देश, समाज व कर्तव्याचा विसर
देश, समाज व कर्तव्याचा विसर
आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारी पिढी आज राहीली नाही. आता ज्यांच्या हातात गावची सत्ता आहे त्या सर्वांना आपल्याला स्वातंत्र्य कोणत्या परिस्थितीत मिळाले आहे. याचे आजच्या अधिकाऱ्याला, पुढारी, नेते मंडळींना भानच राहीले नाही. आपण समाजासाठी, देशासाठी काहीतरी देणं लागतो का याचा विचार आज अजिबात राहीला नाही.
यामुळे सत्ता आणि संपत्ती मिळविणे, कमी वेळात जास्तीत जास्त पैसे मिळविणे, सरकारच्या तिजोरीवर दिवसा ढवळ्या लुट कशी करता येईल एवढेच लक्ष आजच्या नेते मंडळींना, अधिकाऱ्याला राहीले आहे. विकास कामासाठी उपलब्ध झालेला निधी विकास कामासाठी खर्च झाला पाहिजे हा विचार आता हळूहळू नाहीसा होवू लागला आहे. याचा परिणाम समाज जीवनावर होत चालल्याने दिवसाढवळ्या सरकारच्या तिजोरीची लुट होताना पाहून सुद्धा आपल्याला काही करता येत नाही.
ही आजची खरी शोकांतिका आहे. विकास कामासाठी जो निधी उपलब्ध होतो तो निधी जशाच्या तसे विकास कामासाठी खर्च झाला पाहिजे असे आता कोणाला वाटत नाही. कनिष्ठ कर्मचारी. वरच्या साहेबाला सांभाळतो आणि गिव्ह पातळीवरील पुढाऱ्याला मोठा साहेब सांभाळतो असेच चित्र आज संपूर्ण देशभर दिसून येते आहे.
राज्य आणि केंद्र सरकारने भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून सार्वजनिक हितासाठी जे निर्णय घेण्याची घटनात्मक जबाबदारी सरकारची आहे. त्या जबाबदारीपासून सरकार आज फारकत घेत आहे. ही बाब अत्यंत चिंतनीय वाटते.
सार्वजनिक हिताची जपणूक आणि जनतेच्या कष्टातून सरकारच्या तिजोरीत झालेल्या पैशाची काळजी समजून घेतली . स्वत:चा स्वार्थ बाजूला गेला पाहिजे आणि मी समाजासाठी, देेशासाठी काही केले पाहिजे. चांगले ते करण्यासाठी लोकशाहीच्य माध्यमातून जनतेेेन लोकप्रतिनिधी म्हणून
निवडून दिले आहे. किंवा अधिकाऱ्याला घटनात्मक जबाबदारी आहे त्या जबाबदाऱ्याा पूर्ण करण्याची नैैतिक जबाबदारीआपल्यावर आहे. ही जबाबदारी आपण पूूर्ण करु शकलो तरच आपण सरकारच्या तिजोरीतून मिळणाऱ्या पगाराचेे खरेे हक्कदार आहोत.
आज प्रत्येेक माणसाला देशाबद्दलचा, समाजाबद्दलचा आणि कर्ततव्याबद्दलचा पूर्णपणेे विसर पडला आहे. असा विसर पडणे समाजासाठी, देशासाठी घातक आहे. हे नीटपणे समजून प्रत्येकानेे आपापली
जबाबदारी ओळखूून प्रामाणिकपणेे काम करीत राहीले पाहिजे. तर
देश मोठा होवू शकतो.!!!!!.
