Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

धनत्रयोदशी...!

धनत्रयोदशी...!

1 min
16.1K


धनत्रयोदशी हा दिवस विशेष स्मरणात राहणारा दिवस.याच दिवशी एक मनाला चटका लावणारी पण तितक्याच आनंदाची घटना घडली होती आणि कालांतराने त्या घटनेची सविस्तर माहिती लोकप्रभा मासिकाच्या अंकात प्रकाशित झाली होती.

तशी ही घटना एकोणिसशेहे एक्कोणवद साली अंबे घाटात घडलेली.त्यावेळी मी माझ्या गावीच होतो आणि माझ्या वाचनात ती घटना लेख रूपात फोटो सहित आली. मनास चटका बसला पण आनंद ही खूप झाला.

आजच्या सारखी परिस्तिथी आमच्या वेळी नव्हती त्यामुळे आजही त्या गोष्टीचे वर्णन सय्यमानेच होते. आई वडील मुलगी देवदर्शन आटोपून परतीच्या प्रवासात होते आणि संध्याकाळच्या संधीप्रकाशात त्यांच्या गाडीवर गोळीबार झाला.गाडीवर गोळ्या आपटल्या कोणास काही इजा झाली नाही पण त्या चित्तथरारक संकटातून मोठ्या धैर्याने त्या कुटुंबाची सुटका दैव कृपेने झाली.तो क्षण आणि ती वेळ आजही प्रत्येक धनत्रयोदशीला आठवते आणि अंगावर काटा उभा राहतो.त्यांच्या प्रसंगावधनाचे कौतुक वाटते आणि देव तयारी त्याला कोण मारी हे पटते.

त्या प्रसंगातून दैव कृपेने झालेली सुटका ही काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचीती म्हणजे नेमके काय हे आजही जाणवून देते आणि प्रत्येक दिवाळी आनंदाने साजरी होते.खऱ्या अर्थाने जीवनधनाचे पूजन त्यादिवशी घडले त्यामुळे धनत्रयोदशी खूप मौलिक वाटते.


Rate this content
Log in