Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

धीर सोडू नये

धीर सोडू नये

1 min
220


एका गावात एक तरुण राहत होता. तो नोकरी साठी प्रयत्न करित होता. खुप प्रयत्न करुनही त्याला नोकरी मिळत नव्हती. तो वैतागून गेला होता. त्याला एका व्यक्तीने सांगितले की तू लोक सभेसमोर आंदोलन सुरू करण्यात.              

कोणी ना कोणी तुझी दखल घेईलच.आणि तुला नोकरी मिळून जाईल. तेव्हा तो तरुण लोक सभेसमोर आंदोलन सुरू केले. बरेच दिवस आंदोलन चालू होते पण याच्याकडे कोणीही बघतसुद्धा नव्हते. तो तरुण वैतागून गेला होता. शेवटी त्याने असे ठरवले की आता काही खरे नाही.

          आता जगणे कठीण आहे म्हणून त्याने जंगलात जाऊन आत्महत्या करावे. या उद्देशाने तो जंगलात गेला. आत्महत्या करणार तेवढयात तेथे एक संत आला. व म्हणाला, तू इथे काय करतोस? तेव्हा त्या तरुणाने सर्व हकीकत सांगितले. तेव्हा तो संत म्हणाला काळजी करू नकोस, तुला काम मिळेल. तेव्हा तो तरुण म्हणाला मी पूर्णपणे थकलो आहे आता माझ्याने काहीही होणार नाही.

      तेव्हा संत म्हणाले, तू फक्त एक काम कर तू या मंदिरात जाऊन दररोज मंदिर साफसफाई कर. तेव्हा त्या तरुणाने मंदिरात जाऊन साफसफाई करु लागला. तेव्हा गावातील व्यक्तीने पाहिले की मंदिर एकदम चकाचक आहे. मग सर्वांनी मिळून त्या तरुणाला पुजारी म्हणून ठेवले. मग तो तरुण चांगले पुजाऱ्याचे काम करु लागला. तेव्हा तो तरुण आनंदीत झाला. आणि त्या संताचे आभार मानू लागला.


Rate this content
Log in