The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Deepali Rao

Others

5.0  

Deepali Rao

Others

डोंगराला आग लागली

डोंगराला आग लागली

1 min
1.2K


डोंगराला आग लागली पळा पळा पळा.....

चाळीतली सगळी मुलं मुली

वेड्यासारखी सैरावैरा पळत राहायचे

तासन् तास हाच खेळ ....

घरून बोलावणं आलं की मगच संपणार

शाळा...चांगले मार्क...

हा क्लास ...तो क्लास...

इकडे जा, तिकडे जा, खेळात यश ....

पळा पळा पळा

डोंगराला आग लागली

पळा पळा पळा....

कॉलेज, सीईटी, नीट, गेट, आयएलटी...

परदेशातलं पॅकेज...

पळा पळा पळा

डोंगराला आग लागली

पळा पळा पळा ......

नोकरी, लग्न आणि मुलं

स्वयंपाक..डबे भरा,

लोकल गाठा नाही

लेट मार्क बोंबललं प्रमोशन....

काम ..काम ..काम..

मान मोडून काम

दाखवा टॅलेंट, प्रूव्ह करा स्वतःला

सतत सतत ...

कमी पडलात तर मागे जाणार

शर्यतीत शेवटी

अरे! हे काय

घरी निघायची वेळ झाली

आजही उशीर

पकडा लोकल पटकन

मनात चलबिचल

घरी लेकरू उपाशी

पळा पळा पळा

जीव घेऊन पळत रहा

हे पळणं थांबतच नाहीये

आता वेगही इतका झालाय

थांबायचं म्हटलं तरी

थांबता येणार नाहीये

पळा पळा पळा....

हा खेळ संपतच नाहीये

डोंगर मात्र सतत बदलताहेत

हेच प्राक्तन उरलय

आता थांबणे तेव्हाच ...

जेव्हा डोंगर वणव्यानं फुलून जाईल

किंवा पळण्यासाठी पायच राहणार नाहीत

पळा पळा पळा

डोंगराला आग लागली

पळा पळा पळा......


Rate this content
Log in