STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

देह देवाला समर्पित

देह देवाला समर्पित

4 mins
7

देह देवाला समर्पित...
 देह, देह म्हणजे काय? शरीर, काया. हे शरीर आपले आहे का हो? म्हटले तर आपलेआहे नाही म्हटले तर नाही. आपल्या देहामध्ये देवाचा निवास आहे. आपला देह जरी आपला असेल तरीसुद्धा तो देवाच्या मर्जीनुसार चालतो. बघा आपण श्वास घेतो आणि सोडतो. श्वसन प्रक्रिया आपण देवाच्या मुळे तर करतो. म्हणजे जीवन जगण्यासाठी श्वासाची नितांत गरज आहे. हा श्वास आपल्याला देवाला दिला आहे. हो की नाही.. आपण जन्माला आलोय आपण म्हणतो हे माझं, हे माझं, हे माझं, पण आपण देवाघरी जावू त्या वेळी आपल्याला सर्व इथेचं ठेवून जायचय. जीवन आणि मृत्यू या मधल्या काळात आपण या सर्व वस्तूंचा उपभोग घेत असतो. आणि या वस्तू मिळवण्यासाठी आपण खूप काबाड कष्टही करत असतो. टीचवर पोट भरण्यासाठी आपण अनंत कष्ट करत असतो. तेव्हा आपल्याला अन्नाची किंमत कळते. अन्न,वस्त्र, निवारा ह्या मानवी गरजा आहेत. आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण जीवनभर झटत असतो. आपला दिनक्रम ठरलेला असतो. थोड्याफार बदलाने सर्वांचा दिनक्रम सारखाच असतो. आता पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही. विभक्त कुटुंब पद्धती झाली आहे. आई वडील आणि त्यांची दोन मुलं. आजी आजोबा परगावी. असा हा संसार प्रपंच चालू असतो. संसार नेटका करायचा असेल तर दोघा नवरा बायकोने मिळून नोकरी करावी लागते. दोघांनीही कष्ट केले तर सुखाची भाकर खाऊ शकतात. यासाठी दोघांनाही घराबाहेर पडावे लागते. घरी शेतीवाडी असेल तर गोष्ट वेगळी पडते. पण तिथेही कष्टाला पर्याय नाही. एकंदर काय तर कष्ट करा पैसे कमवा आणि छान जगा! असे जगण्याचे सूत्र झाले आहे. घरातल्या कामा मुळे, नोकरीतील बंधना पायी हल्ली सर्वांना लवकर ऑफिस गाठावे लागते. ही तरुण पिढी तर आजकाल बारा,बारा तास ड्युटी करते. घरी आला तरी त्यांच्या डोक्यामध्ये नोकरीचेच विचार चालू असतात. मग या मुलांनी घरादाराकडे कसे लक्ष द्यावे. मग दररोज देवपूजा तर खूप दूरची बात असते. काही घरांमध्ये होते असेल देवपूजा नियमित. परंतु मी पाहिलेल्या बऱ्याचशा घरांमध्ये नित्य देवपूजा होत नाही. अगदी माझ्याकडे सुद्धा नियमित देवपूजा होत नाही. कारण काय असते वेळ नाही. मग आपण पटकन देवापुढे दिवा लावतो उदबत्ती लावतो आणि आपण घराच्या बाहेर पडतो. ज्या देवाने आपल्याला सुंदर देह दिला, जीवन दिले आहे त्या देवासाठी आपण वेळ काढू शकत नाही ही खरंतर चिंतेची बाब आहे. परंतु खरंच आजच्या या तरुण पिढीला घरामध्ये पूजा करण्यासाठी अजिबात वेळ नसतो. अगदी सगळेच पूजा करत नाहीत असं मी म्हणत नाही परंतु बऱ्याश्या घरांमध्ये ही अडचण पाहायला मिळते आणि होतही असंच. त्यामुळे मग देवांवर धूळ साठली जाते. आपण आणलेले, देव्हाऱ्यात पुजलेले हे देव असे राहिले तर देव आपल्यावर कृपा करतील का हो! आपल्याला हव आहे ते आपल्याला मिळवण्यासाठी आपल्या हातामध्ये ताकद आहे आपण कष्ट करत आहोत परंतु नशिबाची साथ सुद्धा तेवढीच गरजेची असते. आणि याला नित्य पूजेची जोड द्यावी लागते. चकाचक देव घासून वगैरे आपण पूजा केली, फुले छान वाहिली की आपलेच मन प्रसन्न होते देव्हारा सजतो प्रसन्न दिसतो. आपण कथा पुराणांमध्ये आपण हे सगळं ऐकतो कि नित्य पूजा करावी. अगदीच एखाद्या वेळेस जमलं नाही तर दिवा उदबत्ती करून आपण बाहेर पडावे. रोज, रोज देवांना आंघोळ घालता जरी नाही आली तरीसुद्धा आपण हात जोडावेत. दिवा, अगरबत्ती करावी. देवाशी मनातले बोलावे. देवाशी हितगुज करावी. देवाशी हितगुज करण्यासाठी आपल्याला देवाजवळ बसावेच असे काही नाही. तुम्ही जाता, जाता गाडी चालवता, चालवता सुद्धा देवाशी हितगुज करू शकता देवाचे नामस्मरण करू शकता. तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळते. हे मी एवढे खात्रीनं सांगते याचे कारण माझा प्रत्येक स्वअनुभव असतो. देह देवाला समर्पित करा. असे वाक्य नुकतेच मी ऐकले. आमच्याच नातेवाईकांकडे लग्न घरात देवीचे टाक उजळवून आणले होते. त्याची प्रतिष्ठापना पूजा होती. मी लवकरच लग्न घरी पोहोचले. तिथे पूजेला नुकताच आरंभ झाला होता. सिद्धटेकचे ब्राह्मण गुरुजी तिथे आलेले होते. त्यांनी पूजा यथा सांग केली. आपणही प्रतिष्ठापना का करत आहोत हे खूप छान समजावून सांगितले. त्यांच्या तोंडून जे ऐकले ते लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहे. कुलदेवता, इष्ट देवता, कुलाचार म्हणजे नेमकं काय? त्यांची पूजा का करावी? कुलाचार का पाळावेत? इत्यादी प्रश्न त्यांनी सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले. आपली कुलदैवता व इष्ट देवता यांचे नियमित पूजन करावे. आपल्या मनातील इच्छा त्यांना बोलून दाखवाव्यात. मनातील किल्मीश त्यांच्यासमोर ठेवावीत. मनातील विचारांचे वादळ येथे शांत करावे. देवतांच्या पूजेने मन प्रसन्न होते. देवतांचे आशीर्वाद चांगले मिळतात. आपण जे चांगले किंवा वाईट कृत्य करतो यासाठी देवच जबाबदार आहे असे म्हणावे. म्हणजे आपल्या कर्मावर काहीही फरक पडत नाही. सर्व काही तारुण नेणारा देवच आहे. देवाला तारणहार असे आपण म्हणतो. आपल्याकडून चांगली कृती करून घेतो देव करून घेतो. वाईट कृती करून घेतो देव करून घेतो. ही भावना माणसाच्या मनात जागृत करावी. म्हणजे आपण निश्चिन्त राहतो आणि सर्व संकट देवावर सोडून देतो. इथे देव तुमचे संकट निवरण्याचे काम करतो. वाईट विचारांना थारा देत नाही. आपल्या हातून वाईट कृत्य होऊ देत नाही. देवतांची रोज पूजा- अर्चा करावी आणि दररोज दिवाबत्ती करावी. दररोज पूजा चर्चा करायला नाही जमले तर दिवसाआड तरी पूजा करावी. देवाला दिवा आणि उदबत्ती मात्र दररोज लावायची आहे. आपला हा सचेतन देह देवाला मनोमन अर्पण करायचा आहे. मनातले सुखदुःख देवाला सांगायचे आहे. देव बरोबर आपल्याला मार्गी लावतो. म्हणून म्हटले आहे की देह देवाला अर्पण करावा आपल्या सुखदुःखाचा पाढा देवा पुढे वाचावा... वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा- पुणे मो. नं. 9823583116


Rate this content
Log in