Manisha Awekar

Children Stories Inspirational

3  

Manisha Awekar

Children Stories Inspirational

धाडसी चिंटू

धाडसी चिंटू

2 mins
288


   नुकताच पावसाळा सुरु झालेला. निसर्ग चैतन्याने नटलेला , हिरवाईने सजलेला!!

सृष्टीसौंदर्य बघण्यासाठी सहलीला जायची सर्वांनाच इच्छा झाली.आत्याची फँमिलीही आलेली.मनी आणि टिल्लू चिंटूपेक्षा थोडेसेच लहान. चिंटू आठ वर्षाचा. मनी सहा आणि टिल्लू चार वर्षाचा.

   सगळे मिळून गाडीने ट्रीपला निघाले.रम्य निसर्ग , गार हवा , गप्पा , चेष्टामस्करी आणि चटकमटक खाऊ खाण्यात कधी भुशी डँम आले कळलेच नाही.

   सगळ्यांनी आधी भिजायचे ठरवले. लहान मुले मोठे सगळेच एकदम उतरले. लहान मुले एकमेकांच्या अंगावर पाणी उडवू लागले . भिजण्यात सगळ्यांनाच मजा वाटत होती. खास भिजायलाच आले होते ना!!

   थोड्या वेळाने मोठ्यांचा दम संपला. कपडे बदलून उन्हात चक्कर मारायला निघाले. आत्याचे यजमान मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी थांबले. चिंटू , मनी आणि टिल्लू अगदी बेफाम सुटले होते. खरंतर दोनच पाय-यांपर्यंत उतरायचे असे सांगितलेले पण टिल्लू आणि मनी आलेले.त्यांना खूप मजा वाटत होती.चिंटूने त्यांना वर बोलावले. टिल्लूला हात धरुन वर काढत असतानाच, खाली उभ्या असलेल्या मनीचा पाय सटकला.

   हॉटेलमालकाचा फोन आल्याने रेंजसाठी काका थोडे पुढे चाललेले.

   एका क्षणात टिल्लूला काठावर ओढून , मनीसाठी काहीतरी आधार बघायला काठावर नजर टाकली. शेजारी ताईंची ओढणी पडलेली. टिल्लूच्या हातात ओढणी देऊन चिंटूने पाण्यात उडी टाकली. चिंटू आल्याने मनीला धीर आला. चिंटूला चांगले पोहता येत असले तरी " मने फक्त हात पकड. गळामिठी मारु नकोस. दोघेही बुडू." टिल्लूला ओढणी फेकायला सांगितले . एक दोनदा ओढणीजवळ पोचताच वा-याने हुलकावणी दिली. पण चिंटूने धीर न सोडता ओढणी खेचून मनीला पकडायला सांगितले.स्वतः चपळाईने काठावर येऊन मनीला ओढून काढले.

  सगळेजण जमा झाले. लोकांनी आणि काकांनी नाकातोंडातले पाणी काढले.मुलांना पालथे झोपवून पोटातलेही पाणी काढले. दहा मिनीटात सर्वजण सावरले.

   तेवढ्यात फिरायला गालेली मंडळीही आली. सर्वांनी चिंटूच्या समयसूचकतेचे आणि धाडसाचे तोंड भरुन कौतुक केले.चिंटूला ओढणीचे सुचले नसते तर...... त्याने धाडसाने उडी मारुन मनीचा हात पकडल्याने आणि ओढणीचा आधार घेतल्यानेच मनीचा जीव वाचला.टिल्लूला त्याने वेळ ओळखून सपकन् काठावर फेकले व नंतर जी चपळाई दाखवली त्यामुळेच मनी आणि टिल्लू वाचले.

   आत्याने चिंटूला जवळ घेऊन पापे घेतले आणि आसवांना वाट करुन दिली.

  चिंटूच्या धाडसाची बातमी पेपरला छापून आली. मुख्याध्यापकांनी त्याचा गौरव करुन शाबासकी दिली.स्वतःचा जीव धोक्यात घालून दोघांचे जीव वाचवल्याबद्दल त्याला राष्ट्रपतींकडून पुरस्कारही मिळाला.


Rate this content
Log in