धाडस
धाडस
दुपारचे ठीक २ वाजले होते, बाजारात मात्र गर्दी सकाळसारखीच. बाजाराच्या थोड्या पुढे मार्केट रोडावर गर्दी अगदी सामसूम. दोन स्त्रिया गप्पा मारत रस्त्याने चालल्या होत्या. याच रस्त्याने दीपा व सोनू आपल्या शाळेचा सामान घेऊन सायकलवर चालल्या होत्या. सामसूमचा रस्त्याचा फायदा घेऊन दोन चोरट्यांनी त्या दोन स्त्रियांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून बाईकवर फरार झाले.
हे सर्व दृश्य दीपा व सोनूने बघितले. त्यांनी सायकलवर चोरांचा पाठलाग केला व थोड्याच अंतरावर त्यांनी चोरांना गाठले २ ते ३ मिनिटांच्या भांडणानंतर त्यांनी चोरांना खाली पाडले व पोलिसांना बोलवून त्या चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी व तेथील सर्व लोकांनी दीपा व सोनूचे धाडस पाहून कौतुक केले. पोलिसांनी दीपा व सोनूचे नाव त्यांच्या या धाडसाबद्दल शौर्य पुरस्कारासाठी नामांकित केले. दीपा व सोनूला त्यांच्या या धाडसासाठी शौर्य पुरस्कार घोषित झाला. १५ ऑगस्टला संपूर्ण गावासमोर सोनू व दीपाला शौर्य पुरस्कार मिळाला, संपूर्ण गाव त्यांचं कौतुक करत होता.
