Ranjana Bagwe

Others

4  

Ranjana Bagwe

Others

देवभोळी

देवभोळी

9 mins
481


""निलू झाली का गं तयारी!""

""हो आई ""

""चल लवकर ""

""ही काय आलेच"

आणि निलूची आई गंगाबाई आपल्या मुलीच्या सौदर्याकडे पाहतच राहीली .आपली आई आपल्याकडे टक लावून पाहते हे निलूच्या लक्षात येताच ती ओशाळली..त्याही क्षणात तीने आ वासलेल्या आईला मिठी मारली .आणि म्हणाली..

""ये आई अशी काय पाहते माझ्याकडे भूत पाहील्या सारखी""

स्वत:हाला सावरत गंगा बाई निलूवर ओरडत म्हणाल्या..

""ये पोरी आजवर तू कधी एवढी सुंदर दिसली नाही .तेवढी या साडीत तूझ लावण्य खुलून दिसत. त्या मुळे तुझ्याकडे पाहण्याचा मोह आवरला नाही...म्हणून तुझ हे सौदंर्य नयनी साटवून ठेवते""

""काय हे आई जशी काय मी पून्हा साडी घालनारच नाही. आणि या पूढे तू मला पाहानारच नाही .अस वाटत का तुला""

"""नाही गं तू पहील्यांदा साडी नेसली ना तुला पाहूण कुणाची तरी आठवण झाली ""

""कुणाची आई"

""आहे एक देव भोळी"

""देव भोळी म्हणजे गं""

"""कस समजवू तूला?बर ते राहू दे चल आधी आपल्याला जायच आहे ना""

""तेच म्हणते मी कूठे नेतेस मला? काही सांगतही नाहीस,वरून ही साडी घालायला लावलीस""

"""कळेल सर्व कळेल धीर धर आणि चल पटकन""

""बर चल पण आई तू अशीच येनार का !तू पण छानशी साडी घाल की गं""

""नको बाई मी अशीच बरी आहे. मी साडी कीतीही किमती नेसली तरी तुझ्या सारखी थोडीच दिसनार आहे..""

""तू कशीही असली तरी मला आवडते !माझी आई आहेस तू""

""पण तुझ्यासारखी गोरी ,तुझे हे कमळासारखे डोळे,चाफेकळी नाक,शेलाटी बांधा,पाटीवर रूऴणारे हे हातभर लांब केस,लालचुटूक ओठ,आणि हरणासारखी सोनेरी कांती ,हे सर्व माझ्यात कुठून मी वेढी गबाळ, तुझ्या सोबत चालायला लागली तरी कुणी मायलेकर म्हणार नाही..कुणी तरी कामवाली बाई म्हणतील""

""बस,बस,कीती तारीफ करते. तू कामवाली नाहीस माझी आई आहेस, कळल मी जगाला ओरडून सांगेन ,त्यात मला कसलाही संकोच वाटनार नाही कळल का? माझ्या सौदंर्याचे वर्णन करून मोकळी झालीस, ती पण स्वत:हाला कमी लेखून या पूढे तू कधीतरी स्व:ताला कमी समजली तर बघ! आणि कसल सुदंर वर्णन करते..तू आई खरोखर कवि असायला हवी होती""

""कवि ते गं काय असत.."

""ते राहू दे तुला सर्व माहीत आहे चल निघूया..

""हो चल""

दोघही चलत खोलीच्या बाहेर येताच गंगाबाई लेकीला म्हणाल्या थांब हं मी आलेचअस म्हणत त्या आत आल्या पेटीतून कसलीशी वस्तू बाहेर काडत म्हणाल्या बाई साहेब. तुमची लेक येते हो !पण तुम्हाला ओळख पटायला म्हणून हा तुंमच्या लेकीच्या अंगावरचा झबला जो तुम्ही तीला माझ्या हवाली करताना अंगात होता...

आणि त्या मागील सोळा वर्षाच्या भूतकाळात अडकल्या....

रात्रीचे दोन वाजले होते...दिवभर मुबंईचे गजबजलेले रस्ते शांत होते...रस्त्याच्या कडेवरचे दिवे मात्र आपला टीमटीमता कीहीसा पिवळसर प्रकाश रस्त्याची शोभा वाढवत रांगेने ऊभे होते...ऱस्त्यावर एक्का दुक्का गाड्या मात्र रस्त्यावरची निरव शांतता भंग करत होत्या...त्याच वेळी रस्त्याच्या कडेवर अर्धवट झोपेत असलेली भटकी कुत्री मात्र मधीच भुकंत होती...त्यांच्या भुकंण्याच्या आवाजाने,पायफुटीवर झोपलेले भिकारी मात्र मधीच करवट बदलताना दिसत होते..आभाळाच्या शायेत धरतीच्या ऊबदार स्पर्शात भिकेसाठी वनवन फीरनारे भिकारी निवांत पडलेले..

सुखाची झोप गवसायला घर नसलेले भिकारी ,कुणाची चाहूल लागताच करवट बदलत होते...

अशा शांत वेळी गंगी मात्र एका दगडावर बसली होती..दिवसभर वनवनकरूनही तीच्या पोटाची खळगी भरली नव्हती भूकेनेखासाविस झालेली गंगी कुणी गाडीतून काही अर्धवट खाल्लेल खाण फेकल तर ते मिळेल या आशेने ती बसलेली..तीच्या दिशेने गाडी येताना दिसली की ती डोळे उघडून पाही...

वेळ हळू हळू पूढे जात होती..गंगी चे डोळेही आता शिनायला लागलेले होते...तरी आशेत किरण मनात बाळगून असलेली गंगी गाडी आली की मान वर करी...

काही वेळात एक धिम्या गतीन धवल रंगाची फीयाट कार येताना पाहून गंगीला आशा वाढली..कारण एवढ्या रात्री येणा-या जाणा-या गाड्या सुसाट वेगान धावत होत्या...पण ही कार मात्र त्याला अपवाद होती..

ती कार अगदी गंगी जवळ येताच थांबली...ते पाहून गंगीच मन खर तर भीतीने डगमगल..न जाणो कुणी माथेफीरू आपल काय करील ,न आधार ना आश्रय कुणी याव पाया खाली तुडवून जाव अस आपल अस्थीत्व दाद कुणाकडे आणी कशी मागनार..

गंगीच मन विचार करत असताना गाडीची काच खाली आली आणि कोमल आवाज आला.

..""ये ईकडे ये.."

""मी""

""हो तूच""

बोलवनारी एक गाडी चालक सभ्य अशी स्त्री होती.गंगीची भीती काही अंषी कमी झाली..परंतू मनात थोड किंतू ठेवत ती कारजवळ जात म्हणाली..

""काय मँडम""

""माझ एक काम करशील""

""कसल काम मँडम '"

"""ते नंतर सांगते तू आधी गाडी मधे बस""

गाडीचा मागता दरवाजा उघडत ती म्हनाली..आणी गंगी आज्ञाधारकाप्रमाणे गाडीत बसली..आणि तीला बाजूच्या शिटवर एक दोन चार महीण्याच बाळ गोड झोपेत असलेल दिसल""

गंगी सावरून बसताच कार पून्हा रस्त्यावर धावायला लागली 

गंगीही बोलायला लागली

""मँडम कुठे नेता मला""

""घाबरू नको कूठेही नाही तुझ्या जाग्यावर पून्हा आणून सोडेन""

"""पण मँडम मी सकाळ पासून काही खाल्लेल नाही""

""का""

""काही हातावर पडलच नाही""

तोवर कार एका हातगाडीवर चहा विकत असण्या-या पोर-यापाशी थांबली...

"""एक चहा देना,और कुच बिस्कुट दो""

दोन्ही वस्तू घेवून गंगीला देत म्हणाली घे खावून..

गंगी अधाश्या सारखी चहा आणि बिस्कीट खात होती..कार मात्र संथ गतीन पूढे जात होती...

एका झोपडपट्टी एरीयात कार थांबली..गाडीतून ती स्त्री उतरली..आणि बाळाला घेत गंगीला उतरायला सांगून कार लाँक केली ..बघता बघता दोघी झोपड पट्टीत शिरल्या.

एक बंद रूमच्या समोर येताच त्या स्त्रीने दरवजा उघडून लाईट आँन केली...आणि गंगी पाहत राहीली सुदंर अशी ती रूम मस्त होती...घरात हव्या असना-या सर्व गोष्टी होत्या ...समोर असलेल्या लहानश्या बेडवर बाळाला ठेवत ती स्री म्हणाली...

"""आत मधे बाथरूम आहे तू पहीली आंघोळ करून येशिल प्लीज..

गंगीला मात्र तीला नाही म्हनवेना पण आंधोळ केली तर अंगावर पून्हा कपडे लागतील त्याच कस कराव !!तीच्या नजरेतले भाव ओळखून तीने कपाट उघडून तीला येण्याजोगे कपडे काडून देत म्हणाली ...

""काही घाई नाही स्वच्छ आंघोळ कर""

"""जी""

आणि रस्त्याच्या कडेला काळोखात आंघोळ करनारी गंगी पहीली वहीली बाथरूम मधे आंघोळीला बसली...तीला हे सार स्वप्नच वाटत होत..झरझर करत तीच्या बरोबर सुखद घटना घडत होत्या..आनंद मनात मावत तीन न्हान आटपून त्या स्त्रीन दिलेला गावून घालून गंगी बाहेर आली ..आणि आरशात स्वत:हाला पाहून तील तीच ओळखता आली नाही..

ती स्त्री मात्र 

""छान ""

म्हनाली...

पुढचा आदेश गंगीला आला तूला चहा बनवता येतो..

"""हो""

"""गँस पेटवता येतो ""

""हो""

""चल ये मागे""

दोघ तीथल्याच कीचन मधे आले तीने चहाची सामग्री दाखवून फ्रीजमधे दुध असल्याच सांगून ती बाळाजवळ बसली...

दोन हाती दोन कप चहा घेवून गंगीने एक त्या बाईला देत म्हणाली..

"""मँडम एक विचारू""

""हो पण हेच विचारनार ना की मला ईथ का आणल .हे सर्व माझ्यासाठी का करता""

आपल्या मनातल अचूक भाव ओळखले कसे ?या सम्रमात असलेल्या त्या बाईकडे गंगी कौतूकाने पाहात होती..

तीच्या डोळ्यातले भाव पाहूण ती स्त्री म्हणाली..

""अशी हैरान होवू नको""

""नाही पण""

ऐक कुणासाठी कोणी फुकट करत नाही...तूला मी त्या रस्त्यावर आज 4 दिवस पाहते..आहे.. कुणाच्या पूढे मागे करत नाही.. कुणी मुद्दाम तूला दिल काही तरच घेतेस..हे सर्व पाहून तूला ईथ आणली""

""तेच विचारते मँडम मला का आणल""

""सांगते पण तूझ नाव '"

""गंगी म्हनतात मला""

""तुझ कुणी अजून आहे""

""नाही""

"""गंगी तू या बाळाची आई होशील""

""मी"

""हो तूच तुला काही कमी पडनार नाही सर्व मिळेल..फक्त हीला मोठ करायच ,शिक्षण द्यायच मी तुला सारा खर्च पुरवत राहीन...

"प्रत्येक महीण्या तुला पैसे मी देईन पण बैकंमधे जायच ते मी तुला दाखवेन तुझ खात ओपन करून देईन उद्या, ही रूम या बेबीची आहे..ती आज पासून तुझ्या ताब्यात ..हीला मोठी कर शिकव योग्य वेळ येताच मी तूला भेटायला येईन. तुझी चौकशी लांबून करत राहीन...आणि ती जशी आली तशी गेली..ही त्या नंतर ...गंगीने निलूच सार मनापासून केल पैसा येत होता..निलू वाढत होती दहावीचे पेपर संपले आणि गंगीला तीने पहीला वहीला फोन करून अमुक ठीकाणी निलूला घेवून ये सांगितल होत...ती बाई कोण? निलू तीची कोण??ह्या प्रश्नाची उत्तरे आज गंगीला मिळनार होती..गंगीच्या नजरेत ती मात्र देवी होती...

""आई चल अग काय करते ""

निलूच्या हाकेसरशी ती बाहेर आली...रस्त्यावर येताच तीने टँक्शी पकडली ..दादर गोखले रोड अस सांगून दोघी आत बसल्या गोखले रोड येताच. तीला स्नेहा सदन बंगला शोधायला जास्त वेळ लागला नाही बंगल्याच्या सेक्युरेटीला ती आल्याची आत वर्दी देली ....

आणि आपणास कधी बोलवतील याची वाट पाहत ती गेट पाशी थांबली..

 काही वेळातच बंगल्याच्या आतून गंगाबाईला बोलवन आल..

तशी गंगाबाई निलूला घेवून बंगल्यात प्रवेश केला..

प्रथम दर्शनी असलेल्या होँल मधे दोघीना बसवण्यात आल...

गंगाबाईची नजर त्या मालकाच्या वैभावाच प्रदर्शन करत असलेल्या त्या हाँल कडे नव्हती. तीची नजर काही शोधण्यात मग्न होती..शेवटी डोळ्यांची प्रतीक्षा संपली असावी...एक 40ते 45 वर्षाची युवती बाहेर आली...तीन सलवार कमीज असा वेष परीधान केला होता...तीला पाहतात गंगाबाईन तीला ओळखल .तीला विसरन गंगाबाईला तरी शक्य नव्हत....पायफुटीवरून या देवीन तीला कुटीत आणून एक इज्जदार जगण तीच्या आयुष्यात दिल होत...अश्या देवीला गंगाबाईला विसरन शक्य नव्हत..त्यामुळे तीला पाहताच तीच्या मुखी एक नाव आल..""मँडम""

"""कशी आहेस गंगी""

"""मँडम तुम्ही दिलेल्या सुखात आहे..""

""नाही गं तस नाही""

""मँडम तुम्ही काही म्हणा पण माझ हे जिवन तुम्ही दिलेल आहे"""

चल वर चल आपण आत जावून बोलू आणि ती भरभर सीड्या चडत वर गेली तीच्या मागून निलू आणि गंगाबाई चालत होत्या..

एक रूम मधे येवून मँडमनी दरवाजा बंद केला आणि म्हणाली..

""गंगी हीच का ती निलू""

""हो मँडम तुमची अमानत तळहातावरील फोडा प्रमाणे जपलय मी""

"""ते दिसतय गंगी ""

""निलू ना तू, ये इकडे""

हा काय प्रकार आहे ही बाई कोण? आणि आई मला ईकडे का घेवून आली??या प्रश्नात अडकलेली निलू मात्र आश्चर्याने कधी आईजवळ तर कधी त्या मँडमकडे विस्फरलेल्या नजरेन मनात असंख्य विचाराच काहूर घेवून पाहत होती..आणि अचानक निलू ना तू असा त्या मँडम नी प्रश्न करताच तीने मानेन होकार दिला..


""ये इकडे""

निलू ऊठून तीच्या पाशी जात म्हणाली

""तुम्ही मला ओळखता""

""हो अगदी जन्माला आल्या पासून""

""काय मग आईने कधीच सांगितल नाही तुमच्या बद्दल""

""हो मीच तीला मनाई केली होती""

""पण का""

""ते सांगते पण आधी तू बस तुला मला डोळे भरून पाहू दे "

""हा मँडम बघा तुमची ही अमानत मी सुरक्षीत जपून ठेवली ..आणि कीती सुंदर दिसते अक्षी तुमच्या वाणी""

मधीच गंगी बोलली..

""चुकतेस तू ही माझ्याही पेक्षा सुदंर दिसते""

""आई ह्या कोण?तू मला ईथ का आणलस ?मला समजेल का?

""मी सांगते"":

""सांगा प्लिज मी अधिर झाली तुमच बोलन ऐकायला ""

""मन घट्ट करून ऐक ती वेळ आली आहे .तूला सर्व सांगायची ""

""सांगा मँडम"

""तू ह्या गंगीची मुलगी नाहीस""

""मँडम ही थट्टा करण्याची वेळ नाही""

""ही थट्टा नाही थट्टा तर सत्य घटना आहे आणि थट्टा तर तुझ्या आईशी केली देवाने""

""कोण आई ? तूम्ही काय बोलता "माझी आई दुसरी आहे म्हणता तर ती आजवर मला भेटली का नाही..आणि अनाथा सारख मला ह्या या आईजवऴ का ठेवल?मला ते काही माहीत नाही हीच माझी आई आहे चल आई आपण ईथून जावू"

""निलू बेटा आधी त्या काय म्हणतात ते ऐकुण तरी घे""

""नाही मला ऐकायच तुच माझी आई आहेस समजल दुसरी कुणी नाही""

""नाही निलू मी तुझी आई नाही..या मँडमन मला तुझा संभाळ करण्या करता आपण राहत असलेल घर आणि आपला दोघींचा खर्च आजवर या मँडम देत आल्या त्यामुळे तू एवढ्या मोठ्या शाळेत शिक्षण घेतलस..

""काय"

""हो""

""मग माझे आई बाबा कोण ?ते कुठे आहेत मला कळेल का?

मला त्याना जाब विचारायचा आहे..ते हयात असताना मला अस अनाथा सारख लांब का केल""

""निलू ऐक तुझी आई एक स्टेज शो करणारी सुंदर क्षेम तुझ्यासारखी दिसनारी एक कलाकार होती...

आमची दोघांची घनिष्ठ मैत्री होती..

तीच एका मुलावर प्रेम होत. माझी ओळखही करून दिली आणि मलाही तो आवडला ..मधूर.. बेलन.. नम्रपणा हे त्याचे गुण पाहून मीही संध्याला होकार दिला...ते दोघ आपल्या विश्वात रमत होते..

एक दिवस दोघ दौ-यावर असताना. लग्नाआधी चुकी करून बसले...तीने मला तस सांगितलही मी तीला बरच ओरडलीही....पण झालेली चुकी आता बदलनार नव्हती..

एक दिवस तो काळा कुट्ट दिवस आला..आम्ही दोघी जणी एका शोला गेलो असताना तीला फोन आला...तो घेताच ती बेशुध्द पडली. मला कळण्याला साधन नव्हत ..त्याही परिस्थीतीत मी तीला डाँ.जवळ नेल तेव्हा तू तीच्या गर्भात वाढत असल्याच मला कळल..मी तीला खुप ओरडनार होती...पण काही वेळात मला कळल की तुझे वडील अवनिष ,हे विमान अपघात वारले होते..

त्याचा जबरदस्त शाँक तुझ्या आईला बसला आणि ती वेड्या प्रमाणे वागू लागली...दिवस लोटले मी तीला सोडल नव्हत..तू राहत असलेल्या घरी आम्ही राहत होतो...त्या दिवशी तीच्या पोटी कळा यायला लागल्याने मी तीला हँस्पीटलमधे नेल...तुला जन्म देताच ती अवघ्या तासाभरात जगाचा निरोप घेतला अवनिषच्या घरच्या बद्दल मला काही माहीत नव्हत...तुझ काय कराव हा मोठा प्रश्न होता..कारण माझ लग्न घरच्यानी ठरवल होत..वडीलांना मी तुझ्या बद्दल सर्व सांगितल त्यानी तुझा खर्च देण्याच मान्य केल..आणि मी या गंगीला. तुझी आई बनून राहायला सांगितल..त्या प्रमाणे तीन तुझा संभाळ केला पण आज मीच तीला तु कोण हे कळाव म्हनून बोलवल ...

एवढ बोलून मँडम थांबली आणि निलूचा हुंदका बाहेर फुटला ..

आणि तीने गच्च त्या मँडमला मिठी मारत म्हणाली..

""मावशी तूम्ही खरच महान आहात..मलाच नाही तर या माझ्या गंगी आईलाही सावरलात तुमचे उपकार कसे फेडू..

""नाही निलू उपकार नाही मी माझ्या मैत्रनीची अखेरची निशानी जपली..खरी पण माझ लग्न झाल्याने मी परदेशी सेटल झाले त्या मुळे तुझ्या करता काही करता आले नाही....

""मँडम मी बोलू का""

मधीच गंगीन विचारल

""हो बोल की""

""एवढ्या वेळा तूम्ही काँल करायच्या पण तुमच कधी नाव नाही समजल...

"""अनूपमा""

""खरच मँडम तुम्ही या निलूच आयुष्य सवारलच पण मी कुणी नसताना एका भिकारणीला मान सन्मान देवून आईचा दर्जा दिलात तुमच्या नावातच अनूकंपा आहे... त्या प्रमाणे तुम्ही अनूपमा तूम्ही खरच तुम्ही देवभोळ्या आहात.

तो चराचरात व्यापून उरलेला भोळ्या देवाच अंश असलेल्या देव भोळ्या..


Rate this content
Log in