो खूप चांगली मुलगी आहे ती,अरे तू त्या रिचा मुळे सगळ्याच मुलींना का एकाच तराजूत तोलतो आहेस? ओवी खरच प्रेम करते तुझ्यावर,आणि तुझे ही प्रेम आहे तिच्यावर तू ते फक्त एकसेप्ट करत नाहीस,आदि तू का स्वहताला तुझ्याच कम्फर्ट झोन मध्ये बंदिस्त करून टाकले आहेस? प्रत्येकाला प्रेम,जिव्हाळा,हवा असतो,कोणीतरी आपल्यावर प्रेम करणार,आपली काळजी घेणारं असावं ही आपल्या मनाची गरज असते,तू आयुष्यभर एकटाच राहणार आहेस का ? प्रेमा शिवाय आयुष्य सुंदर असुच शकत नाही. जरा शांत पणे विचार कर.

इतकं बोलून राहुल गप्प बसला. खूप वेळाने आदित्यच्या लक्षात आले की आज ओवी ऑफिस ला आलेलीच नाहीये. ती हर्ट झाली असणार सो ऑफिस ला येणार नसेल कदाचित असे त्याला वाटले. दिवासभर त्याचे लक्ष सारखं ओवीच्या जागेवर जात होत,ती नव्हती म्हणून तो ही बैचेन होता,मग राहुल ला सांगून तो घरी आला. ओवीची आठवण हरघडी त्याला येत होती. तिला कॉल करावा अस त्याच्या मनात आले पण ती बोलली नाही तर,,,सो तो विचार त्याने काढुन टाकला. दुसऱ्या दिवशी तो ऑफिस ला आला पण आज ही ओवी आली नव्हती,असे आठ दिवस झाले आता आदित्य ला तिची काळजी वाटू लागली,त्याने राहुल ला तिला कॉल करायला सांगीतला. राहुल ने ओवीला कॉल लावला,तो बराच वेळ तिच्याशी बोलत होता. कॉल झाला तसे आदित्य ने विचारले काय बोलत होती ओवी राहुल?

आदित्य तुझे खरच प्रेम नाही का ओवी वर?

असे का विचारतोस राहुल? मलाच जी गोष्ट समजेना त्या बद्दल मी तुला काय सांगू?

ठीक आहे मग.

अरे राहुल ओवी का येत नाही ऑफिस ला ते सांग आधी.

का यायचे तिने ऑफिस ला आदि,,तुला ती आवडत नाही,तिच्या बद्दल तुला काहीच वाटत नाही,,पण ओवीला खूप वाटते तुझ्या बद्दल,ती जीव लावून बसलेय तुझ्या वर,,इथे येऊन तुझ्या सहवासात राहणार,, तुझ्याशी बोलणार ,अरे तिने हे कसे सहन करायचे,,? ती वेड्या सारखं प्रेम करते तुझ्या वर आदि,,सो तुझ्या पासून दूर जायचा निर्णय तिने घेतला आहे.

कोणता निर्णय राहुल?

आदि तिने रेजिग्नेशन दिले आहे,ती जॉब सोडून चालली आहे,कायमची ती मुंबई ला जाणार आहे.

आदित्य ला समजेना काय बोलावे,तो गप्प बसून राहिला.तेव्हा राहुल म्हणाला,आदि ओवी सारख्या चांगल्या मुलीला गमवू नकोस,तिचे प्रेम खरे आहे,उद्या जरी तुला ओवी हवी असेल तेव्हा कदाचित खूप उशीर झालेला असेल सो आताच विचार कर आणि निर्णय घे,खूप उशीर करू नकोस.इतकं बोलून राहुल त्याच्या केबिन मधून बाहेर पडला.आदित्य खूप अस्वस्थ झाला,त्याला ओवी ची खूप आठवण येत होती,राहुल चे शब्द मनात घोंघावत होते,ओवी जॉब सोडून खरच गेली तर पुन्हा मला दिसणार सुद्धा नाही,आदित्यने राहुल ला कॉल केला आणि म्हणाला की मला आता ओवी ला भेटायचे आहे तू तिला घेऊन ये प्लिज,मी बोलावले तर कदाचित ती येणार नाही,,राहुल ला समजले आदित्य च्या मनात काय आहे,त्याने ओवीला भेटण्या साठी बोलावले राहुल च्या घरी तो एकटाच होता सो ओवीला त्याने घरीच बोलावले होते,ती यायला तयार झाली. तसे राहुल ने आदित्य ला त्याच्या घरी यायला सांगीतले. इतक्या दिवसांनी ओवी भेटणार यामुळे तो खुश झाला. पण आदित्य ही राहुल च्या घरी येतो आहे याची ओवीला कल्पना नव्हती. ओवी राहुल कडे आली,दोघे कॉफी घेत बोलत होते राहुल ने विचारले ओवी तू तुझा निर्णय पूर्ण विचार करून घेतला आहेस का?

हो राहुल मी विचार करूनच हा निर्णय घेतला आहे,मुंबई ला माझी मैत्रीण आहे तिने जॉब पाहिला आहे माझ्या साठी.

म्हणजे आदित्य पासून दूर जाणार,पण जमेल तुला त्याच्या पासून दूर राहणं?

यावर ओवी काहीच बोलली नाही,तिला माहित होते की आदित्य शिवाय ती राहूच शकणार नव्हती,पण मनावर दगड ठेवून तिने हा निर्णय घेतला होता आदित्य च्या कठोर मनाला पाझर फुटणे अवघड आहे हे ती जाणून होती.थोड्याच वेळात आदित्य तिथे आला,त्याने दोघांना हॅलो केले,पण ओवी काहीच बोलली नाही पण आदित्य ला पाहून तिला खूप बरे वाटत होते 8 / 10 दिवसांनी ती त्याला पहात होती.

त्या दोघांना बोलायला मिळावे म्हणून राहुल तिथून उठून दुसऱ्या रूम कडे गेला.

आदित्य ओवी जवळ गेला तसे तिच्या हृदयाची धडधड वाढु लागली,तो म्हणाला,ओवी कशी आहेस?

ठीक सर,,आदित्य म्हणाला,मला बोलायचे आहे तुझ्याशी.

आपल्यात बोलण्या सारखं काही उरलेले नाही सर आणि माझ्या वर ओरडायला आता मी तुमची एम्प्लॉई सुद्धा नाही.

म्हणजे मी फक्त तुझ्यावर ओरडतो ,कधी प्रेमाने बोलत नाही,असेच ना? आय एम सो रुड हार्टलेस पर्सन,,मला कोणाची पर्वा नसते आय एम सो बॅड ओवी,,म्हणूनच तुला सॉरी म्हणायला आलो आहे.

सर तुम्ही सॉरी म्हणायची गरज नाही,

का गरज नाही,मी तुला खूप हर्ट केले ना ओवी.

ते मी कधीच विसरून गेले आहे

ओह्ह मग तरी सुद्धा हा जॉब सोडून चालली आहेस.

हो,कारण मला इथे आता राहायचे नाही.

पण तू अशी जॉब सोडून जाऊ शकत नाहीस.

सर आता तुमची मर्जी, किंवा जबरदस्ती नाही चालणार, हा माझा निर्णय आहे.

हो, ही माझी जबरदस्तीच समज,मी तुला कुठेही जाऊ देणार नाही.

का पण सर? ती रागातच बोलली.

बीकॉज आय अलसो लव्ह यू सो मच, अँड आय कान्ट लिव्ह विदाउट यू ओवी..

ओवी ला क्षणभर काही समजलेच नाही,,ती म्हणाली काय म्हणालात सर, से अगेन,

येस ओवी आय लव्ह यू...रिअली...ओवी ने ऐकताच त्याला घट्ट मिठी मारली.. त्याच्या बलदंड बाहुपाशात तिचं सार जग सामावलं होतं... आदित्यने तिच्या डोळ्यात पाहात विचारले, हॅप्पी नाऊ...

ती बोलली व्हेरी मच,,सर, तसे त्याने तिच्या ओठावर आपले बोट ठेवले आणि म्हणाला, डोन्ट कॉल मी सर, ओन्ली आदित्य..... हा आदित्य ती हसून बोलली,

त्याने तिचा चेहरा आपल्या हातात धरला, आणि अलगद आपले ओठ तिच्या ओठावर टेकवले, आणि त्याने तिचे दीर्घ चुंबन घेतले, आणि तिला अजून घट्ट मिठी मारली. आदित्यला हे पटले होते की खरच प्रेमा शिवाय आयुष्य सुंदर असूच शकत नाही. त्याने पुन्हा ओवीला विचारले ओवी तू खुश आहेस ना? ती म्हणाली,हो आदित्य खूप खूप खुश आहे मी...

आणि तुम्हा दोघांना एकत्र पाहून मी पण जाम खुश आहे, असे म्हणत राहुल तिथे आला. आणि त्याने आदित्यला घट्ट मिठी मारली.

म्हणाला, आदि आय एम सो ग्लॅड, फॉर यू ब्रो, असाच आनंदी राहा, आणि आता तुम्ही दोघे जा फिरायला मी जातो ऑफिसला, म्हणत राहुल निघून गेला. आदित्य ओवी कारमध्ये बसले, आदित्य ओवीला म्हणाला, ओवी मला सगळ्यात जास्त आवडते ते तुझे खळी पडणारे मिलियन डॉलर स्माईल... सो ते स्माईल कायम तुझ्या चेहऱ्यावर असेल याची मी काळजी घेईन असे म्हणत त्याने एफ एम सुरु केले... तर गाणं लागले...


चाहा तो बहुत ना चाहे तुझे, चाहत पे मगर कोई जोर नहीं।

दिल ही तो है तुम पे आ ही गया, दिल का सनम ये कुसूर नहीं।।

चाहा तो बहुत, चाहा तो बहुत...


दिल ही तो है... तुम पे आ ही गया... असे म्हणत आदित्यने ओवीचा हात आपल्या हातात घेतला... कधीही न सोडण्या साठी...


Rate this content
Log in