देवी तुझे अनेक रूपे
देवी तुझे अनेक रूपे
देवी अंबिके तुझ्या अफाट कौशल्याने स्त्रीजातीला मानाचे स्थान मिळालेले आहे तरीपण आज ती प्रयत्न करून सुद्धा मागेच दिसते आहे. याचे कारण काय आहे? तूच आता आम्हा स्त्रियांना कठोर बनवावे. देवी अंबे आम्हाला सगळ्यांना चांगली बुद्धी देऊन ठणठणीत आरोग्य बहाल कर आणि सर्व महिलांना सुदृढता प्रदान करून शूरवीर ,निडर,पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनव. आमच्या स्त्रियांच्या जीवनात पाषाणाप्रमाणे खंबीरता, अढळता, प्रतिबद्धता आणावी.
आम्ही स्त्रियां तुझ्या रुपाची आराधना करतोय तेंव्हा आमच्यामध्ये जागृत चेतना जाग्या होतात.आणि आम्ही कर्तुत्वापासून जरा ही ढळत नाही, कुठे ही मागे न पडता सतत उपासना करीत असतोय. स्त्री मूळातच सहनशिल धैर्यवान म्हणुन प्रसिद्ध आहे.आपली अस्मिता वाचवण्यासाठी आम्ही सतत तयार असतोय.ती कायम रहावी म्हणुन प्रयासरत असतोय. आम्ही तुझ्या लेकी आहोत मग तुझ्या नावलौकिकास कलंकित कसे काय करू शकतोय.परंतू तू आम्हा शक्ती दे अन युक्ती दे.बस माझी इवलीशी इच्छा पूर्ण करावी.तुझ्या चरणी माझे हेच मागने आहे.
कुठेही मागे न पडणारी बलिष्ठ, धैर्यवान स्त्री तिला आपले बळ, दिव्य तेज देऊन तिला सुदृढ करावे.
देवी अंबिका, तूच तारणारी तूच मारणारी बुद्धी देणारी, स्थैर्य देणारी अाहेस.माते दुर्गा तू जशी या जगी गौरवान्वित झाली तशीच इथली प्रत्येक स्त्री व बालिका पराक्रमी झाली पाहिजे.प्रत्येक स्त्री मध्ये तुच भरावी पृथ्वीवरती वास्तव्यास येऊनी माते जगदंबिके पुनः अवतरित व्हावे. आणि नरपशु दानवांचा नायनाट करावा. इथे जिकडे तिकडे असंख्य राक्षस वावरत आहेत आणि छोट्या छोट्या बालिकेवर बलात्कार,अत्याचार करून वातावरण दूषित करीत आहे.
माता दुर्गा इथे आम्हां स्त्रियांची अतोनात भर्सना होते आहे.ती आता सहन होत नाही ग तुला कळकळीची विनंती आहे तू करुणेची मूर्ती आहे.दश महाविद्या व अष्टसिद्धिची साक्षात मूर्ती आहे.तू जसे शस्त्र उगारले आणि राक्षसांचा वध केला तसाच आम्हा आशीर्वाद दे आम्ही तुला नेहमी स्मरणात ठेऊ.आणि तुझ्या नऊ दिवसाचे पारणे फेडू.
माता जगदम्बे तू शौर्य आणि करुणेची द्योतक आहे.सिंह तूझा दास आहे.तू साक्षात माया ममता करुणा त्यागाची मूर्ती आहे.अशी दिव्य तेजस्वी शलाका होऊन आम्हा स्त्रीयांच्या हृदयात तू स्थापित हो आणि दृष्टांचा संहार करण्या शक्ती व बुद्धीचातुर्याने आम्हास सक्षम कर.
शक्ति महामाया तू पद्मपुराणात देवासुर संग्राम झाले तेंव्हा मधु आणि कैटभ दोघांचा योगबलाने वध केला होता.तसेच महिषासुराचा भयंकर युद्ध करून सिंहावरती बसून वध केला होता.तेंव्हापासुन तुला माता महिषासुर मर्दिनी नावलौकिकास पात्र झाली.
माता काली होऊनीया पृथ्वीवरच्या भयानक दानवाचा महा असुर रक्तबीजालाही पछाडले होते त्याचा वध करून संहार केला होता.आणखी दुर्गमासुरा सहित त्याची समस्त सेना व त्याला नष्ट करून नायनाट केला होता.तेव्हापासुन देवी दुर्गा म्हणुन तुला ओळखतात.
तसेच अम्बे, जगदम्बे, शेरावाली,पहाड़ावाली इत्यादी नावाने तुला बोलवतात. संपूर्ण भारत भूमिवर तुझे हजारो मंदिर आहेत शक्तिपीठ आहेत.तू रहस्यमयी असून सर्व सिद्धीधात्री आहेस. बुद्धी तत्वाची जननी आणि विकाररहित आहेस.
1.शैलपुत्री 2.ब्रह्मचारिणी 3.चंद्रघंटा 4.कुष्मांडा 5.स्कंदमाता 6.का
त्यायनी 7.कालरात्रि 8.महागौरी 9.सिद्धिदात्री,महाविद्या,अष्टसिद्धि देवी तुझे अनेक नावे समाजात रूढ आहेत.आश्चर्य करण्यासारखी तुझी ख्याति आहे.
सत्कार्यात तू धैर्यात तू स्थैर्यात तू आश्चर्यात तू माधुर्यात तूच भरलेली आहेस.
कल्याणी,रमाणी,सौख्याणी,निर्माणी,भजणी,किर्तणी, स्मरणी तूच आहेस.तुझ्या निरंतर आशिर्वादानिशी आम्हा स्त्रियांना आपल्या सान्निध्यात घडवावे.तू अापल्या कर्तव्याने शक्ती सामर्थ्याने दाही दिशा गाजविल्या होत्या.
मोठ मोठी कार्य पार पाडली त्याकाळी तू हे सर्व करून दाखविले जराही डगमगली नाही.आम्हा स्त्रियांना ही तुझ्यामुळे नवचैतन्य आलं. कित्येक संत महात्माही तुझ्या कृपेनी अमर झालेत. राजा व प्रजा सर्व तुझेच गुण गातांना दिसतात.
तसेच तुझ्या रूपात मला दिसते की माता अंबिकेचे सर्वसामान्य पृथ्वीतलावरील स्त्रीयांचेच रूप आहेत. ती आपल्या जीवनात आपणास पावलोपावली दिसते आहे.महागौरी म्हणजे ,गौरवर्ण प्रदान रूप असणारी व उच्च ज्ञान प्रदानत्व जपणारी असतेय. आणि कालरात्री म्हणजे भरपूर निद्रामय गाढ विश्रांती,घेऊन सदोदित ताजेतवाने व कार्यक्षम असणारी स्त्रीचेच रूप आहे.
शैलपुत्री म्हणजे कौमार्य सांभाळणारी तेजस्विता ही बहू सामर्थ्यशाली दिसतेय.
चंद्रघटा म्हणजे चंद्राशी निगडीत कलाकार उपासक असतात.चंद्राशी एकरुप होऊन ती मना मनावर राज्य करणारी असतात.
कुष्मांड म्हणजे पुनरुत्पत्ती करण्याची क्षमता जिच्यामध्ये आहे जीच्यात संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण असतात अशी स्त्रि,स्कंदमाता ही शौर्याचे प्रतिक आहे.आणि तज्ञ पांरगत असून थोडी उद्धट असते तो तिच्या गुणांचा निष्णातपणा असतोय.
कात्यायनी देवी विवाह ,मातृत्व सहजीवन नातेसंबंधामध्ये वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे मन आत्म्याशी एकरूप होणे हा तिचा गुण आहे.
सिद्धीधात्री सिद्धी प्राप्त करण्याची धडपड इच्छा आकांक्षाची पूर्ति गरजेपेक्षा जास्त मिळवणे या गुणाची
स्त्रीचेच रूप आहे.
कोणतीही स्त्री आई-बहीण भगिनी सर्वातच देवी वीराजमान असतेय. ती पृथ्वीवर साक्षात दिव्यशक्ति घेऊन विराजमान असतात. नवरात्रीमध्ये स्त्रियांचे तेजस्वी रूप अविष्कार केल्यासारखं सूर्यकिरणा याप्रमाणे तेजाळत असतेय.जिकडेतिकडे उल्हासाचे वातावरण असून मुग्ध करणारा सुगंध दरवळत असतो.
सुरूचि आणि सौंदर्यात वाढ होऊन श्रेष्ठतत्व रूपात निसर्गपण साथीला असतो.पृथ्वी वर नारीच नारायणी आहे.ही अभिव्यक्ती नवरात्रि पर्वावर दिसून येतेय.
प्रत्येत देवीसमोर गर्भा खेळल्या जात असतो.आल्हादक वातावरणाची निर्मीती होऊन रासलीलाचा मनसोक्त आनंद देतो.
आपण देवीच्या या रुपाची आराधना करतो तेंव्हा आपल्या मध्ये तसेच गुण जागृत झाले पाहिजे आपण काय आहोत नवदुर्गेचाच अंश घेऊन जन्माला आलोय हा भाव ठेऊन स्त्रीयांनी तिच्या रूपाची कल्पना केली पाहिजे आणि आपण आपला मूळ स्वभावाशी कर्तव्याशी सांगड घातली की हमखास सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपण शूर,निडर,पराक्रमी आणि सामर्थ्यशाली होऊन समाजात पदप्रतिष्ठेची स्थापना करू शकतोय. तेंव्हाच सिद्धीधात्री सर्व सिद्धींची आपोआप प्राप्ती करून प्रसन्न होईल.व आपल्या या संसार सागरात ही परीपूर्ण कृपेची देणगी अवश्य मिळेल.
देवीच्या नवरात्रीच्या प्रत्येक स्त्रीरूपाला माझा मनापासून शुभेच्छा देऊन वंदन करतेय.